AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Silver Rate Today 3 November 2024 : लाडक्या बहि‍णींची ‘दिवाळी’; सोन्याची फटफजिती, चांदीची सावध चाल, किंमतीत मोठी घसरण, भाव तरी काय?

Gold Silver Rate Today 3 November 2024 : लक्ष्मी पूजनापूर्वी तोऱ्यात असलेले सोने आणि चांदीची ऐन दिवाळीत फटफजिती झाली. दिवाळी पाडव्यापासून मौल्यवान धातुत मोठी घसरण दिसून आली. लाडक्या बहि‍णींची दिवाळी सोनेरी होण्याची शक्यता आहे. सोने आणि चांदीत इतकी घसरण झाली आहे.

Gold Silver Rate Today 3 November 2024 : लाडक्या बहि‍णींची 'दिवाळी'; सोन्याची फटफजिती, चांदीची सावध चाल, किंमतीत मोठी घसरण, भाव तरी काय?
सोने आणि चांदीचा भाव
| Updated on: Nov 03, 2024 | 8:29 AM
Share

लक्ष्मी पूजनापूर्वीच सोन्याचा तोरा वाढला होता. तज्ज्ञांच्या अंदाजानुसार सोने 82 हजारांचा टप्पा गाठण्याची शक्यता होती. सोन्याने 81 हजारांच्या पुढे झेप घेतली. तर चांदी पण चांगलीच उसळली. पण दिवाळी पाडव्याला ग्राहकांना सुखद धक्का बसला. दोन्ही धातुत मोठी पडझड झाली. आता भाऊबि‍जेला तर दोन्ही मौल्यवान धातुत मोठी घसरण दिसली. त्यामुळे लाडक्या बहिणीची दिवाळी यंदा खास होणार आहे. लक्ष्मी पूजनापूर्वी तोऱ्यात असलेले सोने आणि चांदीची ऐन दिवाळीत फटफजिती झाली. दिवाळी पाडव्यापासून मौल्यवान धातुत मोठी घसरण दिसून आली. 81 हजारांहून झरझर भाव खाली आला. सोने आता थेट 78 हजारांच्या घरात खाली उतरले आहेत. तर चांदीत ही मोठी पडझड झाली आहे. आता अशा आहेत किंमती… (Gold Silver Price Today 3 November 2024 )

भाऊबि‍जेला किंमतीत मोठी घसरण

या आठवड्याच्या सुरुवातीला 490 रुपयांनी सोने स्वस्त झाले. 29 आणि 30 ऑक्टोबरला अनुक्रमे 600 आणि 700 रुपयांनी दरवाढ झाली. 31 ऑक्टोबरला सोने 170 रूपयांनी वाढले. 1 नोव्हेंबर रोजी सोने 770 रुपयांनी आपटले. काल भाव स्थिर होता. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 73,800 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 80,055 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

चांदीची चाल काय?

या आठवड्याच्या सुरुवातीला चांदीत 2 हजारांची वाढ दिसली. तर 29 आणि 30 ऑक्टोबरला प्रत्येकी 1 हजारांची दरवाढ झाली. 31 ऑक्टोबरच्या किंमती अपडेट झाल्या नाहीत. तर 1 नोव्हेंबर रोजी किंमतीत 3 हजारांची घसरण झाली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 97,000 रुपये झाला आहे.

14 ते 24 कॅरेटचा भाव काय

आज सकाळच्या सत्रात इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA) 24 कॅरेट सोने 78,425, 23 कॅरेट 78,121 22 कॅरेट सोने 71,837 रुपयांवर घसरले. 18 कॅरेट आता 58,819 रुपये, 14 कॅरेट सोने 45,879 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे. एक किलो चांदीचा भाव 93,501 रुपये इतका झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

घरबसल्या जाणून घ्या भाव

सोने-चांदीच्या किंमती तुम्हाला घरबसल्या पण जाणून घेता येईल. सोने-चांदीचे ताजे भाव जाणून घेता येईल. त्यात स्थानिक कर, इतर करांचा भर पडतो. त्यामुळे शहरानुसार किंमतीत तफावत दिसून येते. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) हे भाव जाहीर करेल. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सुट्या, शनिवारी आणि रविवार हे दिवस सोडून या किंमती जाहीर करण्यात येतात. ग्राहक 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन सर्व कॅरेटचे भाव जाणून घेऊ शकतात.

दानवे-फडणवीसांमध्ये जुंपली, शेतकऱ्यांच्या मदतीवरून राजकारण तापलं
दानवे-फडणवीसांमध्ये जुंपली, शेतकऱ्यांच्या मदतीवरून राजकारण तापलं.
कोण होतास तू काय झालास तू? , ठाकरे-फडणवीसांमध्ये हिंदुत्वावरून पेटलं
कोण होतास तू काय झालास तू? , ठाकरे-फडणवीसांमध्ये हिंदुत्वावरून पेटलं.
विधानसभेत नितेश राणे भडकले, सभागृहात सत्ताधारी-विरोधकांमध्ये वाद
विधानसभेत नितेश राणे भडकले, सभागृहात सत्ताधारी-विरोधकांमध्ये वाद.
महायुतीचा फॉर्म्युला ठरला, अजितदादांच्या युतीचं कुठं हो... कुठं नाही!
महायुतीचा फॉर्म्युला ठरला, अजितदादांच्या युतीचं कुठं हो... कुठं नाही!.
मुख्यमंत्रीपदासाठी स्वतःचं पायपुसणं.... शिंदेंचा ठाकरेंवर हल्लाबोल
मुख्यमंत्रीपदासाठी स्वतःचं पायपुसणं.... शिंदेंचा ठाकरेंवर हल्लाबोल.
दानवे म्हणाले मुख्यमंत्री कंजूस, CMO म्हणतंय आरोप खोटं, थेट आकडे जाहीर
दानवे म्हणाले मुख्यमंत्री कंजूस, CMO म्हणतंय आरोप खोटं, थेट आकडे जाहीर.
राज ठाकरे कल्याण मारहाण प्रकरणी कोर्टात, म्हणाले गुन्हा मान्य नाही...
राज ठाकरे कल्याण मारहाण प्रकरणी कोर्टात, म्हणाले गुन्हा मान्य नाही....
फडणवीस दानशूर राज्याचे कंजूस प्रमुख, कर्जमाफीवरून दानवेंचा घणाघात
फडणवीस दानशूर राज्याचे कंजूस प्रमुख, कर्जमाफीवरून दानवेंचा घणाघात.
प्रफुल्ल पटेलांनी घेतली मोदींची भेट, महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ
प्रफुल्ल पटेलांनी घेतली मोदींची भेट, महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ.
आता पांघरूण खातं तयार करा म्हणजे... उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल
आता पांघरूण खातं तयार करा म्हणजे... उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल.