कोकिलाबेन अंबानी राहतात कोणत्या मुलासोबत? अनिल की मुकेश अंबानी?

Kokilaben Ambani Health Update : कोकिलाबेन अंबानी या सध्या 91 वर्षांच्या आहेत. तब्येत बिघडल्याने त्यांना रिलायन्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण त्या अनिल अंबानींसोबत राहतात की मोठा मुलगा मुकेश अंबानींसोबत राहतात?

कोकिलाबेन अंबानी राहतात कोणत्या मुलासोबत? अनिल की मुकेश अंबानी?
कोकिलाबेन अंबानी
| Updated on: Aug 23, 2025 | 9:28 AM

भारताच्या सर्वात मोठ्या आणि प्रभावशाली व्यावसायिक कुटुंबांपैकी एक अंबानी कुटुंबाची प्रमुख कोकिलाबेन अंबानी (Kokilaben Ambani) यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तब्येत बिघडल्याने त्यांना रिलायन्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्या आता 91 वर्षांच्या आहेत. पण त्या मीडियापासून दूर असतात. पण त्यांचे नाव कायम अनेक समाजकार्याच्या निमित्ताने समोर येत असते. कोकिलाबेन या अनिल अंबानींसोबत राहतात की मोठा मुलगा मुकेश अंबानी यांच्यासोबत राहतात?

कोकिलाबेन अंबानी राहतात कुठे?

अनेक लोकांच्या मनात प्रश्न येतो की, कोकिलाबेन या कोणत्या मुलासोबत राहतात. अनिल की मुकेश यापैकी त्या कोणत्या मुलासोबत राहतात, याविषयी लोकांच्या मनात उत्सुकता आहे. सध्या त्या मोठा मुलगा मुकेश अंबानी याच्यासोबत राहतात. मुंबईतील आलिशान घर अँटिलिया (Antilia) येथे राहतात.

  • अँटिलिया 2010 मध्ये तयार करण्यात आले होते. मुंबईतीलAltamount Road वर ही 27 मजल्यांची गगनचुंबी इमारत बांधण्यात आली आहे.
  • ही बहुमजली इमारत भारतातील सर्वात महागडे निवासस्थान आहे. जगातील सर्वात महागड्या खासगी घरात या इमारतीची गिणती होते.
  • या इमारतीत 168 कार्सची पार्किंग, अनेक स्विमिंग पुल्स, 50 आसनी खासगी थिएटर, स्पा, बॉलरूम, आरोग्य केंद्र आणि अनेक सोयी-सुविधांनी ते युक्त आहे.

कोकिलाबेन यांची मुख्य भूमिका

  1. कोकिलाबेन यांचा जन्म 1934 साली गुजरात राज्यातील जामनगर येथे झाला होता. त्या केवळ अंबानी कुटुंबाच्या प्रमुख नाहीत. तर Reliance च्या यशामागे सुद्धा त्यांचा मोठा हात आहे.
  2. धीरूभाई अंबानी यांचे 2002 मध्ये निधन झाले. त्यानंतर अंबानी कुटुंबात मोठे वादळ आले. रिलायन्समध्ये उभी फुट पडली. त्यावेळी मुकेश आणि अनिल अंबानी या दोन्ही मुलांमध्ये कोकिलाबेन यांनी यशस्वी मध्यस्थी केली.
  3. पण त्यांनी रिलायन्स समुहात कोणतीही जबाबदारी घेतली नाही. त्या कोणत्याही मोठ्या पदावर कधीच राहिल्या नाहीत. पण त्या कंपनीच्या शेअरधारक आहेत. त्यांच्या नावे मुंबईत सुप्रसिद्ध कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालय आहे. याकुटुंबाच्या सामाजिक कार्याचे हे प्रतिक आहे.

कोकिलाबेन यांना रुग्णालयात केले दाखल

कोकिलाबेन अंबानी यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांचे वय 91 वर्षे आहे. त्यांची तब्येत बिघडल्याने एअरलिफ्ट करत त्यांना रिलायन्सच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. वय पाहता त्यांच्या आरोग्याविषयी चिंता व्यक्त होत आहे. पण याविषयीची अधिकृत माहिती समोर आलेली नाही.