AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti : या गोष्टींकडे कधीच करू नका दुर्लक्ष, कराल आयुष्यातील सर्वात मोठी चूक

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीतीतज्ज्ञ होते. चाणक्य म्हणतात आपल्या आयुष्यात अशा काही गोष्टी असतात, ज्यांच्याकडे कधीही दुर्लक्ष करता कामा नये, जर तुम्ही दुर्लक्ष केलं तर ती तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक ठरू शकते.

Chanakya Niti : या गोष्टींकडे कधीच करू नका दुर्लक्ष, कराल आयुष्यातील सर्वात मोठी चूक
CHANKYAImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Feb 11, 2026 | 9:27 PM
Share

चाणक्य हे एक महान विचारवंत होते, त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला, या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी जे विचार मांडले आहेत. ते आजच्या काळातही अनेकांना मार्गदर्शक ठरतात. चाणक्य यांनी मानवी जीवनाच्या प्रत्येक पैलूंवर आपल्या या ग्रंथामध्ये लिखाण केलं आहे. व्यक्ती आपल्या आयुष्यात दु:खी का असतो? हे सांगताना चाणक्य म्हणतात इतर कोणामुळेही नाही तर स्वत:मध्ये असलेल्या काही गोष्टींमुळे व्यक्तीच्या वाट्याला दु:ख येते. चाणक्य म्हणतात अनेकांना त्यांच्या आयुष्यात येणार्‍या समस्यांकडे दुर्लक्ष करण्याची सवय असते, असे लोक समस्या सोडवण्याऐवजी त्याच्याकडे दुर्लक्ष करतात, त्यामुळे ही समस्या सुटत नाही, व्यक्ती त्यामध्ये खोलवर गुंतला जातो आणि एक दिवस मोठ्या संकटात सापडतो. त्यामुळे चाणक्य म्हणतात समस्या कोणतीही असो, ती मुळापासून सोडवा, असा सल्ला चाणक्य यांनी दिला आहे. तसेच आयुष्यात अशा काही गोष्टी असतात, ज्याकडे दुर्लक्ष करू नका, असंही चाणक्य यांनी म्हटलं आहे, जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे त्याबद्दल?

कर्ज – चाणक्य म्हणतात जेव्हा तुमच्यावर कर्ज असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका, त्यातून पूर्णपणे मुक्त व्हा, तुम्ही जर कर्जाकडे दुर्लक्ष केलं तर ते कर्ज वाढतच जाणार आहे, एक दिवस असा येईल की तुम्ही कर्जाच्या ओझ्याखाली पूर्णपणे दबून जाल, त्यामुळे कर्जाकडे कधीही दुर्लक्ष करू नका.

रोग – चाणक्य म्हणतात माणसानं आयुष्यात कधीही रोगाकडे दुर्लक्ष करू नये, कारण रोग जेव्हा नियंत्रणात असतो, तेव्हाच त्यावर डॉक्टरांकडून उपचार केले तर तुमचा जीव वाचू शकतो, अन्यथा तुम्ही मोठ्या संकटात सापडू शकता.

शत्रू – चाणक्य म्हणतात तुम्ही शत्रूकडे कधीही दुर्लक्ष करण्याची चूक करू नका, ही चूक तुम्हाला खूप महागात पडू शकते. तुम्ही बेसावध असाल तर तुमचा शत्रू कधीही तुमचा घात करू शकतो, त्यामुळे शत्रूकडे दुर्लक्ष करू नका.

वाईट संगत – चाणक्य म्हणतात तुम्हाला जेव्हा जाणीव होईल की तुम्ही कोणच्या तरी वाईट संगतीमध्ये आहात, तेव्हा त्याकडे दुर्लक्ष करू नका, त्यातून हातात वेळ असेपर्यंतच बाहेर पडा, असा सल्ला चाणक्य यांनी दिला आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
MPSCच्या आजी-माजी अध्यक्षांवर कारवाईचा मार्ग मोकळा?...
MPSCच्या आजी-माजी अध्यक्षांवर कारवाईचा मार्ग मोकळा?; फडणवीसांची राज्यपालांकडे मोठी शिफारस, काय आहे मागणी?
उपमुख्यमंत्री शिंदेंचा दिल्ली दौरा, मोदींसोबत भेट; नेमकं काय शिजतंय?
Eknath Shinde in Delhi : उपमुख्यमंत्री शिंदेंचा दिल्ली दौरा, मोदींसोबत भेट; विधानपरिषद निवडणुकीआधी महत्त्वाच्या भेटीगाठी, नेमकं काय शिजतंय?
भाजप उमेदवाराचा अर्ज दाखल; पण मित्रपक्षांच्या नेत्यांनी फिरवली पाठ...
Vidhan Parishad Election : भाजप उमेदवाराचा अर्ज दाखल; पण मित्रपक्षांच्या नेत्यांनी फिरवली पाठ, महायुतीत नेमकं काय सुरू?
मविआत ठरलं नाही अन् ठाकरे गटाने उमेदवार उतरवला; काँग्रेस-उबाठा...
Vidhan Parishad Election : मविआत ठरलं नाही अन् ठाकरे गटाने उमेदवार उतरवला; अमरावतीत काँग्रेस-उबाठा आमनेसामने
एल निनोचा धोका, सरकारचा मास्टर प्लॅन नेमका काय?
Maharashtra Drought : एल निनोचा धोका, महाराष्ट्रात पाण्याचं मायक्रो प्लॅनिंग; सरकारचा मास्टर प्लॅन नेमका काय?
कर्जमाफीवर संजय शिरसाटांचं मोठं वक्तव्य; म्हणाले, एकही शेतकरी....
Sanjay Shirsat : कर्जमाफीवर संजय शिरसाटांचं मोठं वक्तव्य; म्हणाले, एकही शेतकरी....
फुटीरवादी नेत्यांमुळे आंबेडकरी चळवळीचं नुकसान; सचिन खरातांचा....
Sachin Kharat On Abhijeet Dipake : फुटीरवादी नेत्यांमुळे आंबेडकरी चळवळीचं नुकसान; सचिन खरातांचा अभिजीत दिपकेंवर थेट निशाणा, पण खरात असं का म्हणाले?
कोल्हापूर अंबाबाई मंदिरात आज दिवसभर देवीच्या मूर्तीचे दर्शन बंद
कोल्हापूर अंबाबाई मंदिरात आज दिवसभर देवीच्या मूर्तीचे दर्शन बंद
जिल्हा बँक निवडणुकीत राम शिंदेंचा मोठा निर्णय; म्हणाले, पदाची निष्पक्ष
Ahilyanagar Election : जिल्हा बँक निवडणुकीत राम शिंदेंचा मोठा निर्णय; म्हणाले, पदाची निष्पक्षता जपण्यासाठी...
राणेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला; आदित्य यांच्या पासपोर्ट जप्तीची मागणी
राणेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला; आदित्य यांच्या पासपोर्ट जप्तीची मागणी