AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दिवाळीत कार घेण्याचा विचार करताय? मग 5.75 लाखात घरी आणा ही कार, देते 27 किमी मायलेज

दिवाळीमध्ये तुम्ही देखील कार घेण्याचा विचार करत असाल तर 10 लाखांच्या आत मिळतायत सर्वात स्वस्त आणि जबरदस्त फीचर्स असणाऱ्या कार. मायलेज आणि फीचर्सही जबरदस्त.

दिवाळीत कार घेण्याचा विचार करताय? मग 5.75 लाखात घरी आणा ही कार, देते 27 किमी मायलेज
Image Credit source: Social media
| Updated on: Nov 03, 2026 | 4:28 PM
Share

दिवाळी 2026 च्या सणात नवीन कार खरेदी करण्याचा विचार करत असाल आणि तुमचे बजेट 10 लाख रुपयांपर्यंत असेल तर भारतीय बाजारात तुमच्यासाठी अनेक शानदार SUV उपलब्ध आहेत.

मारुती सुझुकी, टाटा मोटर्स, हुंडई, रेनॉ आणि निसान यांसारख्या कंपन्यांच्या पेट्रोल SUV कमी बजेटमध्ये चांगले फीचर्स, दमदार इंजिन आणि उत्तम मायलेज देतात. विशेष म्हणजे, या गाड्या रोजच्या वापरासाठीही उपयुक्त ठरतात.

Tata Punch- 10 लाख रुपयांपेक्षा कमी बजेटमध्ये टाटा पंच हा एक महत्त्वाचा पर्याय आहे. या मायक्रो SUV मध्ये 1.2-लिटर नॅचरली अ‍ॅस्पिरेटेड पेट्रोल इंजिन मिळते. यासोबत 5-स्पीड मॅन्युअल आणि AMT गिअरबॉक्सचे पर्याय आहेत. याशिवाय CNG व्हेरिएंटही उपलब्ध आहे. या कारची किंमत 5.75 लाख रुपयांपासून सुरु होते. कंपनीच्या दाव्यानुसार, कारचे मायलेज 26.99 किमीपर्यंत आहे.

Hyundai Exter- हुंडई एक्स्टर हीदेखील कमी बजेटमध्ये कॉम्पॅक्ट SUV खरेदी करू इच्छिणाऱ्यांसाठी चांगला पर्याय आहे. या कारची किंमत 5.81 लाख रुपयांपासून सुरु होते. यात 1.2-लिटर कप्पा पेट्रोल इंजिन दिले आहे. हे इंजिन 82hp पॉवर आणि 113.8Nm टॉर्क निर्माण करते. ट्रान्समिशनसाठी 5-स्पीड मॅन्युअल आणि AMT गिअरबॉक्सचे पर्याय मिळतात. कंपनीच्या माहितीनुसार, ही SUV 27.1 किमीपर्यंत मायलेज देऊ शकते.

Renault Kiger- रेनॉ काइगर ही स्टायलिश डिझाइन आणि प्रशस्त केबिनसाठी ओळखली जाणारी कॉम्पॅक्ट SUV आहे. यात 1.0-लिटर नॅचरली अ‍ॅस्पिरेटेड पेट्रोल इंजिन मिळते, जे 71hp पॉवर निर्माण करते. याशिवाय अधिक पॉवर हवी असणाऱ्या ग्राहकांसाठी 99hp क्षमतेचे टर्बो पेट्रोल इंजिनही उपलब्ध आहे. कमी बजेटमध्ये SUV खरेदी करू इच्छिणाऱ्या ग्राहकांसाठी काइगरचे नॅचरली अ‍ॅस्पिरेटेड पेट्रोल व्हेरिएंट विचार करण्यासारखे आहे.

Maruti Suzuki Fronx- मारुती सुझुकी फ्रॉन्क्स हीदेखील दिवाळीत SUV खरेदी करू इच्छिणाऱ्या ग्राहकांसाठी आकर्षक निवड ठरू शकते. यात 1.2-लिटर नॅचरली अ‍ॅस्पिरेटेड पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 88hp पॉवर आणि 113Nm टॉर्क निर्माण करते. या कारची किंमत 6.90 लाख रुपयांपासून सुरु होते. फीचर्समध्ये ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल आणि टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टमचा समावेश आहे.

टीप: लेखातील सर्व किंमती एक्स-शोरूम आहेत. प्रत्यक्ष किंमत शहर, व्हेरिएंट आणि डीलरशिपनुसार बदलू शकते. तसेच मायलेजचे आकडे कंपनीच्या दाव्यांनुसार असून प्रत्यक्ष वापरात त्यात फरक पडू शकतो.

Follow Us
कल्याणमध्ये संतापजनक घटना! 'त्या' एका कारणावरून नवऱ्याने उकळतं मटण...
कल्याणमध्ये संतापजनक घटना! 'त्या' एका कारणावरून नवऱ्याने उकळतं मटण चिमुकलीवर फेकलं
जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत मोठा ट्विस्ट! NCP नेत्यांचा अर्ज बाद; नेमकी
जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत मोठा ट्विस्ट! NCP नेत्यांचा अर्ज बाद; नेमकी कोणाला संधी?
पु. ल. देशपांडे यांच्या आठवणींना उजाळा! राज ठाकरेंच्या उपस्थितीत खास..
पु. ल. देशपांडे यांच्या आठवणींना उजाळा! राज ठाकरेंच्या उपस्थितीत खास दिनदर्शिकेचे प्रकाशन
दिया मिर्झाच्या व्हिडिओवर राजकीय टीका भोवली! मुंबई हायकोर्टाने अमित...
दिया मिर्झाच्या व्हिडिओवर राजकीय टीका भोवली! मुंबई हायकोर्टाने अमित साटम यांना फटकारले
पुण्यातील हिंजवडी मेट्रोचे पंतप्रधान नेरेंद्र मोदींच्या हस्ते लोकार्पण
PM Modi On Pune Metro : पुण्यातील हिंजवडी मेट्रोचे पंतप्रधान नेरेंद्र मोदींच्या हस्ते लोकार्पण
पुण्याबाबत अजित पवार संवेदनशील; मेट्रो उद्घाटनावेळी शिंदेंचं विधान
पुण्याबाबत अजित पवार संवेदनशील होते, ते... मेट्रो प्रकल्प उद्घाटनावेळी एकनाथ शिंदेंचे विधान
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; SIT प्रमुख अमरसिंग जाधवांसह...
Pradeep Purnekar : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; SIT प्रमुख अमरसिंग जाधवांसह...
पुणे मेट्रो मार्गिका 3 ठरणार देशातील पहिली 100% महिला संचालित मेट्रो;
पुणे मेट्रो मार्गिका 3 ठरणार देशातील पहिली 100% महिला संचालित मेट्रो; सुनेत्रा पवारांनी सांगितली खास वैशिष्ट्ये
कराडमध्ये उदयसिंह पाटील उंडाळकरांची दणदणीत बाजी; 100 मते मिळवत....
Satara Bank Election Result : कराडमध्ये उदयसिंह पाटील उंडाळकरांची दणदणीत बाजी; 100 मते मिळवत धनाजी पाटलांचा पराभव
माझी हौस नव्हती, जालन्यातील महिलांसाठी रॅम्पवर उतरले; पंकजा मुंडेंचं..
Pankaja Munde : माझी हौस नव्हती, जालन्यातील महिलांसाठी रॅम्पवर उतरले... पंकजा मुंडेंचं टीकाकारांना सडेतोड उत्तर