
वाढत्या महागाईने रुपयाला काही किंमत राहिली नाही असे आपण जाणतो. त्यातच डॉलरच्या तुलनेत सातत्याने रुपया ढासळत असल्याने जगातही आपली पत नाही असेल तुम्हाला वाटत असले. परंतू तुमच्या खिशात पाचशे ते दोन हजार रुपये असले तरी या देशात तुम्ही लखपती असल्यासारखे तुम्हाला वाटू शकते. या देशात रुपयाची व्हॅल्यू जास्त असल्याने तुमच्या खिशात हजार दोन हजार रुपये असले तरी तुम्ही लखपती असल्या सारखे वावरु शकता.
इराणची करन्सी इराणी रियाल जगातील सर्वात कमजोर चलन मानले जाते. येथे १ रुपयांची किंमत ४९० ते ५०० रियालच्या बरोबरीचे असते. जर तुम्ही केवळ दहा हजार रुपये घेऊन इराणला जाल तर त्याची किंमत सुमारे ५० लाख रियाल होते.
व्हीएतनामच्या करन्सीचे नाव डोंग आहे. आणि यालाही जगातील सर्वात कमजोर करन्सी आहे. एक भारतीय रुपया येथे सुमारे ३०० व्हीएतनामी डोंगच्या समकक्ष आहे. सरकार जाणूनबुजून याची व्हॅल्यू कमी ठेवते, म्हणजे देशाची निर्यात वाढू शकेल. यामुळे येथे भारतीय पर्यटकांसाठी हे एक सर्वोत्तम परवडणारे डेस्टीनेशन बनले आहे.
इंडोनेशियाची करन्सी रुपिया नावाने ओळखली जात असली तर तिची किंमत भारतीय रुपयांहून कमी आहे. येथे १ भारतीय रुपया तुम्हाला १८५ ते १९० इंडोनेशियाई रुपियाच्या बरोबर आहे. खास बाब म्हणजे इंडोनेशियाची अर्थव्यवस्था कमजोर नाही. तरीही करन्सी व्हॅल्यू कमी आहे. यासाठी जर तुम्ही ५,००० रुपये घेऊन गेलात तर तर ते सुमारे ९ लाख रुपियाच्या तोडीचे असतील.
लाओसची किप देखील जगातील सर्वात स्वस्त करन्सी म्हटले जाते. येथे १ भारतीय रुपया तुम्हाला २५० ते २६० किप देऊ शकतो. लाओस एक छोटा आणि सुंदर देश असून अजूनही विकसनशील आहे. भारतीय पर्यटकांसाठी येथे स्वस्ताई आहे. येथे कमी पैशात निसर्ग आणि इतिहासाचा शानदार अनुभव घेऊ शकतो.
आफ्रीकेचा देश गिनीत एक भारतीय रुपयाची किंमत सुमारे १०० गिनी फ्रँकच्या बरोबर आहे. या देशात बॉक्साईट आणि लोह सारख्या खनिजांवर संशोधन झाले असूनही याची करन्सी कमजोर आहे. राजकीय अस्थिरता आणि इन्फ्रास्ट्रक्चरची कमतरतेमुळे हे घडत आहे. येथील आफ्रीकन संस्कृती आणि वाईल्डलाईफला जवळून पाहण्याची संधी आहे.त्यामुळे गिनी भारतीय पर्यटकांचे आवडते ठिकाण आहे.