Gold-Silver Rate : पंधरवाड्यात सुवर्णझेप! सोन्याच्या दरात 2500 रुपयांची जबरदस्त तेजी, आज भाव वधारले की झाले कमी?

| Updated on: Nov 17, 2022 | 3:37 PM

Gold-Silver Rate : सोन्याच्या भावात गेल्या पंधरवाड्यात मोठी तेजी आली आहे..

Gold-Silver Rate : पंधरवाड्यात सुवर्णझेप! सोन्याच्या दरात 2500 रुपयांची जबरदस्त तेजी, आज भाव वधारले की झाले कमी?
आजचे सोने-चांदीचे दर
Image Credit source: सोशल मीडिया
Follow us on

नवी दिल्ली : लग्न सराईत सोने-चांदीचे दर (Gold-Silver Rate) सातत्याने तेजीत होते. सोन्याने तर किंमतीत मोठी झेप घेतली. सोन्याचे दर सातत्याने चढे आहेत. पण आज, गुरुवारी, दिनांक 17 नोव्हेंबर 2022 रोजी सोने-चांदीच्या भावात थोडीशी घसरण (Decline) दिसून आली. तरीही गेल्या महिन्यापेक्षा सोने आणि चांदीचे दर सातत्याने आगेकूच करत आहेत.

आज, गुरुवारी, 24 कॅरेट सोन्याचे दर 52,893 रुपयांवर व्यवहार करत आहेत. सोन्याच्या दरात आज 210 रुपयांची घसरण झाली. काल सोन्याचे दर संध्याकाळी 53,000 रुपयांवर गेले होते. परंतु आज बाजारात घसरण दिसून आली.

परंतु, सोन्यातील गुंतवणूकदारांच्या मनात सोन्याच्या उंच आलेखाविषयी जराही किंतू-परंतु नाही. त्यांच्या मते, येत्या दिवसात सोन्याला झळाळी मिळेल. सोन्याचे भाव 55 हजार रुपयांच्या पल्ला गाठतील. तर काही जणांना सोन्याचे प्रति 10 ग्रॅम भाव 56,600 रुपये होतील असा अंदाज आहे.

हे सुद्धा वाचा

काल सराफा बाजारात 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचे दर 53,094 रुपये होता. जर गेल्या 15 ते 20 दिवसांचा आलेख पाहता, सोन्याचे दर 2,500 रुपयांनी वाढल्याचे दिसून आले. आज सोन्याचा भाव 52,893 रुपये होता.

यापूर्वी सोन्याचा उच्चांकी भाव 56,600 रुपये होता. त्यानंतर सोन्याचा आपटी बार सुरु झाला होता. सोन्याचा दरा 50,000 रुपयांच्या ही कमी झाला होता. आता 3,700 रुपयांनी हा उच्चांक मोडीत निघू शकतो.

पण सोन्यातील ही उच्चांकी उडी कधी पूर्ण होईल, हे आताच सांगता येत नाही. पण गुंतवणूकदारांना सोन्याकडून मोठी आशा आहे. चांदीत मात्र सातत्याने घसरण सुरु आहे. पण गेल्या महिन्यापेक्षा चांदीच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे. आज 17 नोव्हेंबर रोजी एक किलो चांदाची भाव 61,300 रुपये होता. काल हाच भाव 62,594 रुपये होता.

24 कॅरेट सोन्याला शुद्ध सोने म्हणतात. त्यात इतर कोणत्याही प्रकारचा धातू मिसळत नाही. याला 99.9 टक्के शुद्धतेचे सोने म्हणतात. 22 कॅरेट सोन्यात 91.67 टक्के शुद्ध सोनं असतं.

इतर 8.33 टक्क्यांमध्ये इतर धातू असतात. त्याचबरोबर 21 कॅरेट सोन्यात 87.5 टक्के शुद्ध सोनं असतं. 18 कॅरेटमध्ये 75 टक्के शुद्ध सोनं असतं आणि 14 कॅरेट सोन्यात 58.5 टक्के शुद्ध सोनं असतं.