
अनेकदा तुम्ही पाहिले असेल की दारू पिताना बारमध्ये चकना म्हणून शेंगदाणे दिले जातात. दारु पिणारी माणसे चकण्यात दिलेले शेंगदाणे (मूंगफली) चघळल असतात. अवघ्या पाच किंवा दहा रुपयांच्या छोट्या पॅकेटमध्ये मिळणारा हा चकना आज भारतात सर्वाधिक लोकप्रिय आहे. पण याच साध्या शेंगदाण्यांचा एकूण व्यवसाय तुम्हाला थक्क करणारा आहे. 2024 पर्यंत भारतातील पीनट मार्केटचा आकार तब्बल 7.45 बिलियन अमेरिकन डॉलर म्हणजे जवळपास 6 लाख कोटी रुपयांवर पोहोचला आहे आणि तो आणखी वेगाने वाढतोय.
किती होतोय एकूण बिझनेस?
हा आकडा फक्त कच्चे शेंगदाणेच नव्हे, तर पीनट बटर, पीनट चिक्की, प्रोसेस्ड स्नॅक्स यांचाही समावेश आहे. विशेष म्हणजे पीनट बटर मार्केट तर आणखी झपाट्याने वाढत आहे. मार्केट अँड डेटा रिसर्चच्या अहवालानुसार, २०२५ ते २०३२ या कालावधीत भारतीय पीनट बटर मार्केट ११.२१ टक्के सीएजीआरने वाढणार आहे.
वाचा : बारमध्ये दारूसोबत शेंगदाणे का देतात? नेमकं कारण तरी काय? जाणून घ्या
का वाढतोय हा बिझनेस?
या प्रचंड वाढीमागे अनेक कारणे आहेत. प्रोटीनयुक्त, कमी फॅट असलेले आणि नैसर्गिक पदार्थांना तरुणवर्गाची वाढती पसंती, जिम-फिटनेस कल्चर, पाश्चिमात्य जीवनशैलीचा प्रभाव आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे ई-कॉमर्सचा झपाट्याने विस्तार. आता अमेझॉन, फ्लिपकार्ट, बिगबास्केट, ब्लिंकिट, झेप्टोसारख्या प्लॅटफॉर्ममुळे अगदी लहान गावातही पीनट बटरचे जार सहज उपलब्ध झाले आहेत.
बाजारात सध्या “क्रंची पीनट बटर” अर्थात कुरकुरा पीनट बटर सर्वाधिक लोकप्रिय आहे. २०२१ मध्येच क्रंची व्हर्जनने एकट्याने बाजाराच्या ४५ टक्क्यांहून अधिक महसूल मिळवला होता. क्रीमी पीनट बटरच्या तुलनेत क्रंचीमध्ये जास्त फायबर आणि कमी सॅच्युरेटेड फॅट असल्याने आरोग्याच्या दृष्टीनेही याला पसंती मिळते. थोडक्यात, दारूच्या दुकानाबाहेर पाच रुपयांत मिळणारा तोच साधा चकना आज 6 लाख कोटी रुपयांचा ब्रँडेड उद्योग बनला आहे. पुढील काही वर्षांत हा आकडा आणखी दुप्पट-तिप्पट होण्याची शक्यता तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.