Gold Price Today | सोने खरेदी करणाऱ्यांची लॉटरी, सोन्याच्या दरात इतक्या हजार रुपयांची घट

| Updated on: Feb 27, 2023 | 4:15 PM

लग्नसराईमुळे सोने खरेदीत आणखी वाढ झाली आहे. जर तुम्हीही सोने खरेदी करण्याच्या तयारीत असाल, तर तुमच्यासाठी कामाची आणि तितकीच महत्वाची बातमी आहे.

Gold Price Today | सोने खरेदी करणाऱ्यांची लॉटरी, सोन्याच्या दरात इतक्या हजार रुपयांची घट
Gold rate
Image Credit source: Social Media
Follow us on

Gold Price Today | अवघ्या काही दिवसांवर लग्नसराईला सुरुवात होणार आहे. त्याआधीच आता सोने खरेदीची लगबग सुरु झाली आहे. सोने खरेदी ही वर्षभर सुरुच असते. मात्र आता लग्नसराईमुळे खरेदीत आणखी वाढ झाली आहे. जर तुम्हीही सोने खरेदी करण्याच्या तयारीत असाल, तर तुमच्यासाठी कामाची आणि तितकीच महत्वाची बातमी आहे. सोन्याचा भाव आज 55 हजार रुपयांवर ट्रेड करत आहे. तसेच सोन्याच्या दरात आज (27 फेब्रुवारी) रेकॉर्ड ब्रेक घसरण झाली आहे. सोन्याच्या दरात आज रेकॉर्ड हायपेक्षा 3 हजार 500 रुपयांची घसरण झाली. तर चांदीचा दर हा 63 हजार 800 रुपयांच्या आसपास आहे. सोन्याच्या दरात गेल्या आठवड्यातही घसरण पाहायला मिळाली होती.

मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सोन्याच्या किंमती घसरल्याचं दिसून येत आहे. एमसीएक्सवर सोन्याच्या दरात आज 0.16 ने घसरण झाली. त्यामुळे सोन्याचे प्रति 10 ग्रॅमचे दर हे 55 हजार 342 रुपयांवर ट्रेड करत आहे. सोन्याचा दर 2 फेब्रुवारीला रेकॉर्ड हायवर होता. तेव्हा म्हणजेच 2 फेब्रुवारीला सोन्याच्या 10 ग्रॅमचा भाव हा 58 हजार 882 रुपये इतका होता. त्यानुसार सोन्याच्या किंमतीत 3 हजार 500 रुपयांपेक्षा जास्त घसरण दिसून येत आहे.

चांदीही स्वस्त

मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर चांदीचे दरही घसरले आहेत. चांदीच्या दरात 1.10 टक्क्यांनी घसरण आहे. या घसरणीसह 1 किलो चांदीचे दर हे 63 हजार 821 रुपये आहे. चांदीच्या दरात आज एकूण 2 हजार 250 रुपयांनी घट पाहायला मिळाली.

हे सुद्धा वाचा

सोने खरेदी आधी घ्यायची खबरदारी

ग्राहकांची फसवणूक हा प्रकार काही नवीन नाही. सोने खरेदीसाठी प्रत्येक जण बचत करुन पैसे साठवतो. मात्र सोने खरेदी करताना ग्राहकांची फसवणुकीची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सोने खरेदी करताना काय खबरदारी घ्यायची, हे माहिती असणं महत्वाचं आहे.

सोनं खरेदी करताना दागिन्यावर हॉलमार्क आहे की नाही, हे तपासून पाहा. हॉलमार्क पाहूनच सोनं खरेदी करा. सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी सरकारकडून एक मोबाईल app ही जारी करण्यात आलं आहे. या एपचं ‘BIS Care App’ असं नाव आहे. या एपच्या मदतीने तुम्ही सोन्याची शुद्धता तपासू शकतो. तसेच सोनं खरं आहे नकली हे जाणून घेऊ शकता. सोबतच काही तक्रार असेल, तर ती ही यावरुन नोंदवू शकता.

तसेच घर बसल्याही सोन्याचे दर जाणून घेऊ शकता. सोने-चांदीचे दर जाणून घेण्यासाठी 8955664433 या मोबाईल नंबरवर मिस्ड कॉल द्यावा. किंवा या नंबरवर मेसेजही करु शकता.

शहरनिहाय सोन्याचे आजचे दर

मुंबई

27 फेब्रुवारी, 51 हजार 350 रुपये प्रति तोळा, 22 कॅरेट.

27 फेब्रुवारी, 56 हजार 20 रुपये प्रति तोळा, 24 कॅरेट.

पुणे

27 फेब्रुवारी, 51 हजार 350 रुपये प्रति तोळा, 22 कॅरेट.

27 फेब्रुवारी, 56 हजार 20 रुपये प्रति तोळा, 24 कॅरेट.