AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold-Silver Rate : लग्न सराईत सोने महाग, तर चांदीच्या किंमती घसरल्या, आजचा भाव काय?

 Gold-Silver Rate : सोने पुन्हा एकदा चकाकले आहे, तर चांदीच्या किंमती घसरल्या आहेत..जाणून घ्या आजचे भाव काय आहे ते..

Gold-Silver Rate : लग्न सराईत सोने महाग, तर चांदीच्या किंमती घसरल्या, आजचा भाव काय?
सोने वधरले, चांदीत घसरणImage Credit source: सोशल मीडिया
| Updated on: Nov 16, 2022 | 3:36 PM
Share

नवी दिल्ली : तुळशी विवाहानंतर भारतात लग्न सराईचा (Wedding Season) हंगाम सुरु होतो. भारतीय सराफा बाजारात (Sarafa Market) सोन्याचे दर (Gold Rate) तेजीत आहेत. अनेक दिवसांपासून 50 हजारी असलेल्या सोन्याने मजल दरमजल करत 55,000 रुपयांकडे वाटचाल सुरु केली आहे. त्यामुळे वधू-वरांकडील मंडळींना घाम फुटला आहे.

बुधवारी सकाळी सोन्याच्या किंमती पुन्हा वधरल्या. तर चांदीच्या किंमतीत (Silver Price) मामूली घसरण दिसून आली. ताज्या घडामोडीनुसार, 999 शुद्धतेचे 10 ग्रॅम सोन्याचा भाव आज 52 हजार रुपयांच्या पुढे गेला. तर एक किलो चांदीचा दर 61 हजार रुपये होता.

ibjarates.com नुसार, 999 शुद्धतेचे 10 ग्रॅम सोन्याचा दर आज, बुधवारी 52,952 रुपये होता. तर 995 शुद्धतेच्या 10 ग्रॅम सोन्याचा भाव 52,740 रुपये, 916 शुद्ध 10 ग्रॅम सोन्याचा दर 48,504 रुपये, 750 शुद्ध 10 ग्रॅम सोन्याचा भाव 39,714 रुपये होता.

तर 585शुद्ध सोन्याचा दर 30,977 रुपये झाला. सोन्याचे दरात पूर्वीपेक्षा अधिक वाढ झालेली आहे. सोन्याची वाटचाल 55 हजारांकडे सुरु आहे. 999 शुद्ध एक किलो चांदीचा दर घसरुन 61,784 रुपये झाला.

999 शुद्धतेचे 10 ग्रॅम सोन्यात आज 129 रुपयांची वाढ झाली. 995 शुद्धतेच्या 10 ग्रॅम सोने आज 129 रुपयांनी वधरले. 916 शुद्ध 10 ग्रॅम सोन्याचा दर 118 रुपये, 750 शुद्ध 10 ग्रॅम सोने 97 रुपये, 585 शुद्ध सोन्यात 10 ग्रॅम मागे 75 रुपयांची वाढ दिसून आली. तर चांदी किलोमागे 486 रुपयांनी शुद्ध झाली.

सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी एक अ‍ॅप बनवण्यात आले आहे. ‘BIS Care app’ या अ‍ॅपच्या माध्यमातून ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. तसेच या अ‍ॅपच्या मदतीने आपण फक्त सोन्याची शुद्धताच तपासू शकत नाही तर यासंबंधित तक्रारीसुद्धा नोंदवू शकतो.

24 कॅरेट सोन्याला शुद्ध सोने म्हणतात. त्यात इतर कोणत्याही प्रकारचा धातू मिसळत नाही. याला 99.9 टक्के शुद्धतेचे सोने म्हणतात. 22 कॅरेट सोन्यात 91.67 टक्के शुद्ध सोनं असतं. इतर 8.33 टक्क्यांमध्ये इतर धातू असतात. त्याचबरोबर 21 कॅरेट सोन्यात 87.5 टक्के शुद्ध सोनं असतं.

18 कॅरेटमध्ये 75 टक्के शुद्ध सोनं असतं आणि 14 कॅरेट सोन्यात 58.5 टक्के शुद्ध सोनं असतं.  सोन्याच्या प्रतीनुसार त्याच्या किंमतीतही फरक पडतो. तसेच स्थानिक कराचाही समावेश होऊन ग्राहकांना भावानुसार रक्कम द्यावी लागते.

Follow Us
मराठा आंदोलनातून धक्कादायक दावा; ललित तारख यांचा जरांगेंवर गंभीर...
मराठा आंदोलनातून धक्कादायक दावा; ललित तारख यांचा जरांगेंवर गंभीर आरोप
जनतेची माफी मागा; एकनाथ शिंदेंचा राहुल गांधी आणि इंडिया आघाडीवर...
जनतेची माफी मागा; एकनाथ शिंदेंचा राहुल गांधी आणि इंडिया आघाडीवर हल्लाबोल
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?