ICICI बँकेकडून कोट्यवधी ग्राहकांसाठी आनंदाची बातमी, आता घर बसल्या मिळणार FASTag

| Updated on: Jan 22, 2021 | 1:31 PM

बँकेच्या या खास सुविधेमुळे वापरकर्त्यांना पेमेंट अॅपवरच फास्टॅगचे डिजीटल ऑर्डर, ट्रॅक आणि रिचार्ज करण्याची सुविधा मिळणार आहे. यामुळे ग्राहकांचा वेळही वाचणार आहे.

ICICI बँकेकडून कोट्यवधी ग्राहकांसाठी आनंदाची बातमी, आता घर बसल्या मिळणार FASTag
Follow us on

नवी दिल्ली : देशातल्या सगळ्यात मोठ्या खासगी क्षेत्रातील आयसीआयसीआय बँकने (ICICI Bank) आता ग्राहकांना आणखी चांगली सुविधा देण्यासाठी गुगल पेबरोबर भागीदारीची घोषणा केली आहे. यामुळे आता ग्राहक FASTag गूगल पेद्वारे (Google Pay) मिळू शकतात. बँकेचे ग्राहक गुगल पे अॅपमध्ये (Google Pay App) नोंदणीकृत यूपीआयमार्फत (UPI) FASTag खरेदी करू शकतात. बँकेच्या या खास सुविधेमुळे वापरकर्त्यांना पेमेंट अॅपवरच फास्टॅगचे डिजीटल ऑर्डर, ट्रॅक आणि रिचार्ज करण्याची सुविधा मिळणार आहे. यामुळे ग्राहकांचा वेळही वाचणार आहे. (good news icici bank partnered with google pay now bank customers can buy fastag from google pay)

बँकेने घेतलेल्या या निर्णयामुळे ग्राहकांची सुरक्षा अधिक चांगली होणार आहे. त्यामुळे आता FASTag खरेदी करण्यासाठी ग्राहकांना टोल प्लाझा किंवा इतर कोणाकडे जाण्याची गरज नाही. इतकंच नाहीतर या घोषणेसह, आयएसआयसीआय बँक FASTag जारी करण्यासाठी Google पे सह भागीदारी करणारी पहिली बँक असणार आहे. हा उपक्रम FASTag साठी डिजिटल पेमेंटला आणखी चालना देण्यास मदत करेल.

आयसीआयसीआय बँकेने नुकतेच प्रवाश्यांसाठी मुंबई टोल प्लाझा आणि हैदराबाद आंतरराष्ट्रीय विमानतळावरील पार्किंग झोनमध्ये फास्टटॅगला एकत्रीत केलं आहे. 2013 मध्ये पहिल्यांदाच आयसीआयसीआय बँकेने मुंबई-वडोदरा कॉरिडोरवर FASTag सेवा सुरू केली. फास्टॅग इलेक्ट्रॉनिक टोलिंग हा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण ऑफ इंडिया प्रकल्पातील एक भाग आहे.

Google Pay वरून FASTag मिळवण्यासाठी ही आहे प्रक्रिया

– यासाठी तुम्हाला आधी मोबाईलमध्ये गुगल पे उगडावं लागेल.

– यानंतर आयसीआयसीआय बँक FASTag वर क्लिक करा

– इथे तुम्हाला नवीन Buy New FASTag असा पर्याय दिसेल.

– हा पर्याय उघडल्यानंतर यामध्ये पॅन नंबर, आरसी कॉपी, वाहन नंबर आणि पत्ता भरावा लागेल.

– OTP च्या माध्यमातून तुम्ही मोबाईल नंबर रजिस्टर करा.

– हे झाल्यानंतर तुम्ही FASTag ची ऑर्डर देऊ शकता. (good news icici bank partnered with google pay now bank customers can buy fastag from google pay)

संबंधित बातम्या –

Gold-Silver Rate Today | गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी, सोने-चांदीचे भाव घसरले

अचानक पैशांची गरज आहे तर SBI करेल मदत, जाणून घ्या काय आहे खास योजना?

RBI ची मोठी कारवाई, या बँकेला ठोठावला 2 कोटींचा दंड, तुमच्या पैशांवर परिणाम?

(good news icici bank partnered with google pay now bank customers can buy fastag from google pay)