Gold Price Today : घेऊ की नको घेऊ? आता नो टेन्शन, ही संधी पुन्हा मिळणार नाही; सोन्या चांदीचे भाव थेट…

Gold Price Today 29 April 2026 atest News Updates in Marathi: आज सोने आणि चांदीच्या दरात हालचाल होताना दिसत आहे. वेगवेगळ्या कॅरेटच्या सोन्याचे दरही बदलले आहेत. तुम्ही सोनं किंवा चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर आधी तुमच्या शहरातील लेटेस्ट दर घ्या जाणून..

Gold Price Today : घेऊ की नको घेऊ? आता नो टेन्शन, ही संधी पुन्हा मिळणार नाही; सोन्या चांदीचे भाव थेट...
सोन्याचे भाव किती ?
| Updated on: Apr 29, 2026 | 10:46 AM

आज बुधवार, 29 एप्रिल रोजी, विविध बाजारांमध्ये सोने आणि चांदीच्या किमतींमध्ये संमिश्र व्यवहार होताना दिसत आहे. किरकोळ बाजारात किमतींमध्ये किंचित घट झाली असली तरी, एमसीएक्सवर दोन्ही धातूंमध्ये किरकोळ चढ-उतार दिसून येत आहेत. एमसीएक्सवर, जून 2026ला मुदत संपणारं सोनं प्रति 10 ग्रॅम सुमारे 1.50 लाखांना विकलं जात आहे. तर जुलै 2026 मध्ये मुदत संपणारे चांदीची किंमत 2.44 लाख प्रति किलो इतकी आहे. दरम्यान, आंतरराष्ट्रीय बाजारातही सोने आणि चांदीच्या किमती घसरत असून त्यांच्यावर दबाव आहे. एकूणच, मौल्यवान धातूंच्या बाजारात सध्या किंचित मंदी दिसून येत आहे.

सोनं-चांदीचे दर (Gold-Silver Price )

Good Returns च्या माहितीनुसार, आज सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या दरात किंचित घसरण झाली आहे. 24-कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम सुमारे 1,50,920 रुपये तर 22-कॅरेट सोन्याचा भाव 1,38,340 रु आणि 18-कॅरेट सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम सुमारे 1,13,190 इतका आहे. चांदीच्या दरातही घट झाली असून, तिचा भाव प्रति किलोग्रॅम सुमारे 2,59,900 रुपयांवर पोहोचला आहे.

MCX पर सोनं-चांदीचे भाव किती ?

MCX (मल्टी कमोडिटी एक्सचेंज) वर आज सोने आणि चांदीच्या दरात किंचित चढ-उतार दिसून आला. जून 2026 एक्सपायरी वालं 10 ग्रॅम सोनं 1.50 लाखांना असून त्यात किंचीत वाढ झालीय तर जुलै 2026 एक्सपायरी असलेल्या चांदीचा दर सध्या प्रति किलोसाठी 2.44 लाख इतका आहे. त्यातही किंचित वाढ दिसून येत आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीच्या दरात घसरण

आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीच्या दरात घट झाली आहे. सोन्याच्या दरात प्रति औंस १.८१ टक्क्यांनी, तर चांदीच्या दरात १.७७ टक्क्यांनी घट झाली आहे.

तुमच्या शहरात सोन्याचा लेटेस्ट रेट किती ? (Today 24 Carat Gold Rate Per Gram in India)

शहर 24 कॅरेट 22 कॅरेट 18 कॅरेट
चेन्नई ₹15,381 ₹14,099 ₹11,759
मुंबई ₹15,092 ₹13,834 ₹11,319
दिल्ली ₹15,107 ₹13,849 ₹11,334
कोलकाता ₹15,092 ₹13,834 ₹11,319
बंगळुरू ₹15,092 ₹13,834 ₹11,319
हैदराबाद ₹15,092 ₹13,834 ₹11,319
केरळ ₹15,092 ₹13,834 ₹11,319
पुणे ₹15,092 ₹13,834 ₹11,319
बडोदा ₹15,097 ₹13,839 ₹11,324
अहमदाबाद ₹15,097 ₹13,839 ₹11,324

तुमच्या शहरात चांदचा लेटेस्ट रेट किती ? (Latest Silver Price )

शहर 10 ग्रॅम 100 ग्रॅम 1 किलो
चेन्नई ₹2,649 ₹26,490 ₹2,64,900
मुंबई ₹2,599 ₹25,990 ₹2,59,900
दिल्ली ₹2,599 ₹25,990 ₹2,59,900
कोलकाता ₹2,599 ₹25,990 ₹2,59,900
बंगळुरू ₹2,599 ₹25,990 ₹2,59,900
हैदराबाद ₹2,649 ₹26,490 ₹2,64,900
केरळ ₹2,649 ₹26,490 ₹2,64,900
पुणे ₹2,599 ₹25,990 ₹2,59,900
बडोदा ₹2,599 ₹25,990 ₹2,59,900
अहमदाबाद ₹2,599 ₹25,990 ₹2,59,900

 

Follow Us