AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महिनाभरापासून अप्पर सर्किट; पैसा झाला डबल, आता शेअर स्प्लिटच्या घोषणेने गुंतवणूकदारांच्या पडल्या उड्या

Jamshri Realty Share : या रिअल इस्टेट आणि कंस्ट्रक्शन कंपनीने गुंतवणूकदारांना एकदम मालामाल केले आहे. या शेअरने त्यांना दुप्पट फायदा मिळवून दिला आहे. गेल्या 35 बाजार सत्रात हा स्टॉक जोरदार घौडदौड करत आहे. कंपनीचा शेअर आज 5.65 टक्क्यांनी उसळून 289.95 रुपयांवर ट्रेड करत आहे.

महिनाभरापासून अप्पर सर्किट; पैसा झाला डबल, आता शेअर स्प्लिटच्या घोषणेने गुंतवणूकदारांच्या पडल्या उड्या
बाजारात या शेअरची तुफान चर्चा
| Updated on: Sep 03, 2024 | 11:16 AM
Share

रिअल इस्टेट आणि कंस्ट्रक्शनमधील पेनी स्टॉक जमश्री रिॲल्टीच्या (Jamshri Realty) स्टॉकने सलग 35 व्या सेशनमध्ये जोरदार घौडदौड केली आहे. कंपनीचा शेअर आज सकाळच्या सत्रात 5.65 टक्क्यांनी उसळून 289.95 रुपयांवर ट्रेड करत आहे. गेल्या 35 व्यापारी सत्रात हा शेअर सातत्याने 2 टक्क्यांहून अधिकचे अप्पर सर्किट लावत आहे. जामश्रीने नुकताच भारतीय बाजारात 100:1 या प्रमाणात एक्स स्प्लिटची घोषणा केलेली आहे.

शेअरची तुफान घौडदौड

जमश्री रिॲल्टीने 30 ऑगस्ट रोजी 2 टक्के अप्पर सर्किटवर 278.75 रुपये प्रति शेअरचा नवीन 52 आठवड्यातील उच्चांक गाठला आहे. या कंपनीने केलेला हा 34 वा उच्चांक आहे. आजही कंपनीच्या शेअरने 5 टक्क्यांची आगेकूच केली आहे. खासकरुन BSE वर हा शेअर 12 जुलैपासून सातत्याने 2 टक्क्यांच्या अप्पर सर्किटवर आहे. 12 जुलै 2024 ते 2 सप्टेंबर 2024 रोजीपर्यंत हा शेअर प्रत्येक व्यापारी सत्रात घौडदौड करत असल्याचे दिसून येते. 11 जुलै रोजी हा शेअर 142.25 रुपयांवर होता. त्यानंतर त्याने मोठा पल्ला गाठला. कंपनीचा शेअर आज सकाळच्या सत्रात 5.65 टक्क्यांनी उसळून 289.95 रुपयांवर ट्रेड करत आहे.

काय आहे माहिती?

16 ऑगस्ट रोजी हा शेअर 100:1 या रेशोत स्प्लिट झाला होता. त्यावेळी हा शेअर 228.75 रुपये प्रति शेअरवर बंद झाला होता. 16-30 ऑगस्ट दरम्यान जमश्री शेअरमध्ये 22 टक्क्यांची तेजी आली होती. 100:1 प्रमाणात हा शेअर स्प्लिट होईल. 1000 रुपयांच्या फेस व्हॅल्यू वर एका शेअरचे मूल्य 10 रुपये असून 100 शेअरमध्ये तो विभाजीत होईल.

5 वर्षांत 10000% अधिकची उसळी

जगातील बेस्ट व्हिस्की इंद्री तयार करणारी कंपनी पिकॅडिली ॲग्रोच्या शेअरमध्ये तुफान तेजीचे सत्र आहे. पिकॅडिली ॲग्रोचा शेअर गेल्या 5 वर्षांत 10400 टक्क्यांहून अधिकने उसळला आहे. या कंपनीचा शेअर 30 ऑगस्ट 2019 रोजी 7.34 रुपयांवर होता. तर हा शेअर या 29 ऑगस्ट 2024 रोजी मुंबई स्टॉक एक्सचेंजवर 788.45 रुपयांवर पोहचला आहे. गेल्या 4 वर्षांत कंपनीच्या शेअरमध्ये 8300 टक्क्यांहून अधिकची तेजी आली आहे.

सूचना : हा शेअरचा केवळ लेखाजोखा आहे. या शेअरची कामगिरी आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही प्रमाणित गुंतवणूक सल्लागाराकडून सल्ला आवश्य घ्या. तुमचा कोणत्या ही प्रकारचा फायदा अथवा नुकसानीला TV9 मराठी जबाबदार नसेल. पेनी शेअरमध्ये गुंतवणूक करताना जागरुक राहा. कंपनीचे फंडामेंटल तपासा. भूलथापांना अजिबात बळी पडू नका.

Follow Us
ठाकरेंच्या शिवसेनेला शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी अखेर परवानगी
ठाकरेंच्या शिवसेनेला शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी अखेर परवानगी
बारामतीत सुनेत्रा पवारांचा रात्री उशिरापर्यंत जनता दरबार
Sunetra Pawar | बारामतीत सुनेत्रा पवारांचा रात्री उशिरापर्यंत जनता दरबार
मुंबईत नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त विशेष नियोजन, गणेश मंडळांना..
मुंबईत PM नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त विशेष नियोजन, गणेश मंडळांना आवाहन
ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वाहतील जोरदार वारे, पुढील 3 तास
Weather Update : पुढील 3 तास महत्त्वाचे, ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वाहतील जोरदार वारे
पुण्यात भीषण अपघात, रात्रीच्या सुमारास भरधाव कंटेनरचा ब्रेक फेल, थेट..
पुण्यात भीषण अपघात, रात्रीच्या सुमारास भरधाव कंटेनरचा ब्रेक फेल, गाडी थेट...
मोठी बातमी! केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची आज मुंबईत पत्रकार परिषद
मोठी बातमी! केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची आज मुंबईत पत्रकार परिषद
शिंदेंचे आमदार संजय गायकवाडांच्या अडचणी वाढल्या? महिलेने केलेल्या...
शिंदेंचे आमदार संजय गायकवाडांच्या अडचणी वाढल्या? महिलेने केलेल्या गंभीर आरोपांमागे...
मुंबईत संततधार; विमानतळ परिसरात साचलं पाणी
Mumbai Rain Updates | मुंबईत संततधार; विमानतळ परिसरासह इतर भागांत साचलं पाणी
ब्रिक्स परिषदेदरम्यान भारत आणि चीनमध्ये झाले 7 महत्त्वाचे करार
India And China Agreement | ब्रिक्स परिषदेदरम्यान भारत आणि चीनमध्ये झाले 7 महत्त्वाचे करार
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
Chandrashekhar Bawankule | नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर! चंद्रशेखर बावनकुळेंनी जाहीर केले कठोर नियम, संपूर्ण व्हिडिओ पहा