Google Pay सह 5 बड्या कंपन्यांना मोठा झटका, CCI ने दिले चौकशीचे आदेश

| Updated on: Nov 10, 2020 | 9:34 AM

सीसीआयने दिलेल्या 39 पानांच्या आदेशात असं म्हटलं आही की, कंपनीने कायद्याच्या कलमांमध्ये विविध तरतुदींचं उल्लंघन केलं आहे.

Google Pay सह 5 बड्या कंपन्यांना मोठा झटका, CCI ने दिले चौकशीचे आदेश
Google Pay वर तुमचा UPI पिन कसा बदलावा? जाणून घ्या स्टेप बाय स्टेप
Follow us on

नवी दिल्ली : डिजिटल पेमेंट अ‍ॅप गूगल पे (Google Pay) च्या अडचणी वाढणार आहेत. कारण, भारतीय प्रतिस्पर्धा आयोगा (CCI) ने गुगल पेविरोधात सविस्तर चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. गूगल पे हे एक प्रसिद्ध डिजिटल वॉलेट प्लॅटफॉर्म आहे. सीसीआयने दिलेल्या 39 पानांच्या आदेशात असं म्हटलं आही की, कंपनीने कायद्याच्या कलमांमध्ये विविध तरतुदींचं उल्लंघन केलं आहे. (google for alleged unfair business to google pay cci orders to probe )

या प्रकरणात महासंचालक (डीजी) यांच्यामार्फत चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. गूगल पेच्या संदर्भात कथित प्रतिस्पर्धीविरोधी व्यवहारासाठी ही तपासणी केली जात आहे. प्रतिस्पर्धा आयोगातील कलम 4 हे बाजारात आपल्या वर्चस्वाचा आणि प्रसिद्धिचा गैरवापर करण्यासंबंधी आहे.

नियामकांनी दिलेल्या माहितीनुसार, Google Pay चं वर्तन अयोग्य असून तो बाजारात कंपनी इतर अॅप्समध्ये भेदभाव करते. यामुळे पे च्या प्रतिस्पर्धी अ‍ॅपला बाजार जागा मिळत नाहीये.

या 5 कंपन्यांविरोधात चौकशी होणार आहे
सीसीआय या प्रकरणी 5 कंपन्यांची चौकशी करणार आहे. यामध्ये अल्फाबेट इंक (Alphabet Inc), गुगल एलएलसी (Google LLC), गुगल आयर्लंड लिमिटेड (Google Ireland Ltd), गुगल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (Google India Pvt Ltd) या पाच कंपन्या आहेत. गुगल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड आणि गुगल इंडिया डिजिटल सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड या दोन्ही कंपनींचे चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

इतर बातम्या – 

Paytm लघु उद्योजकांना 1000 कोटींचं कर्ज वाटणार, कोणत्याही गॅरंटीची गरज नाही

सुवर्णसंधी! दिवाळीआधी स्वस्तात सोनं खरेदीची संधी, सोमवारपासून सरकारची योजना सुरू

(google for alleged unfair business to google pay cci orders to probe)