ICC Champions Trophy 2025 : ऑस्ट्रेलियाला 2009 पासून जिंकता आली नाही एकही मॅच, मिनी वर्ल्ड कपच्या या गोष्टी तरी माहिती आहेत का? जाणून घ्या या इंटरेस्टिंग फॅक्ट
Mini World Cup ICC Champions Trophy : मिनी वर्ल्ड कपचा रणसंग्राम आजपासून याची देही याची डोळा अनुभवता येणार आहे. जगभरातील दिग्गज चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भिडतील. तुम्ही क्रिकेटचे डाय हॉर्ट फॅन असाल तर स्पर्धेच्या या इंटरेस्टिंग फॅक्ट तुम्हाला माहिती आहेत का?

आयसीसीच्या मिनी वर्ल्ड कपचा आजपासून बार उडणार आहे. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 ( ICC Champions Trophy 2025) चा ‘रण’संग्राम आजपासून रंगणार आहे. 19 दिवसांच्या या महाकुंभात 8 आखाडे म्हणजे संघ सहभागी झाली आहेत. पाकिस्तानला या स्पर्धेच्या यजमान पदाचा मान मिळाला आहे. 1996 पासून सुरू झालेल्या या मिनी वर्ल्डकपचं पहिल्यांदाच पाकिस्तानला हा बहुमान मिळाला आहे. पण भारताने स्पर्धेपूर्वीच रणनीतीमध्ये पाकिस्तानची शिकार केली. भारताचे सर्व सामने पाकिस्तानमध्ये नाही तर दुबईत रंगणार आहे. जगभरातील दिग्गज चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भिडतील. तुम्ही क्रिकेटचे डाय हॉर्ट फॅन असाल तर स्पर्धेच्या या इंटरेस्टिंग फॅक्ट तुम्हाला माहिती आहेत का? तीन मैदानं कोण...