Marathi News Business Gst latest news today in marathi monthly gst return filing deadline extended till 26 june 2021
जीएसटी रिटर्न भरण्याची मर्यादा सरकारने वाढविली, आता ‘या’ तारखेपर्यंत भरू शकता माहिती
मे महिन्यासाठी मंथली सेल डिटेल्स सादर करण्याची अंतिम मुदत 11 जून होती, जी आता 15 दिवसांनी वाढवून 26 जून करण्यात आली. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या अध्यक्षतेखाली 28 मे रोजी आयोजित जीएसटी परिषदे (GST Council) च्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. gst return filing deadline
जीएसटी परिषदेच्या या बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेत. 31 जुलै या आर्थिक वर्षात एकत्रित व्यापाऱ्यास वार्षिक परतावा भरण्यासाठी अंतिम तारखेची मुदतवाढ देण्यासही परिषदेने मान्यता दिलीय.
2 / 2
या व्यतिरिक्त, कंपनी अधिनियमांतर्गत नोंदणीकृत करदात्यांना 31 ऑगस्ट 2021 पर्यंत डिजिटल स्वाक्षरी प्रमाणपत्र (डीएससी) ऐवजी इलेक्ट्रॉनिक पडताळणी कोड (ईव्हीसी) वापरून जीएसटी रिटर्न भरण्याची परवानगी देण्यात आली आहे. या निर्णयामुळे व्यापारी वर्गाला मोठा दिलासा वाटतो.