Gold-Silver Rate Today 16 March 2026 : सोमवारी सकाळीच खुशबखर ! दाणकन आपटले सोन्याचे दर, ज्वेलरकडे धाव घ्यायच्या आधी भाव तर वाचा…

Gold-Silver Rate Today 16 March 2026 Latest News Updates in Marathi: अमेरिकन डॉलर मजबूत झाल्यामुळे आणि मध्यवर्ती बँकेच्या बैठकीपूर्वी गुंतवणूकदारांनी घेतलेल्या सावधगिरीमुळे सोन्या-चांदीच्या किमती घसरल्या. मात्र असं असलं तरीही पश्चिम आशियातील तणावामुळे सुरक्षित मागणी कायम राहू शकते, ज्यामुळे किमतीत आणखी अस्थिरता येण्याची शक्यता आहे.

Gold-Silver Rate Today 16 March 2026 : सोमवारी सकाळीच खुशबखर ! दाणकन आपटले सोन्याचे दर, ज्वेलरकडे धाव घ्यायच्या आधी भाव तर वाचा...
सोन्या-चांदीच्या दरात घसरण
| Updated on: Mar 16, 2026 | 10:19 AM

Gold Price Today : सोमवारची सकाळी अनेकांसाठी खुशखबर घेऊन आली आहे. कारण सोमवारी सकाळी, आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोनं आणि चांदीच्या किंमती दणदणीत आपटल्या आहेत. 24 कॅरेट सोन्याची किंमत1450 रुपयांनी घसरून 1,57,630 रुपये प्रति 10 ग्रॅम झाली आहे. चांदीच्या किमतीही 4000 रुपयांनी घसरून 2,55,710 रुपये प्रति किलोग्रॅम झाल्या आहेत. जागतिक बाजारपेठ आणि कमोडिटी एक्सचेंजमधील कमकुवतपणाचा परिणाम देशांतर्गत बाजारपेठेवरही होत आहे. एमसीएक्सवरही सोने आणि चांदी दोन्हीच्या किमतीत घट झाली आहे. मात्र असं असलं तरी, गेल्या वर्षभरात दोन्हीच्या किमतींमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे.

आज किती सोन्याचे दर ?

भारतात 24 कॅरेट सोन्याची किंमत प्रति ग्रॅम 15,763 रुपये आहे. 10 ग्रॅम सोन्याची किंमत 1,57,630 रुपये आहे. 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 1,44,494 रुपये आहे. बाजारातील आकडेवारीनुसार, 100 ग्रॅम सोन्याची किंमत अंदाजे 15,76,300 रुपये आहे. आज सोन्याच्या किमतीत अंदाजे 0.91 टक्क्यांनी घट झाली आहे.

चांदीच दरही घसरले

सोन्यासोबतच चांदीच्या किमतीतही घसरण झाली आहे. भारतात 999 फाइन चांदीची किंमत प्रति किलोग्रॅम 2,55,710 रुपये नोंदवली गेली आहे. 10 ग्रॅम चांदीची किंमत 2557 रुपये आहे, तर 100 ग्रॅम चांदीची किंमत 25,571 रुपये आहे. आज चांदीच्या किमतीत सुमारे 1.54 टक्क्यांनी घट झाली आहे.

MCX ही कमकुवत

देशांतर्गत कमोडिटी एक्सचेंज MCXवरही सोन्या-चांदीच्या किमती घसरल्या आहेत. एमसीएक्सवर सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम सुमारे1,56,910 रुपये आहे. चांदीचा भाव प्रति किलोग्रॅम सुमारे 2,55,285 रुपये आहे. सोन्याचा भाव अंदाजे 0.96 टक्के आणि चांदीचा भाव अंदाजे 1.60 टक्के कमी झाला आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारातही सोने आणि चांदीच्या किमती घसरल्या आहेत. अमेरिकेच्या कॉमेक्स बाजारात सोने प्रति औंस $५०१३ च्या आसपास व्यवहार करत आहे, तर चांदी प्रति औंस $८० च्या आसपास पोहोचली आहे.

एका वर्षांत किती वाढल्या किमती ?

मात्र, सोनं आणि चांदी या दोन्ही धातूंनी दीर्घकाळात चांगला परतावा दिला आहे. गेल्या वर्षी सोन्याच्या किमती अंदाजे 78 % ने वाढल्या आहेत, तर चांदीच्या किमती अंदाजे 153% ने वाढल्या आहेत. बाजारातील तज्ञांचा असा विश्वास आहे की चढ-उतार असूनही, हे मौल्यवान धातू गुंतवणूकीचा चांगला पर्याय आहे.

Follow Us