आता काय करायचं? देशातील सर्वात मोठ्या बँकेचं लोन महागलं, द्यावा लागणार एवढा ईएमआय
एचडीएफसी बँकेने MCLR दरात 5 ते 15 बेसिस पॉइंटची वाढ केली आहे, ज्यामुळे 7 नोव्हेंबरपासून कर्ज महागणार आहे. गृहकर्ज, पर्सनल लोनसह अनेक कर्जाचे हप्ते वाढणार आहेत. विशेषतः ज्यांचे कर्ज MCLR ला लिंक आहे, त्यांना याचा फटका बसेल. तुमचा EMI किती वाढणार आणि कोणावर परिणाम होईल, हे सविस्तरपणे जाणून घ्या.

देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या एचडीएफसी बँकेने आपल्या ग्राहकांना मोठा झटका दिला आहे. बँकेने मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड बेस्ड लेंडिंग रेट (MCLR) वाढवला आहे. बँकेने सर्वात सात मुदतींच्या MCLR मध्ये 5 ते 15 बेसिस पॉइंटची वाढ केली आहे. नवीन दर 7 नोव्हेंबरपासून लागू करण्यात येणार आहे. बँकेच्या या निर्णयाने होम लोन, पर्सनल लोन आणि दुसरे कर्ज महागणार आहेत. त्यामुळे एचडीएफसी बँकेच्या ग्राहकांना मोठा झटका बसणार आहे.
पण, ज्यांचं एमसीआर लिंक्ड लोन आहे, त्यांच्याच कर्जात वाढ होणार आहे. या बदलासाठी एचडीएफसी बँकेचा एमसीएलआर 7.75 टक्के वाढून 7.85-8.70 टक्क्यांपर्यंत गेला आहे. पूर्वी हा 7.75 टक्के ते 8.55 टक्क्याच्या दरम्यान होता. बँकेने दीर्घ मुदतीच्या एमसीएलआरमध्येही वाढ केली आहे.
15 बेसिस पॉइंटची वाढ
बँकेने सहा महिने, एस वर्ष, दोन वर्ष आणि तीन वर्षाचा अवधी असणाऱ्या एमसीएलआरमध्ये 15 बेसिस पॉइंटची वाढ केली आहे. बाकी अवधीच्या एमसीएलआरमध्ये 5 ते 10 बेसिस पॉइंटची वाढ केली आहे. एका बेसिस पॉइंटचा अर्थ 0.01 टक्के होतो.
किती ईएमआय द्यावी लागणार?
जर तुम्ही एमसीएलआर लिंक्ड लोन घेतलं असेल आणि 20 लाख रुपयांचं लोन 20 वर्षासाठी असेल, त्याचं व्याज 8 टक्के असेल तर तुमचं व्याज वाढून 8.15 टक्के होईल. याचा अर्थ तुमची ईएमआय वाढणार आहे. 8 टक्के व्याजावर तुमचा ईएमआय 16,729 रुपये आहे आणि आता 8.15 टक्के झाल्याने दरमहा हप्ता 16,916 रुपये होणार आहे. म्हणजे तुमच्या महिन्याच्या हप्त्यात 200 रुपयांची वाढ होणार आहे.
कोणत्या ग्राहकांना फटका बसणार?
एमसीएलआरच्या वाढीमुळे ज्या ग्राहकांचे होम लोन, पर्सनल लोन, ऑटो लोन आणि दुसरे फ्लोटिंग रेट लोनचे व्याज एमसीएलआरशी लिंक्ड आहेत, त्यांना अधिक फटका बसणार आहे. याचा अर्थ असा नाही की सर्व ग्राहकांच्या कर्जात वाढ होईल, तर ग्राहकांचं लोन किती वाढेल हे त्या ग्राहकांचे लोन कोणत्या बेंचमार्कशी संबंधित आहे आणि लोन अॅग्रीमेंटमध्ये व्याज दर रिसेट तारीख काय आहे, त्यावरही सर्व अवलंबून आहे.