Kisan Vikas Patra: पोस्टाच्या ‘या’ योजनेत पैसे गुंतवा आणि दामदुप्पट परतावा मिळवा

| Updated on: Oct 11, 2021 | 10:16 AM

Kisan Vikas Patra | जर तुम्हाला कोणतीही जोखीम घ्यायची नसेल, तर ही योजना तुमच्यासाठी बचत करण्याचा उत्तम पर्याय सिद्ध आहे. या स्कीममध्ये, ठेवीदाराला त्याच्या डिपॉझिटवर चांगल्या परताव्यासह सरकारी सुरक्षेचा लाभ मिळतो.

Kisan Vikas Patra: पोस्टाच्या या योजनेत पैसे गुंतवा आणि दामदुप्पट परतावा मिळवा
पोस्ट ऑफिस
Follow us on

मुंबई: भारतीय गुंतवणूकदार हे नेहमीच गुंतवणुकीवर मिळवणाऱ्या परताव्यापेक्षा सुरक्षिततेला अधिक प्राधान्य देत आले आहेत. त्यामुळेच जुन्या पिढीतील बहुतांश लोक अजूनही सरकारी योजनांमध्ये गुंतवणूक करतात. पोस्ट ऑफिसच्या योजनांमध्ये चांगल्या परताव्यासोबत सुरक्षिततेची हमी असते. यापैकी Kisan Vikas Patra (KVP) ही सर्वाधिक लोकप्रिय अल्पबचत योजना आहे.

जर तुम्हाला कोणतीही जोखीम घ्यायची नसेल, तर ही योजना तुमच्यासाठी बचत करण्याचा उत्तम पर्याय सिद्ध आहे. या स्कीममध्ये, ठेवीदाराला त्याच्या डिपॉझिटवर चांगल्या परताव्यासह सरकारी सुरक्षेचा लाभ मिळतो. किसान विकास पत्र योजनेचा दावा आहे की, या अंतर्गत तुमची ठेवीची रक्कम 10 वर्षे आणि 4 महिन्यांत (124 महिने) दुप्पट होईल.

किसान विकास पत्रची माहिती

किसान विकास पत्र अल्प बचत योजना आहे. या योजनेला भारतीय पोस्टने 1988 मध्ये लाँच केले होते. दीर्घ काळासाठी लोकांनी यात गुंतवणूक करावी असा या योजनेचा उद्देश होता. या योजनेत कमीत कमी एक हजार रुपये गुंतवावे लागतात. या योजनेसाठी अधिकाधिक मर्यादा नाही. सरकारने 2014मध्ये या योजनेअंतर्गत पॅनकार्ड अनिवार्य केले होते. मात्र 50 हजार रुपयांहून अधिक गुंतवणूक केल्यास पॅनकार्ड अनिवार्य आहे. जर 10 लाखांहून अधिक गुंतवणूक केली तर उत्पन्नाचा पुरावा, सॅलरी स्लिप, बँक स्टेटमेंट किंवा इनकम टॅक्स रिटर्न सोबत जोडावे लागते.

काय आहे वयोमर्यादा?

18 वर्षे पूर्ण झालेली व्यक्ती या योजनेत गुंतवणूक करु शकते. ग्रामीण भागात बँकेची सुविधा कमी असल्याने तेथे या योजनेचे आकर्षण अधिक आहे. या योजनेची खासियत म्हणजे मार्केटमध्ये कितीही उलाढाल झाली तरी या योजनेत रिटर्नची खात्री आहे. या योजनेत प्रत्येक तीन महिन्यांसाठी व्याजदर लागू होतो. जानेवारी-मार्च तिमाहीसाठी व्याजदर 6.9 टक्के असले तरी व्याजदर वर्षिक मोजले जाते. मात्र यात फायदा चांगला आहे.

टॅक्सचे नियम काय आहेत?

या योजनेत गुंतवणूक केल्यास 80 सी अंतर्गत टॅक्सचा लाभ मिळत नाही. तसेच रिटर्नही करपात्र आहे. मॅच्युरिटीनंतर रिटर्नवर टीडीएस कापला जात नाही. किसान पत्रच्या आधारे कर्जही घेता येते. या कर्जावर व्याजदर कमी असते.

किसान विकास पत्राचे प्रकार

किसान विकास पत्र मुख्यत्वे तीन प्रकारचे असतात. सिंगल होल्डर टाईप सर्टिफिकेटमध्ये अॅडल्ट इंडिव्हिज्युअल किंवा अल्पवयीन ऐवजी सज्ञान व्यक्तीला जारी केले जाते. दोन व्यक्ती जॉईंट गुंतवणूक या योजनेत करु शकतात. यामध्ये मॅच्युरिटी रक्कम दोघांनाही मिळते किंवा जो हयात असेल त्याला 100 टक्के रक्कम मिळते. जॉईंट सर्टिफिकेटमध्ये आणखी एक Joint ‘B’ Type Certificate असते.

संबंधित बातम्या:

पोस्टाच्या योजनेत महिन्याला 2850 रुपये जमा करा आणि मिळवा 14 लाख रुपये

Post Office Scheme : पोस्टाची भन्नाट योजना, फक्त 50 हजार गुंतवा आणि 3300 रुपये मासिक पेन्शन मिळवा

Post Office Scheme: अवघ्या 5 वर्षात मिळणार 21 लाख, 100 रुपयांनी सुरू करू शकता गुंतवणूक