
भारतातील नाही तर आशियामधील सर्वात श्रीमंत परिवारात अंबानी कुटुंबाचा समावेश होतो. अंबानी कुटुंब आपली लग्झरी लाइफस्टाइल आणि महाग फॅशन स्टेटमेंटसाठी प्रसिद्ध आहे. नीता अंबानीची पारंपरिक ज्वेलरी असो की ईशा अंबानीची एलीगेंट ज्वेलरी असो, प्रत्येक दागिन्यांमध्ये वेगळे वैशिष्ट असते. अंबानी परिवारातील नीता अंबानी, मुलगी ईशा आणि त्यांच्या सुनांकडे कोट्यवधींची ज्वेलरी आहे. 200 कोटींच्या बांगड्यांपासून (बाजूबंद) ते 450 कोटींच्या नेकलेसपर्यंतचे दागिने अंबानी कुटुंबाकडे आहेत. या कुटुंबाकडे एकूण किती कोटींचे दागिने आहेत, जाणून घेऊ या…
2024 च्या मिस वर्ल्डच्या अंतिम फेरीत नीता अंबानी यांनी बाजूबंद परिधान केला होता. हा सामान्य दागिना नव्हता. त्याची रचना मुघल काळातील शाही कारागिरीप्रमाणे होती. हा दागिना शाहजहानच्या कुटुंबाशी संबंधित आहे, असे मानले जाते. हिऱ्यांनी जडवलेल्या या बाजूबंदची किंमत सुमारे 200 कोटी रुपये असल्याचा अंदाज आहे.
श्लोका मेहता आणि आकाश अंबानी यांचे जेव्हा लग्न झाले तेव्हा लग्नात त्यांना एक भेटवस्तू मिळाली. ही ज्वेलरी मौवाड एल इन्कम्पैरेबल आहे. त्यात 407.48 कॅरेटचा पुखराज रंगाचा हिरा होता. त्याची किंमत 451 कोटी रुपये होती. आतापर्यंतचा सर्वात महागडा हारात त्याचा समावेश आहे.
अंबानी कुटुंबाची मुलगी ईशा अंबानी तिच्या ग्लॅमर आणि क्लासी फॅशन निवडींसाठी ओळखली जाते. तिच्याकडे एक अतिशय सुंदर हिऱ्याचा हार आहे. त्याची किंमत सुमारे 167 कोटी रुपये आहे. अनंत अंबानी यांची पत्नी राधिका मर्चेंट यांच्या लग्नात नीता अंबानी यांनी हिरे आणि मोतींचा सुंदर हार दिला होता. त्याची किंमत सार्वजनिक झाली नाही. परंतु त्याची किंमतही कोट्यवधी रुपयांमध्ये आहे.
अनंत अंबानी यांच्याजवळ Patek Philippe ची एक एक्सक्लूसिव्ह घड्याळ आहे. दोन्ही बाजूंनी त्याचे डायल आहे. त्याची डिझाइन खूप वेगळी आहे. या घड्याळाची किंमत 54 कोटी आहे. जगातील सर्वात महाग घड्याळ्यात तिचा समावेश होतो. आकाश अंबानी यांच्याकडे 13.2 कोटींचा ब्रोच आहे. तो 18 कॅरेट गोल्डपासून तयार केला आहे. त्यात हिरे आणि किंमती स्टोन्स लावण्यात आले आहे.