Gold-Silver Price Crash: बजेटपूर्वीच ग्राहकांना आनंदवार्ता…चांदी 27000 रुपयांनी आपटली, तर सोने झाले इतके स्वस्त

Gold-Silver Price Crash: केंद्रीय अर्थसंकल्प थोड्याच वेळात सादर होईल. पण त्यापूर्वी अजून एक मोठी आनंदवार्ता येऊन धडकली आहे. सोने आणि चांदीच्या किंमती दणकावून आपटल्या. चांदीच्या किंमतीत 27,000 रुपयांची मोठी घसरण झाली आहे. सोन्यातही मोठी पडझड झाली आहे.

Gold-Silver Price Crash: बजेटपूर्वीच ग्राहकांना आनंदवार्ता...चांदी 27000 रुपयांनी आपटली, तर सोने झाले इतके स्वस्त
सोने-चांदीत मोठी घसरण
Image Credit source: गुगल
| Updated on: Feb 01, 2026 | 10:57 AM

Gold-Silver Price Crash: सोने आणि चांदीच्या किंमतीत या आठवड्यात मोठी घसरण झाली. एका झटक्यात दोन्ही धातुच्या किंमती दणकावून आपटल्या. चांदी एकाच दिवसी 30 टक्क्यांहून अधिक स्वस्त झाली. तर सोन्यात जवळपास 17 टक्क्यांची घसरण झाली. रविवारी बजेटच्या दिवशी शेअर बाजारासह वायदे बाजारात MCX वर सोने-चांदीत ट्रेडिंग होत आहे. बाजार उघडताच सोने आणि चांदीच्या किंमतीत मोठी घसरण झाली. 1 किलो चांदीची किंमत बाजार उघडताच अचानक 27,000 रुपयांनी आपटली. तर सोने सुद्धा आपटले. सोन्याच्या किंमतीत 9 हजारांची घसरण झाली.

बाजार सुरू होताच चांदीत मोठी घसरण

गेल्या आठवड्याच्या अखेरच्या व्यापारी सत्रात सोने आणि चांदीत मोठी घसरण झाली. याच्या एक दिवसापूर्वीच गुरुवारी चांदीने इतिहास रचला. चांदीने पहिल्यांदाच 4 लाखांचा ऐतिहासिक टप्पा ओलांडला होता. 5 मार्च रोजी एक्सपाय होणाऱ्या चांदीचा भाव 4,20,048 रुपयांच्या ऐतिहासिक उच्चांकावर पोहचली. पण पुढील दिवशी चांदीत 1.28 लाखांची घसरण झाली. चांदीचा भाव 2,91,922 रुपये प्रति किलोवर घसरला. अर्थसंकल्पाच्या दिवशी रविवारी चांदीत जवळपास 9 टक्क्यांची म्हणजे 27,500 रुपयांची घसरण नोंदवण्यात आली. चांदीचा भाव 2,65,652 रुपयांच्या प्रति किलोग्रॅमवर घसरला.

सोने दणकावून आपटले

चांदी पाठोपाठ सोन्याच्या भावातही धडामधूम झाले. वायदे बाजारात 2 एप्रिल रोजी 24 कॅरेट 10 ग्रॅम सोने गुरूवारी 1,93,096 रुपयांच्या ऐतिहासिक उच्चांकावर पोहचले होते. त्यानंतर मात्र सोन्याला ही सलामी टिकवता आली नाही. सोने दणदण आपटले. सोने 42,247 रुपये प्रति 10 ग्रमने स्वस्त झाले. सोने 1,50,849 रुपये प्रति 10 ग्रॅमवर घसरले. तर रविवारी MCX वर व्यापारी सत्राची सुरुवात होताच सोन्याच्या किंमती 8.80 टक्क्यांनी घसरल्या. सोने 13,500 रुपये प्रति 10 ग्रॅमने स्वस्त झाले. सोन्याचा भाव 1,38,634 रुपये प्रति 10 ग्रॅम असा आहे.

कमोडिटी बाजारात स्वस्ताईचा अंदाज

बजेटपूर्वी रविवारी कमोडिटी बाजार सुरू असेल हे निश्चित होते. तर बजेटपूर्वी वायदा बाजारात सोने आणि चांदीच्या किंमतीत मोठी घसरण होईल हे अगोदरच मानल्या जात होते. त्यानुसार बाजारात ट्रेडिंग सुरु होताच दोन्ही धातुच्या किंमतीत मोठी घसरण झाली. त्यामुळे गुंतवणूकदारांना मोठा दिलासा मिळाला. येत्या काही दिवसात बाजारात या दोन्ही धातुच्या किंमतीत घसरण अपेक्षित आहे.