लघु उद्योजकांनी आर्थिक अडचण विसरा, सीआयआयने केला एमएसएमई मंत्रालयाशी करार

| Updated on: Dec 11, 2020 | 10:44 AM

डिजिटल माहिती आणि स्वीकृतीच्या माध्यमातून एमएसएमईच्या प्रतिस्पर्ध्या आणखी स्पर्धात्मकता करण्यासाठी हा प्लान करण्यात आला आहे.

लघु उद्योजकांनी आर्थिक अडचण विसरा, सीआयआयने केला एमएसएमई मंत्रालयाशी करार
वारंवार रोख व्यवहार करणाऱ्यांसाठी मोठी बातमी
Follow us on

नवी दिल्ली : भारतीय उद्योग महासंघाने (सीआयआय) ने डिजिटल प्लॅटफॉर्मला आणखी सक्षम करण्यासाठी मास्टरकार्ड आणि भारत सरकारच्या एमएसएमई मंत्रालयाच्या संघटनेच्या नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर मायक्रो, स्मॉल एंड मीडियम एंटरप्रायजेस (ni-msme) शी सामंजस्य करार केला आहे. यासाठी डिजिटल सक्षम पुढाकार हा एक विशेष प्रोग्राम राबवला जाणार आहे. इतकंच नाही तर डिजिटल माहिती आणि स्वीकृतीच्या माध्यमातून एमएसएमईच्या प्रतिस्पर्ध्या आणखी स्पर्धात्मकता करण्यासाठी हा प्लान करण्यात आला आहे. (good news for small business cii joins hands with msme ministry)

या खास योजनेअंतर्गत छोट्या-छोट्या व्यावसायिक मालकांना शिक्षण आणि प्रशिक्षण देऊन डिजिटल अर्थव्यवस्थेनुसार उद्योजकांना सक्षम करण्यात येणार आहे. त्यांच्यासाठी पत आणि बाजारपेठाव वाढण्यात येणार असून ग्राहकांना आर्थिक कामकाज डिजिटल करण्यासाठी आणि बळकट करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. खरंतर, या भागीदारीचे मुख्य उद्दीष्ट हेच आहे. ही भागीदारी भारतातील एमएसएमईंना त्यांच्या पूर्ण क्षमतेचा वापर करण्यास सक्षम करेल. यातून त्यांचा नफा वाढवला जाईल अशी माहिती समोर आली आहे.

“भारतीय अर्थव्यवस्था चांगल्या प्रकारे वाढवण्यामध्ये एमएसएमईचं 50 टक्के योगदान आहे. तर यात 60 टक्के निर्यातीत योगदान आहे आणि या क्षेत्रात 5 दशलक्ष रोजगार उपलब्ध आहेत. या क्षमतेचा योग्यरित्या वापर करण्यासाठी सूक्ष्म आणि लघु उद्योगांना स्वत:ला स्पर्धात्मक बनवावं लागणार आहे. नितीन गडकरी, सन्माननीय एमएसएमई आणि रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री, भारत सरकार यांनी 17व्या जागतिक एसएमई व्यवसाय समिट 2020 दरम्यान सांगितलं.

जानेवारी 2021 पासून या प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यात आली असून जून 2021 पासून एमएसएमई प्रशिक्षण घेतलं जाणार आहे. यासाठी अमिता सरकार, डीडीजी, सीआयआय आणि मिस अ‍ॅलिसन एल. एस्सेन, उपाध्यक्ष, मास्टरकार्ड सेंटर फॉर इक्लुसीव्ह ग्रोथची पुष्टी करण्यात आली आहे. (good news for small business cii joins hands with msme ministry)

इतर बातम्या –

1 जानेवारीपासून बदलणार चेक पेमेंटची पद्धत, लागू होणार नवा नियम

19 कोटी नागरिकांसाठी मोठं गिफ्ट, आता या खात्यामध्ये सरकार जमा करणार एकमुखी रक्कम

(good news for small business cii joins hands with msme ministry)