
या आठवड्यात सोन्याने मोठी घोडदौड केली. सोने दोन हजार रुपयांनी वधारले. त्यामुळे ग्राहकांचा जीव टांगणीला लागला. रेकॉर्ड मागून रेकॉर्ड मोडणाऱ्या सोन्याने ग्राहकांच्या तोंडचे पाणी पळाले. सोने मोडणाऱ्यांना फायदा झाला. तर खरेदीदारांच्या खिशाला फटका बसला. चांदी पण नरमली आहे. आता 18K, 22K, 24K सोन्याच्या तर एक किलो चांदीचा भाव जाणून घ्या..(Gold Silver Price Today 22 February 2025 )
सोन्याने घेतला ब्रेक
चार दिवसांपासून सोन्याने मोठी घोडदौड केली. सोन्याच्या किंमतीत तुफान आले होते. सोने चार दिवसात 2000 रुपयांनी वधारले होते. सोमवारी सोने 550 रुपयांनी, मंगळवारी 330 रुपयांनी भाव वधरला. तर बुधवारी सोन्याने 700 रुपयांची मुसंडी मारली. गुरूवारी 400 रुपयांनी दर वधारले. तर शुक्रवारी सोने 640 रुपयांनी आपटले. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 80,300 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 87,550 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर आज सकाळच्या सत्रात सोने पुन्हा कुरघोडी करण्याचे संकेत मिळत आहेत.
चांदीतही घसरण
5 फेब्रुवारी रोजी 1000 रुपयांनी तर 14 फेब्रुवारी रोजी हजाराची वाढ चांदीने नोंदवली होती. तेव्हापासून चांदीत नरमाईचे धोरण दिसले. तर काल 100 रुपयांची घसरण झाली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 1,00,300 रुपये इतका आहे.
14 ते 24 कॅरेटचा भाव काय
आज सकाळच्या सत्रात इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA) 24 कॅरेट सोने 86,092, 23 कॅरेट 85,747, 22 कॅरेट सोने 78,860 रुपयांवर आहे. 18 कॅरेट आता 64,569 रुपये, 14 कॅरेट सोने 50,364 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे. एक किलो चांदीचा भाव 97,147 रुपये इतका झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.
घरबसल्या जाणून घ्या भाव
सोने-चांदीच्या किंमती तुम्हाला घरबसल्या पण जाणून घेता येईल. सोने-चांदीचे ताजे भाव जाणून घेता येईल. त्यात स्थानिक कर, इतर करांचा भर पडतो. त्यामुळे शहरानुसार किंमतीत तफावत दिसून येते. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) हे भाव जाहीर करेल. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सुट्या, शनिवारी आणि रविवार हे दिवस सोडून या किंमती जाहीर करण्यात येतात. ग्राहक 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन सर्व कॅरेटचे भाव जाणून घेऊ शकतात.