Gold Rate Today : 20 टक्क्यांनी स्वस्त झालं सोनं, पटापट चेक करा तुमच्या शहरातले ताजे दर

| Updated on: Mar 24, 2021 | 1:09 PM

जागतिक बाजारातील सकारात्मक संकेत मिळाल्यामुळे एप्रिल वायद्याच्या चांदीच्या किंमती (Silver Price) मध्ये 0.34 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

Gold Rate Today : 20 टक्क्यांनी स्वस्त झालं सोनं, पटापट चेक करा तुमच्या शहरातले ताजे दर
सोने दर
Follow us on

Gold/Silver Rate Today : दोन दिवसांच्या घसरणीनंतर बुधवारी सोन्याच्या किंमतीत वाढ झाल्याचं समोर आलं आहे. बुधवारी, मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर एप्रिल वायदा सोन्याचे भाव (Gold Price) 0.45 टक्क्यांनी म्हणजेच 202 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले आहेत. जागतिक बाजारातील सकारात्मक संकेत मिळाल्यामुळे एप्रिल वायद्याच्या चांदीच्या किंमती (Silver Price) मध्ये 0.34 टक्क्यांनी वाढ झाली आहे. म्हणजे 223 रुपये प्रति किलो. किंमत वाढल्यानंतरही सोन्याची किंमत विक्रमी उच्चांपेक्षा 20 टक्के कमी आहे. (gold silver rate on 24 march 2021 gold rates on mcx todays Business NEws)

बुधवारी मल्टी कमोडिटी एक्सचेंजमध्ये एप्रिल फ्युचर्स सोन्याच्या किंमती 202 रुपयांनी वाढून 44,848 रुपये प्रति 10 ग्रॅम झाली. गेल्या ट्रेडिंग सत्रात सोने 44,646 रुपयांवर बंद झाले होते. त्याचबरोबर मे फ्यूचर्स चांदीचा दर 253 रुपयांनी वाढून 65,225 रुपये प्रति किलो झाला. मंगळवारी चांदीचा भाव एमसीएक्सवर 64,972 रुपयांवर आला.

सोन्याच्या वाढीचं कारण काय?

अमेरिकन बाँडच्या उत्पन्नातील सुधारणा (US bond yields) , कोरोनाच्या प्रकरणात वाढ, यूएस-चीनमधील तणाव, व्याज दराबाबत फेडच्या भूमिकेमुळे आणि प्रमुख अर्थव्यवस्थांमधील आर्थिक आकडेवारीत सुधारणा झाल्यामुळे सोन्याचा वेग वेगात आहे. डॉलर मजबूत असूनही आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किंमती वाढल्या आहेत. स्पॉट सोन्याची किंमत 0.3 टक्क्यांनी वाढून 1731.75 डॉलर प्रति औंस झाली. यासह चांदीचा भाव 0.3 टक्क्यांनी वधारला आणि 25.16 डॉलर प्रति औंस झाला.

तुमच्या शहरातले सोन्याचे दर

गुड रिटर्न्सच्या वेबसाईटनुसार, आज 22 कॅरेट सोन्याचे भाव चेन्नईमध्ये 42,300 रुपये, मुंबईत 42,900 रुपये, दिल्लीत 44,040 रुपये, कोलकातामध्ये 44,390 रुपये, बंगळुरूमध्ये 41,900 रुपये, पुण्यात 42,990 रुपये आहेत. अहमदाबादमध्ये, 44,370 रुपये, जयपूर-लखनऊमध्ये 44,040 रुपये आणि पाटण्यात 42,990 रुपये प्रति दहा ग्रॅम आहे.

याच पद्धतीने 24 कॅरेट सोन्याचे दर पाटण्यात 43,990 रुपये, जयपूर-लखनऊमध्ये 48,040 रुपये, अहमदाबादमध्ये 46,240 रुपये, पुण्यात 43,990 रुपये, बेंगळुरूमध्ये 45,700 रुपये, कोलकातामध्ये 46,990 रुपये, दिल्लीत 48,040 रुपये, मुंबईत 43,990 रुपये आहेत. चेन्नई प्रति 10 ग्रॅम 46,140 रुपये आहे. (gold silver rate on 24 march 2021 gold rates on mcx todays Business NEws)

संबंधित बातम्या – 

फक्त 700 रुपयामध्ये मिळेल LPG गॅस सिलेंडर, ‘हा’ आहे प्रोमो कोड

कमी पैशात मोदी सरकारच्या ‘या’ योजनांमध्ये करा गुंतवणूक, उत्तम आहे फायदा

Good News! लॉकडाऊनमध्ये नाही मिळाले रद्द केलेल्या फ्लाइटचे पैसे? आता ‘या’ तारखेपर्यंत येतील खात्यात

(gold silver rate on 24 march 2021 gold rates on mcx todays Business NEws)