अंबानी कुटुंबाने पारंपारिक पद्धतीने जगद्गुरु शंकराचार्य यांचे स्वागत, पाहा VIDEO

आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि ज्येष्ठ उद्योगपती मुकेश अंबानी यांनी आपला मुलगा अनंत अंबानी यांच्या लग्नासाठी कोणतीही कसर सोडली नाही. यावेळी अनेक मोठे व्यक्ती कार्यक्रमाला हजर होते. जगतगुरु शंकराचार्य हे देखील नवीन जोडप्याला आशीर्वाद देण्यासाठी पोहोचले होते.

अंबानी कुटुंबाने पारंपारिक पद्धतीने जगद्गुरु शंकराचार्य यांचे स्वागत, पाहा VIDEO
| Updated on: Jul 13, 2024 | 9:52 PM

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा शुभविवाह पार पडल्यानंतर शनिवारी अंबानी कुटुंबाने या जोडप्याला आशीर्वाद देण्यासाठी मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये एका खास कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या सोहळ्याचे नाव शुभ आशीर्वाद असे होते. या कार्यक्रमासाठी देशभरातील आणि जगातील नामवंत लोकांना आमंत्रित करण्यात आले होते. राजकारण्यांपासून ते चित्रपटसृष्टीतील सेलिब्रिटी आणि क्रिकेटपटू देखील या सोहळ्यासाठी सहभागी झाले होते. महत्त्वाचे म्हणजे जगद्गुरू शंकराचार्य यांना ही या कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात आले होते. मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांनी स्वतः सर्व पाहुण्यांचे स्वागत केले.

जगद्गुरू शंकराचार्य यांचे पारंपरिक पद्धतीने स्वागत

द्वारका पीठाचे शंकराचार्य स्वामी सदानंद सरस्वती आणि ज्योतिर्मठचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद हे अनंत आणि राधिका यांना ‘शुभ आशीर्वाद’ देण्यासाठी पोहोचले होते. मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. अनंत अंबानीचे आई-वडील नीता आणि मुकेश अंबानी यांचे पारंपरिक पद्धतीने त्यांचे स्वागत केले. नीता अंबानी यांनी शंकराचार्यांची आरती करून स्वागत केले. आरतीही वेगळ्या पद्धतीने झाली. नीता अंबानी यांच्या हातात कलश होता, जो एका खास पद्धतीने तयार करण्यात आला होता. नीता अंबानी शंकराचार्यांना आरती दाखवत असताना बाजूला मुकेश अंबानी हात जोडून उभे होते.

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या ‘शुभ आशीर्वाद’ सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी तुलसीपीठाचे संस्थापक प्रमुख जगद्गुरू रामभद्राचार्य मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये पोहोचले होते.

या सोहळ्याला आज माधुरी दीक्षित पतीसोबत, श्रीलंकन क्रिकेटर महेला जयवर्धने, सूर्यकुमार यादव, जैकी श्रॉफ, भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रित बुमकाह त्याच्या पत्नीसह, अर्जुन कपूर, देवकीनंदन ठाकूर, अथली कुमार, अभिताभ बच्चन, महेंद्र सिंह धोनी, मेरी कोम, अभिनेता शाहिद कपूर पत्नी मीरा राजपूत, प्रसिध्द दिग्दर्शक करण जोहर, बाबा रामदेव, अभिनेत्री सारा अली खान, पंडित धीरेंद्र शास्त्री, खली, विद्याबालन, रितेश देशमुख,सुपरस्टार रंजनीकांत, अभिनेत्री शनाया कपूर,अभिनेत्री दिशा पटानी, सचिन तेंडूलकर आपली पत्नी अंजली तेंडूलकर सोबत, सानिया मिर्जा, कुमार मंगलम बिरला, मनुषी छिल्लर, चंकी पांडे, अभिनेत्री हेमा मालिनी आणि मुलगी आहाना देवोल, अजय देवगन, संजय दत्त, क्रिकेटर के एल राहुल आपल्या पत्नी सह,अभिनेत्री शोभिता धुलीपाला,जान्हवी कपूर,अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चन आपली मुलगी आराध्यासह, साउथ सुपरस्टार राम चरण, क्रिकेटर रुषभ पंत हे पाहुणे आज या सोहळ्यासाठी पोहोचले होते.