
कुणाला अधिक नफा नकोय. सर्वांनाच वाटतं चांगला नफा कमवावा. पण, नेमकी कशात गुंतवणूक करावी, याची माहिती नसते. आज आम्ही तुम्हाला अशीच एक खास माहिती सांगणार आहोत. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल पण जास्त जोखीम घ्यायची नसेल तर डेट फंड तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय ठरू शकतात, विशेषत: कमी कालावधीचे म्युच्युअल फंड – हे असे फंड आहेत जे केवळ 6 ते 12 महिन्यांच्या कालावधीच्या डेट सिक्युरिटीजमध्ये गुंतवणूक करतात.
बाजार नियामक सेबीने आपल्या नियमांनुसार डेट फंडांची वेगवेगळ्या श्रेणींमध्ये विभागणी केली आहे, जेणेकरून गुंतवणूकदार सहजपणे योग्य निवड करू शकतील.
एक वर्षासाठी पैसे गुंतवणाऱ्यांसाठी कमी कालावधीचे फंड हा चांगला पर्याय आहे. कमी कालावधीचा फंड हा एक म्युच्युअल फंड आहे जो सुमारे 6 ते 12 महिन्यांचा कालावधी असलेल्या डेट इन्स्ट्रुमेंट्समध्ये गुंतवणूक करतो. तुमचे पैसे वर्षभर गुंतवायचे आहेत.
कमी कालावधीच्या फंडांची सरासरी मॅच्युरिटी सहा ते बारा महिन्यांची असते, तर अल्प मुदतीचे फंड एक ते तीन वर्षांची सरासरी मॅच्युरिटी असलेल्या डेट इन्स्ट्रुमेंट्समध्ये गुंतवणूक करतात. जेव्हा गुंतवणूकदार गुंतवणुकीचे पर्याय शोधतात, तेव्हा त्यांना बऱ्याचदा कमी कालावधीचे म्युच्युअल फंड आणि त्यांच्या वैशिष्ट्यांबद्दल जाणून घ्यायचे असते.
ज्या गुंतवणूकदारांना कमी जोखीम घेऊन सुमारे 6 ते 12 महिने आपले पैसे सुरक्षित ठेवायचे आहेत, त्यांच्यासाठी कमी कालावधीचे म्युच्युअल फंड हा उत्तम पर्याय आहे. त्यामुळे कमी कालावधीचे फंड तुमच्यासाठी योग्य पर्याय ठरू शकतात.
गुंतवणूक करताना कधीही काळजी घेणं देखील गरजेचं आहे. कारण, फसवणूक देखील होऊ शकते. त्यामुळे विश्वासार्ह संस्था आणि प्रचलित ठिकाणीच गुंतवणूक करा. परतावा अधिक मिळवण्यात अनेकांची फसवणूक देखील होते. त्यामुळे या गोष्टींकडे देखील लक्ष देणं गरजेचं आहे.
(डिस्क्लेमर: या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)