महाराष्ट्रातल्या आणखी एका बँकेचा परवाना रद्द, ग्राहकांना कसे मिळणार पैसे परत?

परवाना रद्द झाल्यामुळे आता बँक पूर्णपणे बंद राहिल, असं आरबीआयनं म्हटलं आहे.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 8:14 AM, 9 Dec 2020
महाराष्ट्रातल्या आणखी एका बँकेचा परवाना रद्द, ग्राहकांना कसे मिळणार पैसे परत?

नवी दिल्ली : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) आता आणखी एका बँकेचा परवाना रद्द केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरबीआयने अडचणीत असलेल्या महाराष्ट्रातील कराड जनता सहकारी बँकेचा (Karad Janata Sahakari Bank) परवाना रद्द केला आहे. पुरेसं भांडवल नसणे आणि बँक भविष्यातील उत्पन्नाशी संबंधित कमकुवत असल्याने आरबीआयने हा मोठा निर्णय घेतल्याची माहिती देण्यात आली आहे. खरंतर, नोव्हेंबर 2017 पूर्वी रिझर्व्ह बँकेने कराड जनता सहकारी बँकेवर काही निर्बंध घातले होते. पण यानंतर आता परवाना रद्द झाल्यामुळे आता बँक पूर्णपणे बंद राहिल, असं आरबीआयनं म्हटलं आहे. (Maharashtra bank big news rbi cancels license of karad janata bank)

या नियमानुसार खातेधारकांना परत मिळतील पैसे

रिझर्व्ह बँकेने दिलेल्या माहितीनुसार, ठेवी विमा आणि पत हमी निगम कायद्यांतर्गत, प्रत्येक ठेवीदाराला (Depositor) बँकेच्या लिक्विडेशनवर 5 लाखांपर्यंतचा परतावा मिळू शकतो. इतकंच नाही तर बँकेच्या 99 टक्के ठेवीदारांना त्यांच्या ठेवी परत मिळतील अशी माहिती बँकेकडून देण्यात आली आहे. यामुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

का रद्द केला बँकेचा परवाना?

बँकेच्या कारवाईबद्दल नियामक स्पष्टीकरण देताना आरबीआयने म्हटलं आहे की, सहकारी बँकेत पुरेसे भांडवल आणि मिळकत करण्याची क्षमता नाही आहे. कराड बँक बँकिंग रेग्युलेशन्स 1949 च्या कलम 56 मधील मानकांवर पूर्णपणे उतरले नाहीत. त्यामुळे आता बँक चालू ठेवणं हे ठेवीदारांच्या हिताचं नाही. सध्याच्या परिस्थितीत बँक आपल्या ठेवीदारांना संपूर्ण पैसे देण्यास सक्षम नाही असंही बँकेनं म्हटलं आहे.

रिझर्व्ह बँकेने दिलेल्या माहितीनुसार, परवाना रद्द केल्यामुळे कराड जनता सहकारी बँक 7 डिसेंबर रोजी व्यवहार बंद झाल्यापासून बँकिंग व्यवसाय करू शकणार नाही. याचा अर्थ असा की, आता कराड जनता सहकारी बँक ग्राहकांच्या ठेवी किंवा ठेवी परत करू शकणार नाही. सहकारी संस्थाचे कुलसचिव आणि महाराष्ट्र सहकार आयुक्तांनाही बँक बंद करुन लिक्विडेटर नेमण्याचे आदेश जारी करण्याची विनंती केली आहे.

दरम्यान, यंदाच्या मे महिन्यात आरबीआयने महाराष्ट्राच्या सीकेपी सहकारी बँकेचा परवानाही रद्द केला होता. बँकेची आर्थिक स्थिती चांगली नसल्याने परवाना रद्द केल्याची माहिती त्यावेळी रिझर्व्ह बँकेकडून देण्यात आली होती. इतकंच नाही तर गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये आरबीआयने मुंबईस्थित पीएमसी सहकारी बँकेचे बोर्डही निलंबित केले होते. (Maharashtra bank big news rbi cancels license of karad janata bank)

इतर बातम्या –

Atal Pension Yojana: दर महिन्याला फक्त 42 रुपये गुंतवणूक करा; आयुष्यभर खात्यात येणार पैसे

वर्कफ्रॉम होममुळे कंपन्यांची मोठी आर्थिक बचत; ऑफिस खरेदीवरही परिणाम

(Maharashtra bank big news rbi cancels license of karad janata bank)