Gold Rate Today | 4 महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचले 10 ग्रॅम सोन्याचे दर, जाणून घ्या आजचा नवा भाव

मजबूत जागतिक निर्देशांमुळे आठवड्याच्या पहिल्याच दिवशी भारतीय बाजारात व्यापार सत्रात सोन्या-चांदीच्या किंमती वाढल्या आहेत. अमेरिकन चलन डॉलरची घसरण आणि वाढती महागाई यांच्या दबावामुळे मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर (MCX) सोन्या-चांदीच्या किंमतीत घसरण झाली आहे.

Gold Rate Today | 4 महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचले 10 ग्रॅम सोन्याचे दर, जाणून घ्या आजचा नवा भाव
सोने-चांदी भाव
Follow us
| Updated on: May 24, 2021 | 11:56 AM

मुंबई : मजबूत जागतिक निर्देशांमुळे आठवड्याच्या पहिल्याच दिवशी भारतीय बाजारात व्यापार सत्रात सोन्या-चांदीच्या किंमती वाढल्या आहेत. अमेरिकन चलन डॉलरची घसरण आणि वाढती महागाई यांच्या दबावामुळे मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर (MCX) सोन्या-चांदीच्या किंमतीत घसरण झाली आहे. व्यापार सत्रादरम्यान, जून वायदा सोन्याच्या किंमती प्रति 10 ग्रॅम 0.27 टक्क्यांनी वाढल्या आहेत. त्याचबरोबर, जुलै वायदा चांदीच्या किंमतीत प्रतिकिलो 0.59 टक्क्यांनी वाढ झाली आहे (Gold Silver Rate Today on 24 May 2021 MCX Rates).

सोन्याचा नवा दर (Gold Rate) : सोमवारी एमसीएक्सवरील जून वायदा सोन्याची किंमत 131 रुपयांनी वाढून 48,535 रुपये प्रति 10 ग्रॅम झाली आहे. मागील व्यापार सत्रात, 10 ग्रॅम सोन्याचे दर 0.22 टक्क्यांनी घसरले होते.

चांदीची नवीन किंमत (Silver Rate) : व्यापार सत्रादरम्यान जुलै वायदा चांदीची किंमत 418 रुपयांनी वाढून 71,467 रुपये प्रति किलो झाली. गेल्या व्यापार सत्रात चांदीच्या किंमतीत 1.7 टक्क्यांनी घट झाली होती.

4 महिन्यातील उंच झेप

क्रिप्टोकरन्सीमध्ये घट झाल्यामुळे सेफ-हेवन मेटलकडे गुंतवणूकदारांचा कल वाढला आहेत. ज्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारातील सोन्याच्या किंमती सुमारे 4 महिन्यांच्या उच्चांक पातळीवर पोहोचल्या आहेत.

आंतरराष्ट्रीय बाजारात स्पॉट सोन्याचे दर प्रति औंस 0.2 टक्क्यांनी वधारून 1,883.21 डॉलर झाला, तर तो 0.4 टक्क्यांनी वाढून 27.64 डॉलर प्रति औंस झाला (Gold Silver Rate Today on 24 May 2021 MCX Rates).

गोल्ड बाँडच्या दुसर्‍या सीरीजची विक्री सुरू

सॉवरेन गोल्ड बाँडच्या (Sovereign Gold Bond) दुसर्‍या सीरीजची विक्री आजपासून सुरू झाली आहे. ते 28 मेपर्यंत विकले जातील. दुसर्‍या सीरीजची इश्यू किंमत प्रति ग्रॅम 4,842 रुपये आहे.

सॉवरेन गोल्ड बाँडसाठी ऑनलाईन अर्ज करणारे आणि डिजिटल मोडमध्ये पैसे भरणाऱ्या गुंतवणूकदारांना इश्यूच्या किंमतीवर प्रति ग्रॅम 50 रुपये सूट मिळते. अशा गुंतवणूकदारांसाठी सोन्याच्या बाँडचा इश्यू किंमत प्रति ग्रॅम 4,792 रुपये असेल.

गोल्ड सेव्हिंग फंडात गुंतवणूक वाढली

अनिश्चित आर्थिक वातावरणादरम्यान कोरोना विषाणूच्या साथीच्या दुसर्‍या लाटेमुळे (Corona Pandemic) लोक सोन्यात गुंतवणूक वाढवत आहेत. एप्रिलमध्ये गोल्ड सेव्हिंग फंड (Gold Saving Fund) आणि गोल्ड एक्सचेंज ट्रेडेड फंड (ईटीएफ) मध्ये 864 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली. आकडेवारीनुसार 2020-21मध्ये गोल्ड फंडात 3200 कोटी रुपये गुंतवले गेले, तर गोल्ड ईटीएफमध्ये 6900 कोटींपेक्षा जास्त रुपये गुंतवले गेले.

(Gold Silver Rate Today on 24 May 2021 MCX Rates)

हेही वाचा :

SBI चे इंटरनेट बँकिंगसाठी दोन ॲप्स, दोघांमधील फरक काय? तुमच्यासाठी कोणते योग्य?

रोख व्यवहारात कधीही करु नका ‘या’ 5 चुका, अन्यथा भरावा लागू शकतो इन्कम टॅक्स

Non Stop LIVE Update
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा.
सांगलीत तिहेरी लढत, मविआतच बंड अन् ठाकरेंचं वाढलं टेन्शन
सांगलीत तिहेरी लढत, मविआतच बंड अन् ठाकरेंचं वाढलं टेन्शन.
अमरावतीत शरद पवारांचा माफीनामा, ... तेव्हा चूक झाली, यापुढं होणार नाही
अमरावतीत शरद पवारांचा माफीनामा, ... तेव्हा चूक झाली, यापुढं होणार नाही.
वंचित उमेदवाराची माघार, भाजपची डोकेदुखी तर काँग्रेसला मिळणार दिलासा
वंचित उमेदवाराची माघार, भाजपची डोकेदुखी तर काँग्रेसला मिळणार दिलासा.
शिंदेंच्या बंडाचा आणखी एक पत्ता उघडला, टपरीवरून शिंदेंचा ठाकरेंना फोन
शिंदेंच्या बंडाचा आणखी एक पत्ता उघडला, टपरीवरून शिंदेंचा ठाकरेंना फोन.
विशाल पाटलांची बंडखोरी कायम, माघार नाहीच; ‘या’ चिन्हावर लोकसभा लढणार
विशाल पाटलांची बंडखोरी कायम, माघार नाहीच; ‘या’ चिन्हावर लोकसभा लढणार.
माफी मागत शरद पवार म्हणाले, 'ती' चूक पुन्हा कधीच नाही; निशाणा कुणावर?
माफी मागत शरद पवार म्हणाले, 'ती' चूक पुन्हा कधीच नाही; निशाणा कुणावर?.