AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Price Today : सोन्याने भरवली धडकी, दर पुन्हा वाढले, आज 10 ग्रॅमसाठी..

Gold Price Today 13 June 2026 Latest News Updates in Marathi : अमेरिका आणि इराण यांच्यातील तणावावर राजनैतिक तोडगा निघण्याचे संकेत मिळाले असून त्याचा जगतिक बाजारावर सकरात्मक परिणाम दिसून आला. यामुळे मौल्यवान धातूंमधील गुंतवणूकदारांची रुची पुन्हा वाढली आहे. सोने आणि चांदीचे देशांतर्गत भाव हे देशांतर्गत आणि जागतिक अशा दोन्ही घटकांमुळे प्रभावित होतात. आज देशातील विविध शहरांत सोन्याचे भाव किती ?

Gold Price Today : सोन्याने भरवली धडकी, दर पुन्हा वाढले, आज 10 ग्रॅमसाठी..
सोन्याचे भाव वाढून आज कितीवर पोहोचले ?
| Updated on: Jun 13, 2026 | 8:42 AM
Share

देशांतर्गत सोन्याची घसरण अखेर शनिवारी थांबताना दिसत्ये. 13 जूनच्या सकाळी देशातल बहुतांश शहरात सोन्याच्या किमती चढ्या आहेत. देशाची राजधानी दिल्लीमध्ये 24-कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅमसाठी 1,45,830 रुपयांवर पोहोचला आहे. मुंबईत हा भाव प्रति 10 ग्रॅम 1,45,890 रुपये इतका आहे. याआधीच्या दिवशी, दिल्लीच्या सराफा बाजारात 99.9 % शुद्ध सोन्याच्या दरात 3000 रुपयांची वाढ होऊन तो प्रति 10 ग्रॅम 1,56,900 रुपयांवर गेला होता. आंतरराष्ट्रीय बाजारात ‘स्पॉट गोल्ड’चा (तात्काळ व्यवहारासाठीचे सोने) व्यापार प्रति औंस 4,206.88 डॉलर्स या दराने होत आहे. सोन्याचे दर वाढल्याने ग्राहकांची मात्र धास्ती वाढली आहे.

अमेरिका-इराणमध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून असलेल्या तणावावर राजनैतिक तोडगा निघण्याच्या संकेतांमुळे मौल्यवान धातूंमधील गुंतवणूकदारांची आवड पुन्हा वाढल्याचे दिसून आले. कच्च्या तेलाच्या किमतीतील घसरण आणि अमेरिकी डॉलर निर्देशांक व बॉण्ड उत्पन्नातील घट हे देखील याला कारणीभूत घटक आहेत. सोन्याचे दर यामुळे वाढताना दिसत आहेत.

देशातील प्रमुख शहरातील सोन्याचे भाव

दिल्लीत सोन्याची किंमत : राजधानी दिल्लीत 24 कॅरेट सोन्याची किंमत 1,45,830 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर 22 कॅरेटसाठी 1,36,360 रुपये मोजावे लागत आहेत.

मुंबई आणि कोलकाता: मुंबई आणि कोलकातामध्ये 22-कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 1,36,210 रुपये आहे, तर 24-कॅरेट सोन्याचा दर 1,45,890 रुपयांवर पोहोचला आहे.

चेन्नईमधील सोन्याचे दर: 24-कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 1,50,560 रुपये तर 22 -कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 1,38,010 रुपये आहे.

पुणे आणि बेंगळुरू येथील दर: ​​या दोन्ही शहरांमध्ये 24-कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅमसाठी 1,45,890 रुपये आणि 22 -कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 1,36,210 रुपये इतका आहे.

शहर 22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (₹) 24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (₹)
दिल्ली 136360 145830
मुंबई 136210 145890
अहमदाबाद 136260 148640
चेन्नई 138010 150560
कोलकाता 136210 145890
हैदराबाद 136210 145890
जयपुर 136360 145830
भोपाळ 136260 148640
लखनऊ 136360 145830
चंदीगड 136360 145830

चांदीची किंमत

आज सोन्याप्रमाणेच चांदीच्या दरातही मोठी वाढ झाली आहे. 13 जूनच्या सकाळपर्यंत चांदीचा दर प्रति किलो 2,60,100 रुपयांवर पोहोचला. आंतरराष्ट्रीय बाजारात ‘स्पॉट’ चांदीचा दर प्रति औंस 67.02 डॉलर्स इतका आहे. सोने आणि चांदीचे देशांतर्गत दर हे देशांतर्गत आणि जागतिक अशा दोन्ही घटकांमुळे प्रभावित होतात.

Follow Us
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
Chandrashekhar Bawankule | नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर! चंद्रशेखर बावनकुळेंनी जाहीर केले कठोर नियम, संपूर्ण व्हिडिओ पहा
मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; सदावर्तेंचा इशारा
Gunaratna Sadavarte on Manoj Jarange | मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; गुणरत्न सदावर्तेंचा जरांगे पाटलांना थेट इशारा
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
Pune | भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच रुग्णालयात नेलं, पण...
जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन्...
Ajay Baraskar | जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन् हैदराबाद गॅझेटच्या नावाखाली समाजाची दिशाभूल
आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून...
Nashik Protest | आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून मुंबईकडे लॉंग मार्च; 5 ऑक्टोबरला मुंबईत धडक
माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद
Madhuri Elephant | माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद; दृश्यांनी जिंकली सर्वांची मनं
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार