AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Thane Crime : मित्राला संपवल्यानंतर 20 दिवसांनी असं काय घडलं की आरोपी थेट पोलिस स्टेशनमध्ये सरेंडर, डोंबिवलीतील खळबळजनक घटना

डोंबिवलीत दारूच्या पार्टीतील वादातून मित्राची हत्या करून मृतदेहाची विल्हेवाट लावल्याची घटना उघडकीस आली आहे. तब्बल 20 दिवस हा प्रकार लपवून ठेवल्यानंतर आरोपी स्वतःच क्राईम ब्रँचसमोर हजर झाला. मृत मित्र वारंवार स्वप्नात येत असल्याने त्याने हत्येची कबुली दिल्याची माहिती आहे.

Thane Crime : मित्राला संपवल्यानंतर 20 दिवसांनी असं काय घडलं की आरोपी थेट पोलिस स्टेशनमध्ये सरेंडर, डोंबिवलीतील खळबळजनक घटना
Dombivli Friend MurderImage Credit source: social media
| Updated on: Nov 03, 2026 | 4:02 PM
Share

डोंबिवलीत दारूच्या पार्टीत झालेल्या वादातून मित्रानेच मित्राची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रभू करकडे याने विशाल कदम याला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यात विशालचा मृत्यू झाल्यानंतर घरमालक संदेश मात्रे याच्या मदतीने मृतदेह गोणीत भरून निर्जनस्थळी फेकण्यात आला. मात्र हत्येनंतर तब्बल २० दिवस मृत मित्र स्वप्नात येत असल्याने आरोपीला पश्चात्ताप झाला आणि त्याने स्वतः ठाणे क्राईम ब्रँचच्या सेंट्रल युनिटमध्ये हजर होत हत्येची कबुली दिली. या प्रकरणी विष्णुनगर पोलिसांनी हत्या करणारा प्रभू करकडे आणि मृतदेहाची विल्हेवाट लावण्यास मदत करणारा घरमालक संदेश मात्रे या दोघांना अटक केली आहे.

डोंबिवली पश्चिमेतील मोठागाव परिसरात ही घटना घडली. विशाल कदम हा ४२ वर्षीय तरुण अनेक वर्षांपासून एकटाच राहत होता. त्याची प्रभू करकडे याच्यासोबत मैत्री होती. दोघेही एकाच ठिकाणी राहत असल्याने त्यांच्यात जवळीक होती. मात्र २० ते २५ दिवसांपूर्वी दारूच्या पार्टीदरम्यान दोघांमध्ये वाद झाला. या वादातून प्रभूने विशालला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. मारहाणीनंतर विशाल जमिनीवर कोसळला. दुसऱ्या दिवशी सकाळी तो हालचाल करत नसल्याचे प्रभूच्या लक्षात आले. त्यानंतर प्रभूने घरमालक संदेश मात्रे याला घडलेला प्रकार सांगितला. दोघांनी मिळून विशालचा मृतदेह गोणीत भरला आणि रात्री सुमारे तीन वाजण्याच्या सुमारास कोपर रोड परिसरातील खाडीलगत एका निर्जन आणि पडक्या ठिकाणी फेकून दिला.

त्यानंतर दोघांनीही हा प्रकार लपवण्याचा प्रयत्न केला.मात्र, हत्येनंतर प्रभूला मृत विशाल वारंवार स्वप्नात दिसू लागला. या स्वप्नांमुळे अस्वस्थ झालेल्या प्रभूने अखेर पश्चात्ताप व्यक्त करत ठाणे क्राईम ब्रँचच्या सेंट्रल युनिटमध्ये एपीआय प्रकाश दिनकर यांच्यासमोर हजर होत हत्येची कबुली दिली. त्यानंतर क्राईम ब्रँचने विष्णुनगर पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळाची पडताळणी करून मृतदेह ताब्यात घेतला आणि विशालच्या भावाला बोलावून मृतदेहाची ओळख पटवली. दरम्यान, घरमालक संदेश मात्रे हा गायब असल्याने पोलिसांनी त्याचाही शोध घेत त्याला अटक केली. या प्रकरणी प्रभू करकडे आणि संदेश मात्रे या दोघांना अटक करण्यात आली असून विष्णुनगर पोलीस पुढील तपास करत आहेत.

Follow Us
जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत मोठा ट्विस्ट! NCP नेत्यांचा अर्ज बाद; नेमकी
जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत मोठा ट्विस्ट! NCP नेत्यांचा अर्ज बाद; नेमकी कोणाला संधी?
पु. ल. देशपांडे यांच्या आठवणींना उजाळा! राज ठाकरेंच्या उपस्थितीत खास..
पु. ल. देशपांडे यांच्या आठवणींना उजाळा! राज ठाकरेंच्या उपस्थितीत खास दिनदर्शिकेचे प्रकाशन
दिया मिर्झाच्या व्हिडिओवर राजकीय टीका भोवली! मुंबई हायकोर्टाने अमित...
दिया मिर्झाच्या व्हिडिओवर राजकीय टीका भोवली! मुंबई हायकोर्टाने अमित साटम यांना फटकारले
पुण्यातील हिंजवडी मेट्रोचे पंतप्रधान नेरेंद्र मोदींच्या हस्ते लोकार्पण
PM Modi On Pune Metro : पुण्यातील हिंजवडी मेट्रोचे पंतप्रधान नेरेंद्र मोदींच्या हस्ते लोकार्पण
पुण्याबाबत अजित पवार संवेदनशील; मेट्रो उद्घाटनावेळी शिंदेंचं विधान
पुण्याबाबत अजित पवार संवेदनशील होते, ते... मेट्रो प्रकल्प उद्घाटनावेळी एकनाथ शिंदेंचे विधान
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; SIT प्रमुख अमरसिंग जाधवांसह...
Pradeep Purnekar : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; SIT प्रमुख अमरसिंग जाधवांसह...
पुणे मेट्रो मार्गिका 3 ठरणार देशातील पहिली 100% महिला संचालित मेट्रो;
पुणे मेट्रो मार्गिका 3 ठरणार देशातील पहिली 100% महिला संचालित मेट्रो; सुनेत्रा पवारांनी सांगितली खास वैशिष्ट्ये
कराडमध्ये उदयसिंह पाटील उंडाळकरांची दणदणीत बाजी; 100 मते मिळवत....
Satara Bank Election Result : कराडमध्ये उदयसिंह पाटील उंडाळकरांची दणदणीत बाजी; 100 मते मिळवत धनाजी पाटलांचा पराभव
माझी हौस नव्हती, जालन्यातील महिलांसाठी रॅम्पवर उतरले; पंकजा मुंडेंचं..
Pankaja Munde : माझी हौस नव्हती, जालन्यातील महिलांसाठी रॅम्पवर उतरले... पंकजा मुंडेंचं टीकाकारांना सडेतोड उत्तर
गोकुळमध्ये महायुतीची नवी खेळी; चार शासकीय सदस्यांच्या नियुक्तीने...
Gokul : Mahayuti : गोकुळमध्ये महायुतीची नवी खेळी; चार शासकीय सदस्यांच्या नियुक्तीने सत्तासमीकरण बदलणार?