Gold ATM : आता एटीएममधून काढा सोनं, देशात या ठिकाणी सुरु झाले पहिले गोल्ड एटीएम

| Updated on: Dec 06, 2022 | 4:41 PM

Gold ATM : देशात पहिल्यांदाच Gold ATM सुरु झाले आहे..

Gold ATM : आता एटीएममधून काढा सोनं, देशात या ठिकाणी सुरु झाले पहिले गोल्ड एटीएम
एटीएममधून बाहेर येईल सोने
Image Credit source: सोशल मीडिया
Follow us on

हैदराबाद : भारतीयांचे सुवर्णप्रेम काही लपलेले नाही. चीननंतर जगात भारत हा सर्वाधिक सोनं आयात (Gold Import) करतो. देशात गेल्यावर्षी 1,050 टन सोनं आयात करण्यात आलं होतं. आता सोनं खरेदी करणं खूप सोप्पं झालं आहे. देशात पहिले गोल्ड एटीएम (India’s First Gold ATM), सुरु करण्यात आले आहे. तुम्ही कॅशलेस पेमेंटच्या (Cashless Payment) मदतीने एका मिनिटात सोने खरेदी करु शकता. म्हणजे सोने खरेदी करण्यासाठी तुम्हाला सराफा बाजारात जाण्याची, सोन्या-चांदीच्या दुकानात जाण्याची गरज नाही. गोल्ड एटीएममधून तुम्ही झटपट सोनं खरेदी करु शकता.

देशातील पहिले गोल्ड एटीएम तेलंगणा राज्यात हा प्रयोग करण्यात आला आहे. हैदराबाद येथे गोल्ड एटीएम सुरु करण्यात आले आहे.हे गोल्ड एटीएम गोल्डसिक्का प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने सुरु केले आहे. हे देशातील पहिले रिअल टाईम गोल्ड डिस्पेन्सिंग मशीन असल्याचा कंपनीचा दावा आहे.

हे सुद्धा वाचा

याबाबत कंपनीने त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन ट्विट करत माहिती दिली. यामध्ये कंपनीने दावा केला आहे की, ते भारताला पुन्हा सोने की चिड़िया आणि गोल्डन तेलंगणा (बंगारू तेलंगणा) करण्यासाठी कंपनी योगदान देणार आहे. त्यासाठीच गोल्ड एटीएम सुरु केल्याचा दावा करण्यात येत आहे.

या गोल्ड एटीएममध्ये कॅशलेस पेमेंट करता येणार आहे. हे गोल्ड एटीएम 24 तास सुरु राहतील, असे कंपनीने सांगितले. कोणताही ग्राहक त्याच्या गरजेनुसार, सोनं खरेदी करु शकतो. त्याच्या आर्थिक गरजेनुसार, त्याला सोनं खरेदी करता येईल.

डेबिट आणि क्रेडिट कार्डच्या माध्यमातून सोने खरेदी करता येईल. यामाध्यमातून रोख रक्कमेचा वापर न करता ग्राहकांना सोने खरेदी करता येईल. तात्काळ सोने खरेदीसाठी लोकांना या एटीएमचा वापर करता येणार आहे. काही बटणांचा वापर केल्यानंतर सोने खरेदी पूर्ण होईल.

या एटीएममध्ये सध्याचा जो भाव आहे. त्याआधारे सोने खरेदी करता येईल. या एटीएम मशीनच्या स्क्रीनवर बाजार भाव दिसून येईल. त्याआधारे खरेदीदारांना कॅशलेस सोने खरेदी करता येईल. या एटीएममधून 0.5 ते 100 ग्रॅमपर्यंतचे सोने बाहेर येईल.