AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Price Today : सराफा बाजारात मोठा उलटफेर, सोन्याच्या किमती आज.. जाणून घ्या 10 ग्रॅमचे लेटेस्ट दर

Gold Rate Today 10 June 2026 Latest News Updates in Marathi: सलग दुसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात वाढ झाली आहे, तर आज चांदी स्वस्त झाली आहे. दहा प्रमुख शहरांमधील 24- कॅरेट, 22-कॅरेट आणि 18-कॅरेट सोन्याचे विक्रीदर जाणून घ्या. या किमतींमधील चढ-उतारांची कारणेही समजून घेऊया.

Gold Price Today : सराफा बाजारात मोठा उलटफेर, सोन्याच्या किमती आज.. जाणून घ्या 10 ग्रॅमचे लेटेस्ट दर
सोन्याचे दर आज वाढले की कमी झाले ?
| Updated on: Jun 10, 2026 | 9:12 AM
Share

Gold Rate Today In India : इराण आणि अमेरिका यांच्यातील संघर्ष पुन्हा वाढला आहे. होर्मुझजवळ अमेरिकेचे ‘अपाची’ हेलिकॉप्टर कोसळल्यानंतर, अमेरिकेने इराणमधील अनेक ठिकाणांवर मोठे हवाई हल्ले केले. याला प्रत्युत्तर म्हणून इराणनेही बहरीनमधील अमेरिकन तळांवर हल्ले केले. यामुळे युद्ध पुन्हा भडकण्याची चिन्हं दिसत असून अशांतता निर्माण झाली आहे. याचे जागतिक बाजारातही पदसाड उमटताना दिसतात. त्यातच कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली घसरण, अमेरिकन डॉलरचा कमकुवतपणा आणि अमेरिकन ट्रेझरी बाँडच्या परताव्यातील (yields) घट यांमुळे आज सलग दुसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात वाढ झाली. सोन्याचे दर चांगलेच वाढलेले आहेत. मात्र असं असलं तरी औद्योगिक मागणीतील मंदीमुळे चांदीवर दबाव दिसून आला. सलग दुसऱ्या दिवशी सोन्याच्या मूल्यात वाढ झाली आहे. एका दिवसाच्या घसरणीनंतर, आज 10 जून रोजी सोन्याच्या दरात सलग दुसऱ्या दिवशी वाढ झालेली दिसून आली.

गेल्या दोन दिवसांत 24 -कॅरेट सोन्याच्या दरात प्रति 10 ग्रॅममागे 1480 रुपयांनी, तर 22-कॅरेट सोन्याच्या दरात 1360 रुपयांनी वाढ झाली आहे. यापूर्वी, 8 जून रोजी 24 कॅरेट सोन्याचे दर प्रति 10 ग्रॅम 1040 रुपयांनी आणि 22-कॅरेट सोन्याचे दर 950 रुपयांनी कमी झाले होते. मात्र आज परिस्थिती वेगळी आहे. 10 जून रोजी देशाची राजधानी दिल्लीत 24-कॅरेट सोन्याच्या दरात प्रति 10 ग्रॅम 10 रुपयांनी, तर 22-कॅरेट सोन्याच्या दरातही 10 रुपयांनी वाढ झाली आहे. चांदीचा विचार करता, एका दिवसाच्या स्थिरतेनंतर आज तिच्या दरात घट झाली असून, प्रति किलो चांदीच्या दरात 100 रुपयांची घसरण झाली आहे.

देशातील प्रमुख शहरांमधील सोन्याचे दर

दिल्ली, मुंबई, चेन्नई, कोलकाता, बंगळुरूसह देशभरातील प्रमुख शहरांमध्ये 18 कॅरेट, 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याचे दर किती ते जाणून घेऊया.

