तुम्ही देखील बनवत असाल इंस्टाग्राम रील तर, जाणून घ्या यातून कसा कमाविल्या जातो पैसा

| Updated on: Nov 12, 2022 | 5:44 PM

Instaram वर रिल्स हा प्रकार आता प्रत्येकाच्याच मोबाईलमध्ये पोहोचला आहे. अनेक जण रिल्स बनवून पैसे देखील कमावत आहे.

तुम्ही देखील बनवत असाल इंस्टाग्राम रील तर, जाणून घ्या यातून कसा कमाविल्या जातो पैसा
रेल्वे ट्रॅकवर इन्स्टा रिल्स बनवणे महागात पडले
Image Credit source: Social Media
Follow us on

मुंबई, सोशल मीडियावर रिल्स हा प्रकार सध्या जास्तच ट्रेंडमध्ये आहे. अनेक जण हौस म्हणून रिल्स बनवितात मात्र यापासून मोठी कमाई देखील केली जाऊ शकते. लोकं दररोज रीलवर बराच वेळ घालवत आहेत आणि विशेष म्हणजे वापरकर्त्यांना त्यावर भरपूर सामग्री मिळत आहे. इंस्टाग्रामवर रिल्स बनविणाऱ्यांची संख्या देखील खूप मोठी आहे. म्हणूनच इंस्टाग्राम (Instagram Reels) त्याच्या वापरकऱ्यांसाठी बोनस कार्यक्रम देखील राबवत आहे.

म्हणजे इंस्टाग्राम केवळ अशाच वापरकर्त्यांना या बोनस प्रोग्रामचा भाग बनवते, जे कंटेंटच्या अटी पूर्ण करतात. याशिवाय, इन्स्टाग्राम नियमांची यादी देखील आहे, ज्यामध्ये सहभागी वापरकर्त्यांना याचे पालन करावे लागते.

काय आहे  Instagram बोनस कार्यक्रम

Instagram Reels Play हा एक विशेष बोनस प्रोग्राम आहे ज्याद्वारे तुम्ही रील सामग्रीवर पैसे कमवू शकता. हा एक फक्त-निमंत्रित बोनस प्रोग्राम आहे, ज्यासाठी काही वापरकर्त्यांना Instagram द्वारे आमंत्रित केले जाते. जर तुम्हाला आमंत्रित केले गेले असेल, तर तुम्हाला एक सूचना मिळेल, त्यानंतर तुम्हाला विहित प्रक्रियेत या कार्यक्रमात सहभागी व्हावे लागेल. यामध्ये रील अपलोड करण्यापूर्वी इन्स्टाग्रामवर माहिती द्यावी लागेल.

हे सुद्धा वाचा

कोणत्या वापरकर्त्यांना मिळते संधी?

इंस्टाग्रामच्या अधिकृत वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, ते वापरकर्त्यांच्या रीलच्या कामगिरीच्या आधारावर निवडले जातात. यामध्ये रीलचा आशय, आक्षेपार्ह भाषा, आक्षेपार्ह दृश्ये अशा अनेक गोष्टीही पाहायला मिळतात. रिल्ससाठी सध्या इंग्रजीसह अनेक भाषांमधील सामग्रीला प्राधान्य दिले जात आहे.

हे लोकं नाकारले जातात

इंस्टाग्रामच्या मते, त्या रील निवडलेल्या नाहीत, ज्यावर इतर कोणत्याही धारकाने दावा केला आहे. तुमच्या खात्यावर 3 स्ट्राइक आल्यास, तुम्ही एका महिन्यासाठी त्यासाठी पात्र असणार नाही. त्याच वेळी, जर तुम्ही अपीलमध्ये स्वतःला योग्य सिद्ध केले तर तुम्हाला संधी मिळू शकते. त्याच वेळी, रीलमध्ये कोणतीही ब्रँडेड सामग्री असली तरीही, तुमची सामग्री नाकारली जाईल. कंटेंटमध्ये कंपनीचे नाव, लोगो वापरल्यास अडचण येऊ शकते.

अशा प्रकारे पैसे कमवू शकता

2019 मध्ये फेसबुकने इंस्टाग्राम रील्सची सुरुवात केली होती, त्यावेळी ती फक्त काही देशांमध्ये रिलीझ झाली होती, परंतु 2020 मध्ये फेसबुकने इंस्टाग्राम रील सर्वांसाठी पूर्णपणे जारी केली. इंस्टाग्राम रील हे पैसे कमावणारे एक चांगले ॲप आहे ज्यामध्ये तुम्ही शॉर्ट्स व्हिडिओ बनवून सहज पैसे कमवू शकता.

यासाठी तुम्हाला इन्स्टाग्राम रीलमधून पैसे मिळवण्यासाठी आधी तुमचे फॉलोअर्स वाढवावे लागतील. तरच तुम्हाला प्रायोजकांसाठी ऑफर मिळतील आणि 10000 फॉलोअर्स असताना Facebook रील्सची कमाई देखील करते. Instagram Reels मध्ये तुमचे फॉलोअर्स वाढवून पैसे कमवण्यासाठी तुम्ही खाली नमूद केलेल्या काही टिप्स फॉलो करू शकता.