Jensen Huang : विवाहबाह्य संबंध, हेरगिरीचं प्रकरण तरी जेन्सेन हुआंग पुन्हा CEO, कंपनीच्या शेअर्समध्ये मोठी वाढ!
Jensen Huang : जेन्सेन हुआंग पुन्हा सीइओ पदावर परतले असून कंपनीच्या शेअर्समध्ये मोठी वाढ झाली आहे.

जगातील आघाडीची चिप उत्पादक कंपनी Nvidia चे CEO जेन्सेन हुआंग पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. वैयक्तिक आयुष्याशी संबंधित वाद आणि चीनशी संबंध असल्याचा संशय असलेल्या एका व्यक्तीशी संबंधित कथित हेरगिरीचा मुद्दा समोर आल्यानंतर त्यांना CEO या पदावरून काढून टाकणार असल्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र, राजीनाम्यानंतर अवघ्या 11 दिवसांतच त्यांनी पुन्हा CEO पदाची सूत्रं हाती घेतली. विशेष म्हणजे, त्यांच्या घरवापसीनं केवळ कंपनीचा फायदा झाला नसून अमेरिकेची अर्थव्यवस्था आणि जागतिक शेअर बाजाराचाही मोठा बदल झाला आहे.
मंगळवारी जेन्सेन हुआंग यांनी Nvidia च्या कॅलिफोर्नियातील सॅन्टा क्लारा मुख्यालयात पुनरागमन केलं. यावेळी त्यांनी आपल्याकडून झालेल्या चुका मान्य केल्या. त्यांच्या येण्यानं कंपनीच्या शेअर्समध्ये 31.5 टक्क्यांची वाढ झाली. त्यामुळे हुआंग यांच्या संपत्तीतही जवळपास 30 टक्क्यांची भर पडली. फोर्ब्सच्या माहितीनुसार, त्यांची एकूण संपत्ती 144 अब्ज डॉलरवर पोहोचली असून जगातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीत ते 13व्या स्थानावर आले आहेत.
हुआंग यांच्या जाण्याने अमेरिकेच्या शेअर बाजाराला मोठा धक्का
जेन्सेन हुआंग यांच्या विवाहबाह्य संबंधांशी संबंधित वादाची चर्चा सुरू झाली. यामध्ये चीनशी संबंध असल्याचा संशय असलेल्या एका व्यक्तीचाही उल्लेख होता. या प्रकरणामुळे Nvidia च्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली आणि अमेरिकेच्या शेअर बाजारातील तब्बल 2 ट्रिलियन डॉलरचं मूल्य कमी झाल्याचं वृत्त आहे. मात्र, हुआंग यांच्या पुनरागमनानंतर परिस्थिती बदलली. कंपनीच्या शेअर्समध्ये झालेल्या 31.5 टक्क्यांच्या वाढीमुळे Nvidia च्या बाजारमूल्यात जवळपास 1 ट्रिलियन डॉलरची भर पडली.
जेन्सेन हुआंग हे कंपनीच्या कामकाजातील अगदी छोट्या-छोट्या गोष्टींवर लक्ष ठेवणारे CEO म्हणून ओळखले जातात. कंपनीतील महत्त्वाचे निर्णय आणि कामकाजाचा तपशील त्यांच्या माध्यमातून पुढे जात असल्याचं सांगितलं जातं. विशेष म्हणजे, जवळपास 60 कर्मचारी थेट त्यांना रिपोर्ट करत असल्याची माहिती आहे. त्यामुळे Nvidia च्या संपूर्ण व्यवस्थेत हुआंग यांचं स्थान अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं. त्यांच्या नेतृत्वाखाली कंपनीनं गेमिंग चिप्सपासून AI उद्योगातील सर्वात प्रभावशाली कंपन्यांपैकी एक होण्यापर्यंतचा प्रवास केला आहे. त्यामुळे त्यांच्या जाण्याचा परिणाम केवळ कंपनीच्या व्यवस्थापनावरच नव्हे, तर संपूर्ण AI उद्योगावर होण्याची शक्यता आहे.