शहर  24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचे दर 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचे दर 18 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचे दर
दिल्ली ₹1,53,320 ₹1,40,560 ₹1,15,030
मुंबई ₹1,53,170 ₹1,40,410 ₹1,14,880
कोलकाता ₹1,53,170 ₹1,40,410 ₹1,14,880
चेन्नई ₹1,54,920 ₹1,42,010 ₹1,19,210
बंगळुरू ₹1,53,170 ₹1,40,410 ₹1,14,880
हैदराबाद ₹1,53,170 ₹1,40,410 ₹1,14,880
लखनऊ ₹1,53,320 ₹1,40,560 ₹1,15,030
पाटणा ₹1,53,220 ₹1,40,460 ₹1,14,930
जयपुर ₹1,53,320  ₹1,40,560 ₹1,15,030
अहमदाबाद ₹1,53,220 ₹1,40,460 ₹1,14,930

चांदीच्या दरात झाली घसरण

सोन्यानंतर दुसरा मौल्यवान धातू चांदीच्या दरांबाबत बोलायचं झालं तर, एका दिवस स्थिर राहिल्यानंतर आज चांदीच्या दरात घट झाली आहे. यापूर्वी, 8 जून रोजी चांदीच्या दरात प्रति किलो 5000 रुपयांची घट झाली होती; तसेच 7 जून रोजी दर स्थिर राहण्याआधीच्या दोन दिवसांत त्यात 15 हजार रुपयांची कपात झाली होती. आज दिल्लीत चांदीचा दर प्रति किलो 100 रुपयांनी कमी होऊन 2,59,900 रुपये झाला आहे. मुंबई आणि कोलकाता यांसारख्या इतर प्रमुख महानगरांमध्येही याच दराने व्यवहार होत आहेत. मात्र, चेन्नईमध्ये चांदीचा दर प्रति किलो 2,69,900पये इतका असून, या चार प्रमुख महानगरांपैकी तेथे चांदी सर्वात महाग आहे.

Follow Us
अचानक विमानातून धूर येऊ लागला अन्...194 प्रवासी असलेल्या विमानाचं...
Mumbai | अचानक विमानातून धूर येऊ लागला अन्...194 प्रवासी असलेल्या विमानाचं इमर्जेन्सी लँडिंग
मोठी बातमी! मुख्यमंत्री फडणवीसांचे अधिकाऱ्यांना तातडीचे आदेश, म्हणाले.
मोठी बातमी! मुख्यमंत्री फडणवीसांचे अधिकाऱ्यांना तातडीचे आदेश, म्हणाले... नेमकी भानगड काय?
CJP चा सरकारला अल्टिमेटम! FIR मागे घ्या, नाहीतर मोठा निर्णय...
CJP On Students Protest | CJP चा सरकारला अल्टिमेटम! उद्यापर्यंत FIR मागे घ्या, नाहीतर मोठा निर्णय...
ओमराजे निंबाळकरांकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या खास शुभेच्छा, 'त्या'
ओमराजे निंबाळकरांकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या खास शुभेच्छा, 'त्या' पोस्टची तुफान चर्चा
अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेबाबत मोठी अपडेट समोर
शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर! अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेबाबत मोठी अपडेट समोर
MPSC पेपरफुटीवर अन्न व औषध प्रशासन आयुक्तांशी चर्चा का? मोठा खुलासा
MPSC पेपरफुटीवर अन्न व औषध प्रशासन आयुक्तांशी चर्चा का? तुकाराम मुंडेंसोबतच्या भेटीबाबत रोहित पवारांचा खुलासा
फडणवीस दिल्लीत गेले तर शिंदेच मुख्यमंत्री! भरत गोगावले यांच्या एका...
Bharat Gogawale | फडणवीस दिल्लीत गेले तर शिंदेच मुख्यमंत्री! भरत गोगावले यांच्या एका वक्तव्याने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ
पुणे स्टेशन परिसराची दुरवस्था, पावसामुळे रस्त्यावरील डांबरच वाहून गेलं
पुणे स्टेशन परिसराची दुरवस्था, पावसामुळे रस्त्यावरील डांबरच वाहून गेलं, व्हिडीओ व्हायरल होताच...
संसदेत मोठा गदरोळ! ओम बिर्लांची विरोधी पक्षांसोबत बैठक
Om Birla | संसदेत मोठा गदरोळ! ओम बिर्लांची विरोधी पक्षांसोबत बैठक; नेमकी कोणत्या विषयावर चर्चा?
आंदोलन संपलं मात्र अभिजीत दीपकेच्या त्या फोन कॉलची तुफान चर्चा, video
Abhijit Dipake | आंदोलन संपलं मात्र अभिजीत दीपकेच्या त्या फोन कॉलची तुफान चर्चा, व्हिडीओ पहाच