SBI च्या 44 कोटी ग्राहकांसाठी चांगली बातमी, बँक घरी 20000 रुपयांपर्यंत रोकड पाठवणार, पण कशी?

| Updated on: Jul 18, 2021 | 9:06 PM

रोकड पैसे काढण्याच्या विनंतीपूर्वी बँक खात्यात पुरेशी शिल्लक रक्कम ठेवणे बंधनकारक आहे. असे करण्यात अयशस्वी झाल्यास व्यवहार रद्द होऊ शकतो.

SBI च्या 44 कोटी ग्राहकांसाठी चांगली बातमी, बँक घरी 20000 रुपयांपर्यंत रोकड पाठवणार, पण कशी?
state bank of india
Follow us on

नवी दिल्ली: स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये खाते असलेल्या ग्राहकांसाठी चांगली बातमी आहे. बँकेमार्फत अनेक खास सुविधा ग्राहकांना दिल्या जात आहेत. बँकेने कोरोना संकटात ग्राहकांसाठी डोअरस्टेप बँकिंग सुविधासुद्धा सुरू केलीय. या सुविधेमध्ये रोकड पैसे काढण्यापासून ते पैसे भरण्याचे आदेश, नवीन चेकबुक, नवीन चेकबुक स्लिपपासून तुम्हाला विविध सुविधा मिळत आहेत. भारतीय स्टेट बँके (SBI) मध्ये किमान मर्यादा एक हजार रुपये आहे आणि कमाल मर्यादा 20,000 रुपये आहे. रोकड पैसे काढण्याच्या विनंतीपूर्वी बँक खात्यात पुरेशी शिल्लक रक्कम ठेवणे बंधनकारक आहे. असे करण्यात अयशस्वी झाल्यास व्यवहार रद्द होऊ शकतो. (Good news for SBI’s 44 crore customers, the bank will send cash up to Rs 20,000 home, but how?)


एसबीआयने केले ट्विट

एसबीआयने आपल्या अधिकृत ट्विटरमध्ये लिहिले आहे की, तुमची बँक आता तुमच्या दारात आहे. डोअरस्टेप बँकिंगसाठी आजच नोंदणी करा. अधिक माहितीसाठी आपण या लिंकवर क्लिक करू शकता https://bank.sbi/dsb.

डोअरस्टेप बँकिंगची वैशिष्ट्ये

१. ही नोंदणी गृह शाखेत करावी लागेल.
२. संपर्क केंद्रावर ही सुविधा पूर्ण होत नाही, तोपर्यंत होम ब्रँचमध्येच अर्ज करावा लागेल.
३. ठेव आणि पैसे काढणे या दोन्हीसाठी जास्तीत जास्त मर्यादा दररोज 20 हजार रुपये आहे.
४. सर्व गैर-आर्थिक व्यवहारासाठी सेवा शुल्क 60 रुपये + जीएसटी आहे, तर आर्थिक व्यवहारांसाठी 100 + जीएसटी आहे.
५. पैसे काढण्यासाठी चेक व पैसे काढण्याच्या फॉर्मसह पासबुक देखील आवश्यक असेल.

कुणाला सुविधा मिळणार नाहीत?

ही सुविधा संयुक्त खाते, किरकोळ खाते, बिगर वैयक्तिक खाते यांना दिली जाणार नाही, तर ज्या ग्राहकांचे नोंदणीकृत पत्ता गृह शाखेच्या 5 किमीच्या परिघात आहेत.

किती शुल्क आकारेल?

डोअरस्टेप बॅंकिंगमधील आर्थिक आणि गैर-वित्तीय सेवांसाठी 75 रुपये + जीएसटी आकारला जाईल.

आपण या क्रमांकावर संपर्क साधू शकता

बँकेच्या मोबाईल अ‍ॅप्लिकेशन, वेबसाईट किंवा कॉल सेंटरच्या माध्यमातून कोणीही डोअरस्टेप बँकिंग सेवेसाठी नोंदणी करू शकतो. याशिवाय कामकाजाच्या दिवशी सकाळी 9 ते सायंकाळी 4 या वेळेत टोल फ्री क्रमांकावर 1800111103 वर कॉल करता येईल. एसबीआय डोअरस्टेप बँकिंग सेवांविषयी अधिक माहितीसाठी, ग्राहक https://bank.sbi/dsb वर भेट देऊ शकतात. ग्राहक त्याच्या होम शाखेतही जाऊ शकतो.

संबंधित बातम्या

तुमच्या गाडीत 100% शुद्ध पेट्रोल टाकलं जात नाही, ‘या’ गोष्टीची भेसळ! नेमकं नुकसान काय?

PM Kisan Tractor Yojana: ट्रॅक्टर खरेदीवर मिळणार 50 टक्के सबसिडी, फायदा कसा मिळवायचा ते जाणून घ्या

Good news for SBI’s 44 crore customers, the bank will send cash up to Rs 20,000 home, but how?