प्रेमानंद महाराजांमुळे 17 वर्षीय तरुणाची चांदीच चांदी, रोज 5 हजारांची कमाई, लोक म्हणतात हे तर पुण्य…
Premanand Maharaj Yatra : समाज माध्यमावर लोकप्रिय प्रेमानंद महाराज रोज पदयात्रा करतात. त्यांचे भल्या पहाटे दर्शन व्हावे यासाठी रस्त्याच्या दुतर्फा मोठी गर्दी असते. भाविक भक्त त्यांची वाट पाहतात. या पदयात्रेमुळे एका 17 वर्षीय तरुणाला खास लॉटरी लागली आहे.

प्रेमानंद महाराज हे सोशल मीडियावर अत्यंत लोकप्रिय आहेत. त्यांचे किर्तन, त्यांचा उपदेश, त्यांचे कथासार ऐकण्यासाठी, भागवत सार ऐकण्यासाठी अनेकजण युट्यूब वा इतर समाज माध्यमांचा वापर करतात. अनेक सेलिब्रिटी, दिग्गज त्यांच्या दरबारात हजेरी लावतात. त्यांना मनातील प्रश्न, अडचणी विचारतात. ते कोणतेही कर्मकांड सांगत नाहीत. नाम जपाचा महिमा सांगतात. चमत्कार, पाखंडावर आसूड ओढतात. साध्या भक्तीने सुद्धा जीवन जगता येते, असे प्रबोधन ते करतात. प्रेमानंद महाराज रोज पदयात्रा करतात. त्यांचे भल्या पहाटे दर्शन व्हावे यासाठी रस्त्याच्या दुतर्फा मोठी गर्दी असते. भाविक भक्त रस्त्यावर त्यांची वाट पाहतात. या पदयात्रेमुळे एका 17 वर्षीय तरुणाला खास लॉटरी लागली आहे. हा तरूण रोज 5 हजार रुपयांची कमाई करतो. पदयात्रेमुळे त्याला पुण्यच मिळत नाही तर त्याची चांगली कमाई सुद्धा होते.
फुल विक्रीतून तरुणाची मोठी कमाई
प्रेमानंद महाराज रोज पद यात्रा करतात. त्यांच्या या पदयात्रेवेळी अनेक भाविक हे त्यांच्या मार्गावर फूल उधळतात. या रस्त्यावर जणू फुलांचा सडा पडतो. पाकळ्यांनी रस्ता भरून जातो. 17 वर्षांचा शांतनू यामधून कमाई करतो. तो या पद मार्गावर फुल विक्रीचा व्यवसाय करतो. अनेक ठिकाणी लोक त्याच्याकडून फूल खरेदी करतात. या फुलाच्या विक्रीतून त्याची मोठी कमाई होते. त्यावर त्याचे घर चालते.
शांतनू म्हणतो की, तो प्रत्येक रात्री 10:00 वाजता फूल विक्री करण्यासाठी येतो. तो जवळपास रात्री 1:00 पर्यंत फुलांच्या पॅकेटची विक्री करतो. तो रोज जवळपास 100 फुलांच्या पॅकेटची विक्री करतो. एक पॅकेट 50 रुपयांना विकतो. त्यातून त्याची मोठी कमाई होते.
100 हून अधिक फूल पॅकेटची होते विक्री
शांतनू याने फूल विक्रीविषयी माहिती दिली आहे. त्याच्या मते, रोज फूल पॅकेटची विक्री होते. कधी कधी तो 100 हून अधिक फूल पॅकेटची विक्री करतो. तर कधी कधी कमी विक्री होते. पण रोज त्याची फूल विकल्या जातात. रात्रीच्या वेळी हजारो भाविक येतात. त्यावेळी रस्ता विविध फुलांनी सजावला जातो. काही जण रांगोळी काढतात. शांतनू या ठिकाणी फुलाची विक्री करतो, त्यातून तो रोज जवळपास 5 हजार रुपयांची कमाई करतो.
