AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दादांच्या जागी आम्ही आजही…; सुनेत्रा पवारांच्या शपथविधीवर रोहित पवार स्पष्टच बोलले, म्हणाले 13 दिवस…

बारामती विमान अपघातात निधन झालेल्या क्रू-मेंबर पिंकी माळी यांच्या कुटुंबियांची रोहित पवार यांनी भेट घेतली. अजित पवारांच्या जागी सुनेत्रा पवारांचा शपथविधी आणि राजकीय घडामोडींवर रोहित पवारांनी महत्त्वाची प्रतिक्रिया दिली.

दादांच्या जागी आम्ही आजही...; सुनेत्रा पवारांच्या शपथविधीवर रोहित पवार स्पष्टच बोलले, म्हणाले 13 दिवस...
rohit pawar sunetra pawar
| Updated on: Feb 01, 2026 | 11:06 AM
Share

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बारामती येथे झालेल्या एका भीषण विमान अपघातात दुर्दैवी निधन झाले. मुंबईहून बारामतीकडे येत असताना सकाळी ८.४६ च्या सुमारास तांत्रिक बिघाडामुळे त्यांचे विमान धावपट्टीपासून काही अंतरावर एका शेतात कोसळले. जमिनीवर आदळताच विमानाचा भीषण स्फोट झाला. या हृदयद्रावक घटनेत अजित पवार यांच्यासह विमानातील वैमानिक आणि कर्मचारी अशा एकूण ५ जणांचा जागीच मृत्यू झाला. यात क्रू-मेंबर पिंकी माळी यांचाही समावेश होता. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी नुकतंच माळी कुटुंबाची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या.

रोहित पवारांनी घेतली क्रू-मेंबर पिंकी माळींच्या कुटुंबियांची भेट 

एका टॅक्सी चालकाने आपल्या मुलीच्या शिक्षणासाठी स्वतःची खोली विकली, तिला मोठं केलं आणि ती मुलगी आपल्या घराची जबाबदारी पेलत असतानाच काळाने तिच्यावर झडप घातली, हे पाहून मन सुन्न झालंय,” असे राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार म्हणाले. बारामती येथे झालेल्या विमान अपघातात मृत्युमुखी पडलेल्या क्रू-मेंबर पिंकी माळी यांच्या कुटुंबियांची मुंबईत भेट घेतल्यानंतर ते बोलत होते. पिंकी यांचे वडील मुंबईत टॅक्सी चालवून घराचा गाडा ओढतात. पिंकीला उच्च शिक्षण मिळावे आणि तिचे करिअर घडावे यासाठी त्यांनी आपले राहते घरही विकले होते. पिंकीनेही अनेक नामांकित कंपन्यांमध्ये काम करून आपल्या वडिलांच्या कष्टाचे चीज केले होते. ज्यावेळी घराची परिस्थिती सावरू लागली होती, नेमक्या त्याच वेळी ही दुर्दैवी घटना घडली, असे रोहित पवार म्हणाले.

पवार कुटुंब आणि राष्ट्रवादी परिवार त्यांच्या सोबत

पिंकी माळी यांचा भाऊ अद्याप शिकत आहे. त्याची शिक्षणाची जिद्द पाहून आणि कुटुंबाची आर्थिक परिस्थिती लक्षात घेता, रोहित पवार यांनी त्याच्या नोकरीसाठी पूर्ण ताकदीने प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले आहे. भावाने कॅप्टन व्हावे अशी पिंकीची इच्छा होती, मात्र त्याचं शिक्षण अजून पूर्ण व्हायचंय. या कठीण काळात पवार कुटुंब आणि राष्ट्रवादी परिवार त्यांच्या सोबत आहे, असेही रोहित पवारांनी स्पष्ट केले.

आम्ही आजही सुनेत्रा वहिनींनाच पाहतो

यावेळी रोहित पवारांना अजित पवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या पदावर सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली, याबद्दल विचारले असता त्यांनी सविस्तर भाष्य केले. सुनेत्रा वहिनींनी शपथ घेतली याचा आनंद नक्कीच आहे. मात्र सध्या संपूर्ण पवार कुटुंब आणि महाराष्ट्र मोठ्या दुःखात आहे. अशा परिस्थितीत आम्ही त्यांना शुभेच्छा देऊ शकत नाही. दादांच्या जागी आम्ही आजही सुनेत्रा वहिनींनाच पाहतो. त्यांनी पद स्वीकारणे हा त्यांच्या पक्षाचा निर्णय आहे, असे रोहित पवार म्हणाले.

१३ दिवसांनी बोलेन

यावेळी राजकीय विलीनीकरण आणि इतर वादांवर सध्या बोलणे योग्य नसल्याचे रोहित पवारांनी स्पष्ट केले. पवार कुटुंब सध्या या धक्क्यातून सावरण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे राजकीय आरोप-प्रत्यारोप किंवा पक्षांतर्गत घडामोडींवर मी आजपासून १३ दिवसांनंतरच अधिकृतपणे बोलेन, असे रोहित पवार यांनी सांगितले. सध्या केवळ सांत्वन आणि मदतीला प्राधान्य असल्याचे रोहित पवार यांनी नमूद केले.

Follow Us
ममता बॅनर्जींच्या पाठिंब्यानंतर काँग्रेस उमेदवाराला अटक, बंगाल...
ममता बॅनर्जींच्या पाठिंब्यानंतर काँग्रेस उमेदवाराला अटक, नेमकं प्रकरण काय?
विविध ठिकाणी व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध, तीव्र आंदोलनाचा इशारा
विविध ठिकाणी व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध, तीव्र आंदोलनाचा इशारा
निवडणूक आयोगाने TMC चं चिन्ह गोठवताच, ममता बॅनर्जींचा मोठा निर्णय थेट
निवडणूक आयोगाने TMC चं चिन्ह गोठताच, ममता बॅनर्जींचा मोठा निर्णय थेट.... बंगालमध्ये राजकीय हालाचाली वाढल्या?
फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने..
Kalyan Nagar Highway | Rain | फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने प्रवाशांचे हाल
दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या
Eknath Shinde : दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या पंचनाम्यांसाठी प्रशासनाला तयारीचे आदेश
मराठमोळ्या गोंधळ सिनेमाची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड
Oscar2027 | मराठी सिनेमाची जगभरात दणदणीत एन्ट्री! गोंधळची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड
आदित्य ठाकरेंना अटक करा, दिशा सालियन प्रकरणावर राणेंची थेट मागणी
Nitesh Rane | आदित्य ठाकरेंना अटक करा, चौकशी करा...दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंची थेट मागणी; उद्धव ठाकरेंच्या आरोपांनाही  दिलं प्रत्युत्तर
ममता बॅनर्जींच्या गटाला फुटबॉल, ऋतब्रत गटाला लिफाफा...
TMC | ममता बॅनर्जींच्या गटाला फुटबॉल, ऋतब्रत गटाला लिफाफा! तृणमूल काँग्रेसच्या दोन गटांना निवडणूक आयोगाकडून नवी नावं-नवी चिन्हं जाहीर
Maharashtra Education | महाराष्ट्रात येणार 7 परदेशी विद्यापीठांचे, कॅम
Maharashtra Education | महाराष्ट्रात येणार 7 परदेशी विद्यापीठांचे, कॅम्पस फडणवीस म्हणाले...
ठाकरे सेनेचे आमदार सुनील प्रभू यांच्या गाडीची पादचाऱ्याला धडक
Sunil Prabhu | ठाकरे सेनेचे आमदार सुनील प्रभू यांच्या गाडीची पादचाऱ्याला धडक; 1 जण जखमी