AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बापरे! गॅसनंतर आता कंडोम महागले, एक पॉकेट मिळतेय तब्बल… युद्धामुळे आता नवं टेन्शन!

अमेरिका आणि इस्त्रायल या दोन्ही देशांनी मिळून इराणवर हल्ले केले आहेत. त्यामुळे गेल्या तीन आठवड्यांपासून सुरु असलेल्या युद्धाने भीषण रुप धारण केले आहे.

| Updated on: Mar 16, 2026 | 4:05 PM
Share
अमेरिका आणि इस्त्रायल या दोन्ही देशांनी मिळून इराणवर हल्ला केला आहे. इराण देखील या दोन्ही देशांना चांगलेच प्रतित्यूत्तर देताना दिसत आहे. गेल्या तीन आठवड्यांपासून या देशांमध्ये युद्ध सुरु आहे. मात्र, या युद्धामुळे दैनंदिन वापरातील अनेक गोष्टींवर परिणाम झाला आहे. आखाती देशात (मध्य पूर्व) सुरू असलेल्या युद्धाने आता कंडोमच्या किंमतींनाही धक्का दिला आहे. कंडोम उत्पादनासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या भावात ४० ते ४५ टक्क्यांची प्रचंड वाढ झाल्याने, लवकरच कंडोमच्या पॉकेटची किंमत १० ते १५ टक्क्यांनी वाढणार आहे.

1 / 6
छत्रपती संभाजीनगर हे देशातील प्रमुख कंडोम उत्पादन केंद्रांपैकी एक आहे. येथील रेमंड लाईफस्टाइल, सेफगार्ड आणि युनिव्हर्सल या कंपन्या मिळून वर्षाला १०० कोटींहून अधिक कंडोमची निर्मिती करतात. या कंडोमचा पुरवठा केवळ भारतातच नव्हे तर नेपाळ, आफ्रिकन देश आणि इतर अनेक देशांमध्येही होतो.

2 / 6
आखाती युद्धामुळे सिलिकॉन ऑइल, पॅकेजिंग मटेरियल आणि अॅल्युमिनियम लॅमिनेट या महत्त्वाच्या कच्च्या मालाच्या आयातीत मोठा व्यत्यय आला आहे. यामुळे त्यांच्या किंमतीत जबरदस्त वाढ झाली.

3 / 6
उदाहरणार्थ, पूर्वी १८० रुपयाला मिळणारे एक केमिकल आता २७० रुपयांवर गेले आहे. उद्योग क्षेत्रातील सूत्रांनी सांगितले की, कच्च्या मालाच्या किंमतीत ४० ते ४५ टक्क्यांची वाढ झाल्याने उत्पादन खर्च वाढला आहे. याचा परिणाम म्हणून किरकोळ बाजारात कंडोमच्या पॉकेटच्या किंमतीत १० ते १५ टक्क्यांची वाढ अपरिहार्य आहे. यामुळे सामान्य ग्राहकांवर अतिरिक्त आर्थिक बोजा पडणार आहे.

4 / 6
गेल्या काही दिवसांत गॅस, पेट्रोल आणि इतर अत्यावश्यक वस्तूंच्या किंमती वाढल्यानंतर आता कंडोमसारख्या उत्पादनालाही युद्धाचा फटका बसला आहे. छत्रपती संभाजीनगरमधील या कंपन्या केवळ देशांतर्गतच नव्हे तर निर्यातीवरही मोठ्या प्रमाणात अवलंबून आहेत. कच्च्या मालाच्या वाढत्या किंमती आणि पुरवठा साखळीतील अडथळ्यांमुळे उत्पादन आणि निर्यात दोन्हींवर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

5 / 6
उद्योग संघटनांनी सरकारकडे कच्च्या मालाच्या आयातीत सवलत देण्याची आणि पर्यायी पुरवठा स्रोत शोधण्याची मागणी केली आहे. मात्र सध्याच्या परिस्थितीत लवकरच कंडोम महाग होणार असल्याचे स्पष्ट चित्र आहे. ही घटना पुन्हा एकदा दाखवते की, दूरस्थ युद्धाचा परिणाम किती दूरपर्यंत आणि किती अनपेक्षित क्षेत्रांवर होऊ शकतो. आता सामान्य माणसाला फक्त पेट्रोल-गॅस नव्हे तर कंडोमसाठीही जास्त पैसे मोजावे लागणार आहेत.

6 / 6
Follow Us
गंगापूर रोडवरील 50 झाडांची कत्तल भोवली; भुजबळांनी दिले महत्वाचे आदेश
Chhagan Bhujbal : गंगापूर रोडवरील 50 झाडांची कत्तल भोवली; भुजबळांनी दिले महत्वाचे आदेश
गणेशोत्सवात महागणपती मंडपात काळीज पिळवटून टाकणारी घटना
Kalachowki : गणेशोत्सवात महागणपती मंडपात काळीज पिळवटून टाकणारी घटना
हार चढवला, पण फुलांचा नाही; मुंबईच्या राजाला चक्क 101..VIDEO व्हायरल
Mumbai Cha Raja : हार चढवला, पण फुलांचा नाही; मुंबईच्या राजाला चक्क 101..VIDEO व्हायरल
दिशा सालियन प्रकरणावर संजय राऊतांची प्रतिक्रीया, म्हणाले...
Sanjay Raut | मातोश्रीवर येऊन प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न घाणेरडा; दिशा सालियन प्रकरणावर संजय राऊतांची प्रतिक्रीया, पुढे म्हणाले...
भरधाव BMWचा अक्षरशः चक्काचूर! मुंबईच्या कोस्टल रोडवर चालकाचं नियंत्रण
BMW Car Accident | भरधाव BMWचा अक्षरशः चक्काचूर! मुंबईच्या कोस्टल रोडवर चालकाचं नियंत्रण सुटलं अन् BMW थेट खाली कोसळली
शेतात ट्रॅक्टर नाही, थेट ड्रोनची एन्ट्री; मुळशीत अभिनव प्रयोग
Drone In Farm | शेतात ट्रॅक्टर नाही, थेट ड्रोनची एन्ट्री; मुळशीत अभिनव प्रयोग, व्हिडिओ बघाच
पाच दिवसांत चारा छावण्या सुरू करा, रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम
Rohit Pawar | पाच दिवसांत चारा छावण्या सुरू करा, रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम; शेतकऱ्यांसाठी 50 हजारांची मदत अन्...
महाराष्ट्र दुष्काळात होरपळतोय, पण सरकार... राऊतांचा सरकारवर हल्लाबोल
Sanjay Raut | महाराष्ट्र दुष्काळात होरपळतोय, पण सरकार... संजय राऊतांचा राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल
मंत्री विखे पाटलांची पुतणी स्वीडिश संसदेत खासदार; 349 सदस्यांच्या...
Radhakrishna Vikhe Patil | मंत्री विखे पाटलांची पुतणी स्वीडिश संसदेत खासदार; 349 सदस्यांच्या संसदेत मिळवलं स्थान
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर