Gold Rate Today 31st July 2026 : सोन्याच्या दरात यू-टर्न ! आज किती वाढले भाव ? 1 तोळा सोन्यासाठी आज..
Gold Rate Today 31st July 2026 atest News Updates in Marathi : देशातील सोने आणि चांदीचे दर हे केवळ देशांतर्गत घटकांवरच नव्हे, तर जागतिक बाजारातील घडामोडींवरही अवलंबून असतात. आज दिल्ली मुंबईसह देशातील प्रमुख शहरात सोन्याच्या किमतींनी किती टप्पा गाठला ते जाणून घेऊया.

गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या सोन्याच्या दरातील घसरणीला अखेर ब्रेक लागला आहे. 31 जुलैच्या सकाळी देशातील बहुतांश प्रमुख शहरांमध्ये सोन्याच्या किमतीत वाढ नोंदवण्यात आली, त्यामुळे ग्राहकांचं टेन्शन मात्र वाढल्याचं दिसत आहे. जागतिक बाजारात सोन्याच्या दरात झालेली तेजी आणि देशांतर्गत सराफा व्यापाऱ्यांकडून वाढलेली खरेदी यामुळे सोन्याच्या भावाला पुन्हा आधार मिळाला असून परिणामी सोन्याची झळाली पुन्हा वाढली आहे. राजधानी दिल्लीमध्ये 24 कॅरेट सोन्याचा दर वाढून प्रति 10 ग्रॅम 1,44,490 रुपये इतका झाला आहे, तर मुंबई, कोलकाता, चेन्नई, पुणे आणि बेंगळुरू येथे 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 1,44,340 रुपयांपर्यंत पोहोचला आहे. 22 कॅरेट सोन्याचा दर दिल्लीमध्ये 1,32,260 रुपये तर मुंबईसह इतर प्रमुख शहरांमध्ये 22 कॅरेटच्या प्रति 10 ग्रॅम सोन्यासाठी आज 1,32,310 22 रुपये मोजावे लागणार आहेत.
फेडरल रिझर्व्हच्या निर्णयाचा परिणाम
अमेरिकेच्या केंद्रीय बँकेने (फेडरल रिझर्व्ह) जुलै महिन्यातील धोरणात्मक बैठकीत बेंचमार्क व्याजदर 3.50 ते 3.75 टक्के या पातळीवर कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. व्याजदरात कोणताही बदल न झाल्याने सोने आणि चांदीसारख्या मौल्यवान धातूंमध्ये गुंतवणुकीला चालना मिळते. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किमतीत तेजी दिसून आली असून त्याचा परिणाम देशांतर्गत बाजारावरही झाला आहे. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, आंतरराष्ट्रीय बाजारात स्पॉट गोल्डचा दर प्रति औंस 4,096.29 डॉलर, तर ऑगस्ट डिलिव्हरीसाठीचा यूएस गोल्ड फ्युचर्सचा दर प्रति औंस 4,094.10 डॉलर इतका आहे.
देशातील काही महत्वाच्या शहरातील सोन्याचे आजचे दर
दिल्ली: 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 1,44,490 रुपये, तर 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 1,32,260 रुपये आहे.
मुंबई आणि कोलकाता: 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 1,32,310 रुपये, तर 24 कॅरेट सोन्यासाठी प्रति 10 ग्रॅम 1,44,340 रुपये मोजावे लागणार आहेत.
चेन्नईमध्ये सोनं महाग असून 24 कॅरेटच्या 10 ग्रॅम सोन्याची किंमत 1,44,340 रुपये, तर 22 कॅरेटचा दर प्रति 10 ग्रॅम 1,32,310 रुपयांपर्यंत पोहोचली आहे.
पुणे आणि बंगळुरू: या दोन्ही शहरांमध्ये 24 कॅरेट सोन्याची किंमत 1,44,340 रुपये असून 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 1,32,310 रुपये इतका आहे.
| शहर | 22 कॅरेट सोन्याची आजची किंमत (₹) | 24 कॅरेट सोन्याची आजची किंमत (₹) |
| दिल्ली | 132260 | 144490 |
| मुंबई | 132310 | 144340 |
| अहमदाबाद | 132360 | 144390 |
| चेन्नई | 132310 | 144340 |
| कोलकाता | 132310 | 144340 |
| हैदराबाद | 132310 | 144340 |
| जयपुर | 132260 | 144490 |
| भोपाळ | 132360 | 144390 |
| लखनऊ | 132260 | 144490 |
| चंदीगड | 132260 | 144490 |
देशात सोन्याची मागणी घटली
एप्रिल ते जून 2026 या तिमाहीत भारतातील सोन्याची मागणी वार्षिक आधारावर 6 टक्क्यांनी घटून 131.4 टन इतकी राहिली. जागतिक सुवर्ण परिषदेच्या (World Gold Council) अहवालानुसार, मागील वर्षी याच कालावधीत सोन्याची एकूण मागणी 139.7 टन होती. तर जागतिक स्तरावर एप्रिल-जून 2026 तिमाहीतील सोन्याची मागणी वार्षिक आधारावर 1,269 टनांवर स्थिर राहिली. जून 2025 तिमाहीत ही मागणी 1,268.6 टन होती.
चांदीचा दर
सोन्याच्या तुलनेत दुसरा मौल्यवान धातू असलेल्या चांदीच्या किमतीत मात्र देशांतर्गत घसरण कायम आहे. 31 जुलैच्या सकाळी चांदीचा दर प्रति किलो 2,34,900 रुपये इतका आहे. रॉयटर्सच्या माहितीनुसार, आंतरराष्ट्रीय बाजारात स्पॉट सिल्व्हर (हाजिर चांदी) प्रति औंस 58.98 डॉलर या दरावर पोहोचली आहे. देशातील सोने आणि चांदीचे दर हे केवळ देशांतर्गत घटकांवरच नव्हे, तर जागतिक बाजारातील घडामोडींवरही अवलंबून असतात.
