
Gold Price: मागील काही दिवसांपासून सोन्याच्या दरात चढ उतार दिसत आहे. गेल्या महिन्याभरात सोने घसरले होते त्यानंतर पुन्हा सोन्याचे दर वाढले होते. यामुळे सोन्याच्या दराबाबत सोशल मीडियावर वेगवेगळी चर्चा होत आहे. सोन्याचे दर 50,000 रुपये प्रति दहा ग्रॅमवर येऊ शकतो, अशी चर्चा रंगली आहे. परंतु जागतिक गुंतकवणूक फर्म गोल्डमॅन सॅक्सने सोन्यात तुफान तेजीचा अंदाज वर्तवला आहे. सोन्याचे दर 1,36,000 पर्यंत जाण्याची शक्यता व्यक्त केली आहे.
गुंतकवणूक फर्म गोल्डमॅन सॅक्सच्या रिपोर्टमध्ये म्हटले की, सोन्याचे दर 4500 डॉलर प्रती आउंस ( म्हणजे 1,36,000 रुपये 10 ग्रॅम) वर जाण्याचा अंदाज आहे. अमेरिका आणि चीनमध्ये सुरु असलेला ट्रेड वॉर आणि जागतिक मंदीमुळे सोन्याचे दर 2025 मध्ये 4500 डॉलर प्रती आउंसवर पोहचणार आहे. गोल्डमॅन सॅक्सने तिसऱ्यांदा सोन्याच्या दर वाढीबाबत अंदाज बदलवला आहे. त्यापूर्वी या संस्थेने या वर्षाच्या अखेरपर्यंत सोने 3700 डॉलर प्रती आउंस जाईल, असा अंदाज वर्तवला होता. तसेच पहिल्यांदा अंदाज वर्तवताना 3300 डॉलर प्रति आउंस किंमत निश्चित केली होती.
गेल्या आठवड्यात गोल्ड ईटीएफने पहिल्यांदाच प्रति औंस 3200 डॉलरचा टप्पा ओलांडला. जागतिक स्तरावर वाढत्या तणावामुळे गोल्ड ईटीएफचा दर प्रति औंस 3245.69 डॉलरच्या पातळीवर पोहोचला होता. भौतिक आणि विनिमय व्यापारात सोन्याची मागणी लक्षणीयरीत्या वाढली आहे.
सोने आज 0.4 टक्क्यांनी घसरल्यानंतर स्पॉट गोल्डचा भाव 3223.67 डॉलर प्रति औंसवर व्यवहार करत होता. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, अमेरिकन सोन्याचा वायदा 0.1 टक्क्यांनी घसरून 3240.90 डॉलर प्रति औंस झाला. दरम्यान भारतात सोने-चांदी चढउतारचा परिणाम सराफ बाजारात दिसत आहे. कमी दरात सोने घेतलेले ग्राहक उच्चांकी दरामुळे मोड करण्यासाठी गर्दी करत आहेत, तर आणखी भाव वाढतील या भीतीने ग्राहक सोने खरेदी करताना पाहायला मिळत आहे. अमेरिका-चीन टॅरिफ वॉरचा परिणाम भारतीय सरफा बाजारात दिसत आहे.
(डिस्क्लेमर : हा गुंतवणूक सल्ला नाही. सोन्याच्या किमती चढ-उतार होत राहतात. येथे सादर केलेल्या विचार तत्ज्ञांचे वैयक्तिक आहेत.)