RBI च्या निर्णयाने IDBI बँकेची चांदी, गुंतवणूकदारांना फायदाच फायदा

| Updated on: Mar 12, 2021 | 5:13 PM

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (RBI) एक महत्त्वपूर्ण निर्णयामुळे आयडीबीआय बँकेला (IDBI Bank) चांगला फायदा झालाय (IDBI share price jumps 17 percent after RBI decision).

RBI च्या निर्णयाने IDBI बँकेची चांदी, गुंतवणूकदारांना फायदाच फायदा
Follow us on

मुंबई : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (RBI) एक महत्त्वपूर्ण निर्णयामुळे आयडीबीआय बँकेला (IDBI Bank) चांगला फायदा झालाय. विशेष म्हणजे गेल्या काही दिवसांपासून आयडीबीआय बँक ही थोडं आर्थिक संकटांशी झुंजत होती. मात्र, रिझर्व्ह बँकेने या गोष्टीची दखल घेतल्याने आयडीबीआय बँकेला आणि या बँकेतील गुंतवणुकदारांना फायदा झालाय. रिझर्व्ह बँकेने आयडीबीआय बँकेसाठी प्रॉम्प्ट करेक्टिव्ह अ‍ॅक्शन केली. या अ‍ॅक्शनमुळे शेअर बाजारात आयडीबीआय बँकेचे शेअर प्रचंड तेजीत आले (IDBI share price jumps 17 percent after RBI decision).

आयडीबीआयचे शेअर्स 17.60 टक्क्यांच्या तेजीत

आयडीबीआय बँकेचे शेअर 10 मार्चला 38.25 रुपयांनी बंद झाले होते. त्याचदिवशी आरबीआयने प्रॉम्प्ट करेक्टिव्ह अ‍ॅक्शनचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे 11 मार्चला जेव्हा शेअर मार्केट सुरु झाली तेव्हा आयडीबीआयचे शेअर्स 17.60 टक्क्यांच्या तेजीत 45 रुपयांवर पोहोचले. दुपारी सव्वा बारा वाजता आयडीबीआयचे शेअर्स 11.50 टक्क्यांच्या तेजीत 42.65 रुपयांवर ट्रेड करत होते.

गुंतवणुकदारांना तुफान फायदा

रिझर्व्ह बँकेच्या आयडीबीआय बँकेबाबतच्या या निर्णयाचा बँकेतील गुंतवणुकदारांना चांगलाच फायदा झाला. आयडीबीआयच्या गुंतवणुकदारांनी एका दिवसात तब्बल 4400 कोटींची कमाई केली. गेल्या सत्रात आयडीबीआयचा मार्केट कॅप हा 41127 कोटी इतका होता. तो आता 45697 कोटींवर पोहोचला आहे (IDBI share price jumps 17 percent after RBI decision).

गेल्या काही महिन्यांपासून आयडीबीआय बँकेची आर्थिक स्थिती थोडी संकटात आली होती. मार्च 2017 मध्ये आयडीबीआय बँकेचा एनपीए 13 टक्क्यांचा पुढे गेला होता. दरम्यान, 18 फेब्रुवारी 2021 रोजी फायनान्शिअल मॉनिटरिंग बोर्डाच्या बैठकीत आयडीबीआय बँकेच्या कामगिरीचा आढावा घेण्यात आला होता.

बँकांना वाचवण्यासाठी आरबीआय अशाप्रकारचा निर्णय घेते

बँक व्यवहार करताना बऱ्याचदा आर्थिक संकटात अडकतात. त्यांना संकटातून बाहेर काढण्यासाठी त्याचबरोबर त्याची जाणीव करुन देण्यासाठी आरबीआयकडून वेळोवेळी दिशानिर्देश जारी केले जातात. प्रॉम्प्ट करेक्टिव्ह अ‍ॅक्शन अशाचप्रकारचं एक फ्रेमवर्क आहे. या फ्रेमवर्कमुळे बँकेचं कामकाज पुन्हा पूर्वपदावर येण्यास मदत होते.

तिसऱ्या तिमाहीत आयडीबीआय बँकेला फायदा

आर्थिक वर्ष 2021-21 च्या तिसऱ्या तिमाहीत डिसेंबर महिन्यात आयडीबीआय बँकेचं नेट प्रॉफिट 378 कोटी रुपये इतकं होतं. त्यावेळी इंट्रेस्ट रेटमध्ये वाढ होऊन बँकेला फायदा झाला. विशेष म्हणजे गेल्या आर्थिक वर्षात डिसेंबर महिन्यात बँकेला 5763 कोटींची झळ सोसावी लागली होती. दरम्यान, या आर्थिक वर्षात नेट इंट्रेस्ट इनकम ही 18 टक्क्यांनी वाढून 1810 कोटी रुपये होती. तर गेल्या वित्त वर्षाची ही रक्कम 1532 कोटी इतकी होती.

हेही वाचा : आसामची निवडणूक फिरतेय परफ्यूमवाल्याभोवती !