Jio : इंटरनेट नको फक्त कॉलिंगसाठी रिचार्ज करायचाय? मग 100 रूपयांपासून सुरू होणारे हे रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठीच
बऱ्यांच लोकांना इंटरनेटची गरज नसताना देखील महागडा रिचार्ज करावा लागतो.पण Traya च्या नव्या नियमानुसार आता ग्राहाकांना फक्त कॉलिंगसाठी फोनची रिचार्ज करता येणार आहे. त्यासाठी Jio ने 100 रूपयांपासून रिचार्ज प्लॅन लागू केले आहेत

मोबाईल रिचार्ज करताना आपण अनेकदा इंटरनेटसाठीही पैसे मोजतो. पण काही लोकांना मोबाईलवर फक्त कॉलिग आणि मेसेजिंचीच गरज असते. काहीजण तर इंटरनेटसाठी Wi Fi वापरतात किंवा दुसर सिम फक्त कॉलिंगसाठीच ठेवतात.
अशा ग्राहकांसाठी जिओने आता चार नवीन व्हॉईस ओन्ली रिचार्ज आणले आहेत. म्हणजेच फक्त कॉलिंगसाठी वापरतात. या प्लॅनची सुरूवातीची किंमत फक्त 147 रूपये आहे. ज्यामुळे ज्यांना इंटरनेटची गरज नाही, डेटाची गरज नाही, त्यांच्यासाठी हे पर्याय उपयोगी आहेत.
जिओचे चार नवीन प्लॅन कोणते : जिओने 147,177,196 आणि 197 असे चार कॉलिंगसाठी प्लॅन सादर केले आहेत. या चारही प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंग आणि 30 MMS मिळतात. मात्र, यामध्ये मोबाईल इंटरनेट डेटा मिळत नाही.
147 रूपयांचा प्लॅन :हा या चार पर्यायांमधील सर्वात स्वस्त प्लॅन आहे. यामध्ये 22 दिवसांची वैधता मिळते. या संपूर्ण कालावधीत अनलिमिटेड कॉलिंग आणि 300 MMS ची सुविधा मिळते.
177 रूपयांचा प्लॅन :ज्यांना थोडी जास्त वैधता हवी आहे.त्यांच्यासाठी हा पर्याय आहे. 177 रूपयांच्या रिचार्जमध्ये 28 दिवसांची वैधता अनलिमिटेड कॉलिंग आणि 300 MMS मिळतात.
196 रूपयांचा प्लॅन :या प्लॅनची किंमत 196 रूपये असून त्यामध्ये 30 दिवसांची वैधता मिळते. अनलिमिटेड कॉलिंग आणि 300 MMS चे फायदे मिळतात.
197 रूपयांचा प्लॅन सर्वात वेगळा : या प्लॅनमध्ये 197 रूपये रिचार्ज केल्यावर एका महिन्याची वैधता मिळते. म्हणजेच ठराविक 30 दिवसांनी केलेल्या तारखेपासून पुढील महिन्यातील त्याच तारखेपर्यंत वैधता असते. या प्लॅनमध्येही अनलिमिटेड कॉलिंग आणि 300MMS मिळतात.
84 दिवस आणि 336 दिवसांचे पर्यायही उपलब्ध : जिओकडे याआधीपासून 448 आणि 1,748 रूपयांचे दोन दीर्घ वैधतेचे कॉलिंग प्लॅन आहेत. 448 रूपयांच्या प्लॅनमध्ये 84 दिवसांची वैधता आणि 1,000 MMS मिळतात. तर 1,748 रूपयांच्या प्लॅनमध्ये 336 दिवसांची वैधता आणि 3,600 MMS मिळतात. या दोन्ही प्लॅनमध्ये जिओटीव्ही आणि जिओ AI CLOUD सारखे अतिरिक्त फायदेही दिले जातात.
कोणासाठी उपयोगी आहेत हे प्लॅन :ज्यांच्याकडे साधा फिचर फोन आहे, ज्यांना इंटरनेटची गरज नाही, जे Wi Fi इंटरनेट वापरतात किंवा ज्यांच्याकडे दुसरं सिम फक्त कॉलिंगसाठी आहे. अशा ग्राहकांसाठी हे प्लॅन उपयोगी ठरू शकतात.