कोरोना काळात HDFC LIFE च्या मृत्यू दाव्यांत चार पटींनी वाढ; निव्वळ नफ्यात घट

| Updated on: Jul 21, 2021 | 12:14 PM

HDFC Life | कोरोनाकाळात HDFC Life ने जवळपास 4 कोटी जीवन विमा उतरवले. तसेच 2.9 लाख पेक्षा अधिक विम्याचे पैसे अदा केले. ही रक्कम जवळपास 3000 कोटी रुपये इतकी आहे.

कोरोना काळात HDFC LIFE च्या मृत्यू दाव्यांत चार पटींनी वाढ; निव्वळ नफ्यात घट
एचडीएफसी लाईफ
Follow us on

मुंबई: कोरोनाच्या काळात देशातील अनेक लोकांना जीव गमवावा लागला आहे. पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसऱ्या लाटेची तीव्रता जास्त होती. त्यामुळे या काळात HDFC LIFE कंपनीकडील मृत्यू-दाव्यांमध्ये तीन ते चार पटींनी वाढ झाल्याचे दिसून आले.एचडीएफसी लाइफ (HDFC Life) कंपनीकडून नुकतेच पहिल्या तिमाहीचे आकडे जाहीर करण्यात आले. यामध्ये एचडीएफसी लाईफकडून 70 हजार दावे निकालात काढण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे.

कोरोनाकाळात HDFC Life ने जवळपास 4 कोटी जीवन विमा उतरवले. तसेच 2.9 लाख पेक्षा अधिक विम्याचे पैसे अदा केले. ही रक्कम जवळपास 3000 कोटी रुपये इतकी आहे. यामुळे एचडीएफसी लाईफच्या निव्वळ नफ्यात लक्षणीय घट दिसून आली होती. निव्वळ नफा 33 टक्क्यांनी कमी होऊन 302 कोटी रुपये इतका राहिला. गेल्यावर्षी याचा तिमाहीत कंपनीला 451 कोटींची निव्वळ नफा झाला होता. गतिमान लसीकरणासह रुग्णसंख्याही लक्षणीय घसरत असली तरी यापुढे अपेक्षित दावे निकाली काढण्याच्यादृष्टीने 700 कोटी रुपयांचा निधी राखीव ठेवला आहे, अशी माहिती कंपनीकडून देण्यात आली आहे.

पेन्शन फंड ‘आयपीओ’मध्ये गुंतवण्याला मुभा, मोदी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत?

निवृत्तिवेतन निधी व्यवस्थापकांना लवकरच प्राथमिक समभाग विक्री (आयपीओ) आणि ठरावीक समभागांच्या यादीत गुंतवणूक करण्याला लवकरच परवानगी दिली जाण्याची शक्यता आहे. ‘निवृत्तिवेतन निधी नियामक व विकास प्राधिकरण (पीएफआरडीए)’चे अध्यक्ष सुप्रतिम बंडोपाध्याय यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना तसे संकेत दिले आहेत. त्यामुळे केंद्र सरकारकडून लवकरच यासंदर्भात घोषणा होण्याची शक्यता आहे. पेन्शन फंड आयपीओ, एफपीओ आणि ओएफएसच्या विशिष्ट मर्यादेच्या पुढे असणाऱ्या प्रस्तावांमध्येच गुंतवणूक करण्याची परवानगी असेल. ही गुंतवणूक विशिष्ट अटी-शर्तीसह केली जाईल , असे सुप्रतिम बंडोपाध्याय यांनी सांगितले.

संबंधित बातम्या:

20 वर्षांनंतर दर महिना 1.5 लाख रुपये कमवायचेत? जाणून घ्या किती गुंतवणूक करणं गरजेचं

SBI च्या 44 कोटी ग्राहकांसाठी चांगली बातमी, बँक घरी 20000 रुपयांपर्यंत रोकड पाठवणार, पण कशी?

PM Kisan Tractor Yojana: ट्रॅक्टर खरेदीवर मिळणार 50 टक्के सबसिडी, फायदा कसा मिळवायचा ते जाणून घ्या