PM Kisan Tractor Yojana: ट्रॅक्टर खरेदीवर मिळणार 50 टक्के सबसिडी, फायदा कसा मिळवायचा ते जाणून घ्या

शेतकरी नांगरणे आणि लावणी वगैरे कामे ट्रॅक्टरद्वारे करतात. भारतात असे बरेच शेतकरी आहेत, ज्यांच्याकडे आर्थिक अडचणींमुळे ट्रॅक्टर नाही.

PM Kisan Tractor Yojana: ट्रॅक्टर खरेदीवर मिळणार 50 टक्के सबसिडी, फायदा कसा मिळवायचा ते जाणून घ्या
Mahindra tractor

नवी दिल्ली: PM Kisan Tractor Yojana: शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी मोदी सरकारकडून शेतकर्‍यांसाठी अनेक योजना राबविल्या जात आहेत. शेतकर्‍यांना शेतीच्या कामासाठी अनेक प्रकारच्या मशीनचीही गरज आहे. या गरजेमध्ये ट्रॅक्टर हा शेतकर्‍यांच्या गरजेचा भाग आहे. शेतकरी नांगरणे आणि लावणी वगैरे कामे ट्रॅक्टरद्वारे करतात. भारतात असे बरेच शेतकरी आहेत, ज्यांच्याकडे आर्थिक अडचणींमुळे ट्रॅक्टर नाही.

शेतात कामासाठी ते ट्रॅक्टर भाड्याने देतात किंवा बैलांचा वापर करतात

अशा परिस्थितीत ते शेतात कामासाठी ट्रॅक्टर भाड्याने देतात किंवा बैलांचा वापर करतात. अशा स्थितीत शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी केंद्र सरकारने ट्रॅक्टर खरेदीवर अनुदान देण्याची योजना सुरू केलीय. ही योजना पंतप्रधान किसान ट्रॅक्टर योजना म्हणून ओळखली जाते.

50 टक्के अनुदान उपलब्ध

केंद्र सरकार शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदीसाठी अनुदान देते. यासाठी सर्वात चांगली गोष्ट म्हणजे शेतकरी कोणत्याही कंपनीचे ट्रॅक्टर खरेदी करू शकतात आणि तेही निम्म्या किमतीत. उर्वरित अर्धे पैसे अनुदान म्हणून सरकारकडून दिले जातात. अनेक राज्य सरकार आपापल्या स्तरावर शेतकऱ्यांना ट्रॅक्टरवर 20 ते 50 टक्के अनुदान देते.

कसा फायदा घ्यावा?

केवळ 1 ट्रॅक्टर खरेदी केलेल्या शेतकऱ्यांना शासन अनुदान देते. म्हणजेच 1 ट्रॅक्टर खरेदीवर अनुदान मिळणार आहे. यासाठी शेतकऱ्याला आधार कार्ड, जमीन कागदपत्रे, बँकेचा तपशील, पासपोर्ट आकाराचा फोटो आवश्यक असेल. या योजनेत शेतकरी जवळच्या कोणत्याही सीएससी केंद्राला भेट देऊन ऑनलाईन अर्ज करू शकतात.

संबंधित बातम्या

ATM मधून रंग लागलेली नोट बाहेर आली तर काय करावे? नियम काय सांगतो?

बचत खाते, कर्ज किंवा एफडीवर व्याज मिळवत असाल तर जाणून घ्या किती कर भरावा लागणार?

PM Kisan Tractor Yojana: 50 per cent subsidy on tractor purchase, find out how to avail

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI