पुढील वर्षी विम्याचा हप्ता 40 टक्क्यांनी वाढणार, कारण काय?

| Updated on: Nov 20, 2021 | 6:15 PM

इकॉनॉमिक टाइम्सच्या अहवालानुसार, कोरोनाच्या काळात विमा दाव्यांमध्ये वाढ झाली. अशा स्थितीत विमा कंपन्यांना प्रीमियम वाढवणेही एक सक्ती आहे. अनेक विमा कंपन्यांनी प्रीमियम वाढवण्यासाठी IRDAI कडे अर्जही सादर केलेत. काही विमा कंपन्या जागतिक पुनर्विमा कंपन्यांशी चर्चा करीत आहेत.

पुढील वर्षी विम्याचा हप्ता 40 टक्क्यांनी वाढणार, कारण काय?
insurance
Follow us on

नवी दिल्लीः पुढील वर्षापासून विमा खरेदी करणे महाग होणार आहे. जीवन विमा पॉलिसीसाठी तुम्हाला पुढील वर्षापासून 20-40 टक्के अधिक प्रीमियम भरावा लागेल. विमा कंपन्यांनी प्रीमियम शुल्क वाढवल्यास त्यांचा नफा वाढेल, परंतु पॉलिसीच्या मागणीत घट होऊ शकते. कोरोनानंतर विम्याबाबत लोकांची जागरूकता खूप वाढलीय. लोक स्वतःसाठी आणि कुटुंबासाठी विमा खरेदी करण्यावर भर देत आहेत. अशा परिस्थितीत प्रीमियम वाढल्याने या भावनेला धक्का बसू शकतो.

कोरोनाच्या काळात विमा दाव्यांमध्ये वाढ

इकॉनॉमिक टाइम्सच्या अहवालानुसार, कोरोनाच्या काळात विमा दाव्यांमध्ये वाढ झाली. अशा स्थितीत विमा कंपन्यांना प्रीमियम वाढवणेही एक सक्ती आहे. अनेक विमा कंपन्यांनी प्रीमियम वाढवण्यासाठी IRDAI कडे अर्जही सादर केलेत. काही विमा कंपन्या जागतिक पुनर्विमा कंपन्यांशी चर्चा करीत आहेत. त्यांचे म्हणणे आहे की, जर जागतिक पुनर्विमा कंपनीने त्याचे शुल्क वाढवले ​​नाही, तर ग्राहकांना अधिक प्रीमियम भरावा लागणार नाही. प्रीमियममधील वाढीचा परिणाम ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पॉलिसींवर होईल.

सहा महिन्यांपासून प्रीमियम वाढविण्याचा विचार

विम्याचा हप्ता वाढविण्याची चर्चा गेल्या सहा महिन्यांपासून सुरू आहे. आता यापुढे ओढता येणार नाही. कोरोना महामारीमुळे विमा दाव्यांमध्ये मोठी वाढ झाली. यामुळेच जागतिक पुनर्विमा कंपन्या आता अधिक शुल्क आकारत आहेत. अशा स्थितीत विमा कंपन्यांकडे प्रीमियम वाढविण्याशिवाय दुसरा पर्याय नाही.

लहान विमा कंपन्यांवर अधिक परिणाम

छोट्या विमा कंपन्यांकडे पुनर्विमादाराशी सौदेबाजी करण्याची लवचिकता नसते. अशा परिस्थितीत त्यांनी IRDAI समोर प्रीमियम वाढवण्यासाठी अर्ज सादर केलाय. त्याचबरोबर बड्या विमा कंपन्या अजूनही चर्चेच्या माध्यमातून ही समस्या टाळण्याचा प्रयत्न करत आहेत. एलआयसीचे अध्यक्ष एमआर कुमार यांनी अलीकडेच सांगितले होते की लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन पुनर्विमा कंपन्यांशी सतत चर्चा करत आहे.

रिटेल प्रीमियममध्ये 60% पर्यंत वाढ शक्य

मार्श इंडिया इन्शुरन्स ब्रोकर्सचे सीईओ संजय केडिया म्हणतात की, कॉर्पोरेट लाईफ इन्शुरन्सचे प्रीमियम आधीच वाढलेत. कॉर्पोरेट्स सध्या अतिरिक्त प्रीमियमचा भार सहन करत आहेत. ग्रुप कॉर्पोरेट पॉलिसींचा प्रीमियम दर 300-1000 टक्क्यांनी वाढला आहे. ते म्हणतात की, आगामी काळात रिटेल प्रीमियम 40-60 टक्क्यांनी वाढू शकतो, तर कॉर्पोरेट प्रीमियम 50-100 टक्क्यांनी वाढू शकतो.

संबंधित बातम्या

EPFO चा मोठा निर्णय, जमा पैशांपैकी 5% ‘या’ फंडात गुंतवले जाणार, फायदा काय होणार?

मोठी बातमी! महाराष्ट्रात आता दारू स्वस्त, सरकारने एक्साईज ड्युटी 150 टक्क्यांनी घटवली