संत प्रेमानंद महाराजांच्या मागे लागली हडळ, पुढे झाले काय?…विचारानेच घाम फुटणार, मग जीव कसा वाचला?
Sant Shri Parmanand Maharaj And Witch : समाज माध्यमावर संत प्रेमानंद महाराज त्यांच्या आयुष्यात घडलेल्या अनेक गोष्टींची, घटनांची माहिती देतात. त्यांचा अनुभव सांगतात. एक दिवस त्यांच्या मागे हडळ लागली, मग पुढे काय झाले? अनेकांना घाम फोडणारी ही घटना ऐकली का?

संत प्रेमानंद महाराज हे गेल्या काही वर्षांपासून सोशल मीडियावर खूप लोकप्रिय आहेत. अनेक अडचणी, समस्यावर ते सहज आणि सोपा उपाय सांगतात, त्यामुळे लोक एकदम प्रभावित होतात. ते वृदांवन येथे रात्री पायी जात. त्यावरून एकदम वाद झाला. त्यामुळे ही पद यात्रा त्यांना थांबवावी लागली. तर आता ही पद यात्रा त्यांनी पुन्हा सुरू केली. त्यांचे अनेकांना दर्शन होऊ लागले. समाज माध्यमावर संत प्रेमानंद महाराज त्यांच्या आयुष्यात घडलेल्या अनेक गोष्टींची, घटनांची माहिती देतात. त्यांचा अनुभव सांगतात. एक दिवस त्यांच्या मागे हडळ लागली, मग पुढे काय झाले? अनेकांना घाम फोडणारी काय आहे ती घटना?
प्रेमानंद महाराजांच्या रस्त्यात हडळ
प्रेमानंद महाराजांनी हा प्रसंग सांगितला आहे. ते म्हणाले की, तिला पाहताच मला धक्का बसला. एका रात्री ते कमंडल घेऊन शौचास जात होते. त्यावेळी रात्रीचे 2-3 ची वेळ होती. तेव्हा त्यांना रस्त्यात एक नववधू दिसली. ज्या भागात महिला जातात, त्या भागात न जाता ही महिला पुरूष मंडळीच्या भागात जात असल्याने ते जरा विस्मयचकित झाले.




प्रेमानंद महाराज यांनी सांगितले की, त्यावेळी त्यांच्या मनात आले की, ही नववधू आहे, तिला कदाचित येथील परिसर माहिती नसावा. ती जिथे उभी होती, तिथून पुढे महाराज झपझप चालत गेले. पण त्यांना अजून मोठा धक्का बसला. ती नववधू पुन्हा त्यांच्या समोर आली. ही महिला इतक्या लवकर आपल्या पुढे कशी गेली, याचे त्यांना आश्चर्य वाटले. पण नुकतेच आपण झोपेच्या तंद्रीत असल्याने आपल्या लक्षात आले नसेल असे त्यांना वाटले. ही महिला आपल्याला पाहून भीतीने पुढे गेली असावी, असा अंदाज त्यांनी बांधला.
अन् महाराजांचा अंदाज खरा ठरला
प्रेमानंद महाराजांनी तिला पाहीले. त्यानंतर नववधू जिथे उभी होती. तिथून महाराज पुन्हा पुढे गेले. पण ती पुन्हा समोर दिसली. महाराज गडबडले. पण पुढे चालत राहिले. ती पु्न्हा पुढे दिसली. हा पाठलाग सुरूच होता. या गडबडीत गाव तर मागे सुटले. मध्यरात्री, ब्रह्म मुहुर्ताच्या अगोदर ही नववधू महाराजांना चकवा देत होती.
मग महाराजांना अंदाज आला की हे काही साधारण व्यक्ती नाही. त्यांना तात्काळ तिला विचारले, तू आहेस तरी कोण? तिने डोक्यावरील पदर मागे घेतला. महाराजांनी क्षणाचाही विचार न करता कमंडलमधील पाणी खाली टाकले. त्यांना नाम जप सुरू केला. देवाचा धावा केला. ते पुढे निघून गेले. परत त्या ठिकाणी आले तेव्हा तिथे कोणीच नव्हते.