HDFC ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; आजपासून उद्यापर्यंत बँकेच्या सेवा 18 तास बंद, जाणून घ्या

| Updated on: Aug 21, 2021 | 10:28 AM

बँकेच्या काही सेवा शनिवार ते रविवार 18 तास बंद राहतील, अशी माहिती बँकेनं दिलीय. बँकेने ही माहिती आपल्या ग्राहकांना ई-मेलद्वारे पाठवली आहे. डिजिटल बँकिंग सुविधा आणखी सुधारण्यासाठी बँक मेंटेनन्सचे काम करेल.

HDFC ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; आजपासून उद्यापर्यंत बँकेच्या सेवा 18 तास बंद, जाणून घ्या
HDFC Bank
Follow us on

नवी दिल्ली : जर तुम्ही एचडीएफसी बँकेचे ग्राहक असाल तर तुमच्यासाठी नक्कीच एक चांगली बातमी आहे. देशातील सर्वात मोठी खासगी क्षेत्रातील एचडीएफसी बँकेच्या ग्राहकांना आठवड्याच्या शेवटी काही समस्यांना सामोरे जावे लागू शकते. बँकेच्या काही सेवा शनिवार ते रविवार 18 तास बंद राहतील, अशी माहिती बँकेनं दिलीय. बँकेने ही माहिती आपल्या ग्राहकांना ई-मेलद्वारे पाठवली आहे. डिजिटल बँकिंग सुविधा आणखी सुधारण्यासाठी बँक मेंटेनन्सचे काम करेल.

जाणून घ्या कोणत्या वेळी या सेवा बंद होतील?

एचडीएफसी बँकेने कळवले आहे की, या सेवा 21 ऑगस्ट 2021 रोजी रात्री 9 ते 22 ऑगस्ट 2021 रोजी दुपारी 3 पर्यंत प्रभावित होतील. ग्राहकांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल खेद असल्याचे बँकेचे म्हणणे आहे. त्याच वेळी त्याला अपेक्षा आहे की, ग्राहक या कामात त्याला सहकार्य करतील.

या सेवा कार्य करणार नाहीत

दरम्यान, नेटबँकिंग आणि मोबाईल बँकिंगवरील कर्ज सेवा प्रभावित होणार आहे. अशा परिस्थितीत जर तुमच्याकडे कोणतेही महत्त्वाचे काम असेल तर ते आज संध्याकाळी 6 च्या आधी करा अन्यथा तुम्हाला सोमवारपर्यंत थांबावे लागेल.

बँकेने काय सांगितले ते जाणून घ्या?

प्रिय ग्राहक, एचडीएफसी बँकेबरोबर बँकिंग केल्याबद्दल धन्यवाद. आम्हाला आशा आहे की तुम्ही आणि तुमचे प्रियजन सुरक्षित असाल. आपल्याला सर्वोत्तम डिजिटल बँकिंग अनुभव देण्यासाठी आमच्या सतत प्रयत्नांचा भाग म्हणून आम्ही नियोजित देखभाल करत आहोत. या उपक्रमादरम्यान कर्जाशी संबंधित सेवा प्रभावित होतील. या गैरसोयीबद्दल आम्ही दिलगीर आहोत.

SBI च्या 44 कोटी ग्राहकांसाठी अलर्ट

आजच्या तारखेमध्ये आधार कार्ड हा आमच्या ओळखीचा सर्वात महत्त्वाचा दस्तऐवज बनलाय. याशिवाय कोणताही मोठा आर्थिक व्यवहार शक्य नाही. बँक खात्यापासून सरकारी योजनांपर्यंत सर्वत्र आधार कार्ड आवश्यक आहे. आपण सरकारद्वारे प्रदान केलेल्या अनेक फायद्यांपासून वंचित राहू शकता. देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने आपल्या ग्राहकांना गैरसोय टाळण्यासाठी आधार कार्डशी संबंधित काम लवकरात लवकर पूर्ण करण्यास सांगितले आहे.

संबंधित बातम्या

‘या’ राज्यातील कर्मचाऱ्यांना महागाई भत्त्याचं गिफ्ट, 28 लाख कर्मचारी आणि पेन्शनधारकांना लाभ

SBI च्या 44 कोटी ग्राहकांसाठी अलर्ट! लवकरात लवकर करा हे काम, अन्यथा पैशांची अडचण येणार

Important news for HDFC customers; Bank services closed for 18 hours from today to tomorrow, find out