LIC MCap | शेअर बाजारातील टॉप 10 मधून एलआयसी गायब, घसरणीलाही लागेना ब्रेक

| Updated on: Sep 01, 2022 | 4:25 PM

LIC MCap | एलआयसीचा शेअर 17 मे 2022 रोजी शेअर मार्केटमध्ये सुचीबद्ध झाला होता. एलआयसीच्या आयपीओसाठी 902-949 हा प्राईस ब्रँड होता. पण पहिल्याच दिवसी हा शेअर आपटला. त्यामध्ये 13 टक्क्यांची घसरण झाली. तर सध्या या शेअरच्या किंमतीत 29 टक्क्यांची घसरण झाली आहे.

LIC MCap | शेअर बाजारातील टॉप 10 मधून एलआयसी गायब, घसरणीलाही लागेना ब्रेक
एलआयसी यादीतून बाहेर
Image Credit source: सोशल मीडिया
Follow us on

LIC MCap | भारतीय जीवन विमा निगम, एलआयसीसाठी (LIC) शेअर बाजारातील (Share Market) पाऊल काही चांगले राहिले नाही. बाजारातील पदार्पणापासून हा स्टॉक गटांगळ्या खात आहे. सरकारची एलआयसी आयपीओ (IPO) आणि शेअर बाजारातील कामगिरीवर मोठ्या अपेक्षा होत्या. पण या स्टॉकचा उलट्या दिशेने प्रवास सुरु आहे. त्यामुळे सरकारच्या तर अडचणी वाढल्याच आहेत. पण गुंतवणूकदारांना (Investors) देव पाण्यात ठेवावे लागले आहेत. सरकारने हा शेअर धावावा यासाठी गुंतवणूकदारांना सवलतीचे आमिष दाखवले. अनेकांनी हा लंबी रेस का घोडा असल्याचे भाकित नोंदवले. त्याआधारे देशभरातूनच नाही तर परदेशातील गुंतवणूकदारांनी गुंतवणूक केली. पण ही धुळफेक निघाली. एलआयसीचा शेअर(Share) 17 मे 2022 रोजी शेअर मार्केटमध्ये सुचीबद्ध झाला होता. एलआयसीच्या आयपीओसाठी 902-949 हा प्राईस ब्रँड होता. पण पहिल्याच दिवसी हा शेअर आपटला. त्यामध्ये 13 टक्क्यांची घसरण झाली. तर सध्या या शेअरच्या किंमतीत 29 टक्क्यांची घसरण झाली आहे. आता तर हा स्टॉक बाजारातील टॉप 10 कंपन्यांच्या यादीतूनही बाहेर फेकल्या गेला आहे.

या दोघांना झाला फायदा

एलआयसी टॉप 10 कंपन्यांच्या यादीतूनही बाहेर फेकल्या गेली. त्याचा फायदा बजाज फायनान्स (Bajaj Finance) आणि अदानी ट्रांसमिशन (Adani Transmission) या दोन कंपन्यांना झाला. 30 ऑगस्ट रोजी बाजार बंद झाल्यानंतर बीएसईवर अदानी ट्रांसमिशनचे मार्केट कॅप 4.43 लाख कोटी रुपये होते. त्याआधारे कंपनीने थेट बाजारात टॉप 10 मध्ये 9 वे स्थान गाठले. तर बजाज फायनान्सने 10 क्रमांक मिळवला. या कंपनीचा मार्केट कॅप 4.42 लाख कोटी रुपये आहे. सरकार विमा कंपनी एलआयसीचे मार्केट कॅप 4.26 लाख कोटी रुपयांवर आले असून ती बाजारात आता 11 व्या स्थानी घसरली आहे.

शेअरची किंमत किती?

एलआयसीचा शेअर 17 मे 2022 रोजी शेअर मार्केटमध्ये सुचीबद्ध झाला होता. एलआयसीच्या आयपीओसाठी 902-949 हा प्राईस ब्रँड होता. पण पहिल्याच दिवसी हा शेअर आपटला. त्यामध्ये 13 टक्क्यांची घसरण झाली. सातत्याने उलट्या दिशेने प्रवास करणारा हा शेअर 867.20 रुपयांवर स्थिरावला होता. बाजाराच्या सुरुवातीला या शेअरचा वरच्या स्तराचा विचार करता सध्या या शेअरच्या किंमतीत 29 टक्क्यांची घसरण झाली आहे.

हे सुद्धा वाचा

टॉप 10 मधील कंपन्या कोणत्या?

बाजारातील मूल्यांकन बघता, मार्केट कॅपनुसार, मुकेश अंबानी यांची रिलांयन्स इंडस्ट्रीज 17.8 लाख कोटींसह या क्रमवारीत अव्वलस्थानी आहे. तर टाटा समुहाची आयटी कंपनी टीसीएस ही 11.75 लाख कोटींच्या बाजारातील भांडवलासह दुसऱ्या स्थानी आहे. या कंपन्यांचे बाजारातील भांडवल 10 लाख कोटींपेक्षा जास्त आहे. त्याव्यतिरिक्त कोणत्याही कंपनीकडे एवढे भांडवल नाही. क्रमवारीनुसार तिसऱ्या क्रमांकावर एचडीएफसी बँक, चौथ्या क्रमांकावर इन्फोसिस, पाचव्या स्थानी हिंदुस्थान युनिलिव्हर, सहाव्या क्रमांकावर आयसीआयसीआय बँक, सातव्या स्थानी एसबीआय तर आठव्या क्रमांकावर एचडीएफसी कंपनी आहे.