AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Silver Rate Today : सोने-चांदीची भरारी, असे वधारले भाव

Gold Silver Rate Today : सोने-चांदीने उसळी घेतली. डॉलर सध्या मजबूत असतानाही दोन्ही धातूमध्ये गुंतवणूक वाढल्याचे संकेत मिळत आहे. ही दरवाढ ग्राहकांच्या खिशाला झळ देणार आहे. गुंतवणूकदारांना या नवीन घडामोडींचा फायदा होणार आहे. त्यांना चांगला परतावा मिळू शकतो. एप्रिल महिन्यापासून अजून ही दोन्ही धातूंना जुने रेकॉर्ड तोडता आलेले नाही.

Gold Silver Rate Today : सोने-चांदीची भरारी, असे वधारले भाव
Image Credit source: Google
| Updated on: Sep 24, 2023 | 8:45 AM
Share

नवी दिल्ली | 24 सप्टेंबर 2023 : सोने-चांदीने पुन्हा एकदा उसळी घेतली. मौल्यवान धातूमध्ये चढउतार सुरु आहे. जागतिक बाजारात सोने-चांदी दबावाखाली आहे. या दोन्ही धातूंमध्ये गुंतवणूकदारांनी गुंतवणूक वाढवल्याने दरवाढ झाली. डॉलर मजबूत असताना मौल्यवान धातू उसळला आहे. भारतीय सराफा बाजारात गेल्या दोन दिवसात दरवाढ झाली. सप्टेंबर महिन्यात सोने-चांदीला मोठी कामगिरी करता आली नाही. या आठवड्यात दोन्ही धातूंमध्ये चढउतार दिसत आहे. सलग पाच दिवसांच्या दरवाढीनंतर घसरण झाली होती. तर शुक्रवारपासून सोने-चांदीने आगेकूच केली आहे. सराफा बाजारात सोने-चांदीचा (Gold Silver Price Today 24 September 2023) असा भाव आहे. किंमती इतक्या वधारल्या आहेत. पुढील आठवड्यात आता दर वाढतो की कमी होतो, समोर येईल.

IBJAकडून भाव जाहीर नाही

भारतीय बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन ही देशातील 104 वर्षांची संस्था सोने-चांदीचे भाव सकाळीच जाहीर करते. शनिवार-रविवार आणि केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सुट्यांच्या दिवशी संस्था भाव जाहीर करत नाही.

सोन्यात चढउताराचे सत्र

  1. गुडरिटर्न्सनुसार, सप्टेंबर महिन्यात सोन्याला मोठी झेप घेता आलेली नाही.
  2. 15 आणि 16 सप्टेंबर रोजी सोन्यात प्रत्येकी 200 रुपयांची वाढ झाली.
  3. 17 आणि 18 सप्टेंबर रोजी सोने 150 रुपयांनी वधारले.
  4. 19 सप्टेंबर रोजी 150 रुपयांनी दर वधारले. या पाच दिवसांत सोन्याने मोठी उसळी घेतली.
  5. 20 सप्टेंबर रोजी मोठा बदल झाला नाही. 21 सप्टेंबर रोजी किंमती 150 रुपयांनी स्वस्त झाल्या.
  6. 22 सप्टेंबर रोजी किंचित घसरण आली. 23 सप्टेंबर रोजी 100 रुपयांची वाढ झाली.
  7. 22 कॅरेट सोने 55100 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 60,100 रुपये प्रति 10 ग्रॅम असा भाव आहे.

चांदीत 1300 रुपयांची वाढ

  1. या महिन्याच्या सुरुवातीला चांदीत 5000 रुपयांची घसरण झाली.
  2. 22 सप्टेंबर रोज चांदीत एक हजारांची वाढ झाली. 23 सप्टेंबर रोजी 300 रुपयांनी भाव वधारले.
  3. 15 आणि 16 सप्टेंबर रोजी चांदी 1200 रुपयांनी वधारली.
  4. तर 18 सप्टेंबर रोजी चांदीत 200 रुपयांची घसरण झाली.
  5. 19 सप्टेंबर रोजी चांदी 300 रुपयांनी महागली. 20 सप्टेंबर रोजी 300 रुपयांनी चांदी स्वस्त झाली.
  6. गुडरिटर्न्सनुसार, सध्या एक किलो चांदीचा भाव 75,800 रुपये आहे.

14 ते 24 कॅरेट सोन्याचा भाव

इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार, 24 कॅरेट सोने 59,134 रुपयांपर्यंत घसरले. 23 कॅरेट 58,897 रुपये, 22 कॅरेट सोने 54167 रुपये, 18 कॅरेट 44,351रुपये, 14 कॅरेट सोने 34,593 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. एक किलो चांदीचा भाव 73,175 रुपयांपर्यंत झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

किंमती मिस्ड कॉलवर

22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोने खरेदी करण्यापूर्वी त्याच्या किंमती एका मिस्ड कॉलवर कळतील. तुम्ही 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल करु शकता. त्यानंतर तुमच्या मोबाईल क्रमांकावर एसएमएस (SMS) येईल. त्याआधारे तुम्हाला किंमती कळतील. तसेच भाव जाणून घेण्यासाठी तुम्ही www.ibja.co वा ibjarates.com या ठिकाणी माहिती घेऊ शकता.

Follow Us
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदी
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदीतील खाजगी क्लासची सहल
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT स्थापन, 23 अधिकारी...
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे यांच्या घराबाहेर...
वाल्मिक कराड प्रकरण तापलं; धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट
वाल्मिक कराड प्रकरण की... धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट, चर्चेला उधाण
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’!
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’! भरभरून केलं कौतुक
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख शेतकऱ्यांना दिलासा
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
Udhhav Thackery : उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर केली धक्कादायक ऑडिओ क्लिप
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल, नुकसानाचा करावा लागतोय सामना