19 कोटी नागरिकांसाठी मोठं गिफ्ट, आता या खात्यामध्ये सरकार जमा करणार एकमुखी रक्कम

मार्केटमधील वाढत्या तेजीमुळे ईपीएफओ (EPFO) आता डिसेंबरमध्ये आपली इक्विटी होल्डिंग विकून अधिक परतावा मिळवण्याच्या प्रयत्नात आहे.

19 कोटी नागरिकांसाठी मोठं गिफ्ट, आता या खात्यामध्ये सरकार जमा करणार एकमुखी रक्कम
Follow us
| Updated on: Dec 09, 2020 | 3:26 PM

नवी दिल्ली : पीएफ खातेधारकांसाठी (PF Account Holders) ही एक चांगली बातमी आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (Employees Provident Fund Organisation-EPFO)आर्थिक वर्षासाठी 2019-20 साठी ईपीएफवर (EPF) निश्चित केलेलं 8.5 टक्के व्याज एकमुखी देय देऊ शकणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मार्केटमधील वाढत्या तेजीमुळे ईपीएफओ (EPFO) आता डिसेंबरमध्ये आपली इक्विटी होल्डिंग विकून अधिक परतावा मिळवण्याच्या प्रयत्नात आहे. अहवालानुसार, आर्थिक वर्ष 2019-20 मध्ये 19 कोटी ईपीएफ खात्यात 8.5 % व्याज देण्यात येणार आहे. (epfo entire interest to be credited into around 19 crore epf accounts)

बिझनेस स्टँडर्डमध्ये प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार, केंद्रीय कामगार व रोजगार मंत्रालयाने (Union labour and employment ministry) 19 कोटी ईपीएफ खात्यांमध्ये 8.5 टक्के व्याज एकरकमी देण्यासाठी अर्थ मंत्रालयाकडे परवानगी मागितली आहे. मंत्रालयाच्या या शिफारशीवर वित्त मंत्रालयाकडून अद्याप कोणतंही उत्तर मिळालेलं नाही. पण या आठवड्याभरात यावर निर्णय होण्याची शक्यता आहे.

खरंतर, याआधी सप्टेंबरच्या सुरुवातीलाच केंद्रीय विश्वस्त मंडळाने (CBT) ने कोविडमुळे बाजार घसरल्यामुळे सेवानिवृत्ती फंड आपली इक्विटी गुंतवणूकी कमी करू शकत नसल्याने पहिल्यांदाच ईपीएफओ दोन हप्त्यांमध्ये व्याज जमा करणार अशी घोषणा केली होती. यावेळी ईपीएफओने 8.15 टक्के व्याज (कर्ज गुंतवणूकीतून मिळविलेले नफा) ताबडतोब जमा केलं जावं असं ठरवण्यात आलं होतं.

ईपीएफओने त्यांच्या एकूण कॉर्पसपैकी तब्बल 15 टक्के एक्सचेंज ट्रेडेड फंडात (ETFs) गुंतवणूक केली आहे. 2020 या आर्थिक वर्षामध्ये ईपीएफओने इक्विटीमध्ये केलेल्या गुंतवणूकीवरील परतावा -8.3 टक्के होता. तर 2019 या आर्थिक वर्षामध्ये इथू ग्राहकांना 14.7 टक्के परतावा मिळाला होता.

ईपीएफओने 2019 या आर्थिक वर्षामध्ये 8.65 टक्के व्याज दिलं आहे. आर्थिक वर्ष 2020 मध्ये ईपीएफवरील व्याज 8.5 टक्के आहे जे 7 वर्षातील सर्वात कमी व्याज आहे. इतकंच नाही तर या तुलनेत गेल्या एका वर्षात फिक्स्ड डिपॉझिटवरील व्याजदर 150 बेस पॉइंटने खाली (Fixed Deposit) घसरला आहे. (epfo entire interest to be credited into around 19 crore epf accounts)

इतर बातम्या –

पैशाला पैसा जोडून मिळवा बक्कळ पैसा, ‘या’ 5 पद्धतीने करा गुंतवणूक

महाराष्ट्रातल्या आणखी एका बँकेचा परवाना रद्द, ग्राहकांना कसे मिळणार पैसे परत?

(epfo entire interest to be credited into around 19 crore epf accounts)

Non Stop LIVE Update
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?.
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले.
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?.
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?.
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?.
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?.
अखेर कल्याण-ठाण्याचे उमेदवार शिंदे गटातून जाहीर, कुणाला लोकसभेच तिकीट?
अखेर कल्याण-ठाण्याचे उमेदवार शिंदे गटातून जाहीर, कुणाला लोकसभेच तिकीट?.
मुख्यमंत्र्यांची पुन्हा तत्परता; रस्त्यात अपघात, शिंदेंनी ताफा थांबवला
मुख्यमंत्र्यांची पुन्हा तत्परता; रस्त्यात अपघात, शिंदेंनी ताफा थांबवला.
घोडे समजून ज्यांना घेतलं ती खेचरं अन्.. ठाकरेंची शिंदे-फडणवीसांवर टीका
घोडे समजून ज्यांना घेतलं ती खेचरं अन्.. ठाकरेंची शिंदे-फडणवीसांवर टीका.
आमच्या डोक्यात प्रकाश पडायला 17 वर्ष लागली, अजितदादांचा निशाणा कुणावर?
आमच्या डोक्यात प्रकाश पडायला 17 वर्ष लागली, अजितदादांचा निशाणा कुणावर?.