गॅस सिलिंडरबाबत सर्वात मोठा अलर्ट, फक्त 1 दिवस उरला; करा हे काम अन्यथा थेट कनेक्शन कट?

Gas Connection News : एचपी, इंडेन आणि भारत गॅसच्या ग्राहकांसाठी एक मोठी बातमी आहे. 30 जूनपर्यंत काही आवश्यक प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक आहे. अन्यथा, त्यांचे LPG कनेक्शन बंद होऊ शकते.

गॅस सिलिंडरबाबत सर्वात मोठा अलर्ट, फक्त 1 दिवस उरला; करा हे काम अन्यथा थेट कनेक्शन कट?
LPG and PNG Connection News
Image Credit source: Google
| Updated on: Jun 29, 2026 | 6:32 PM

देशातील जवळपास सर्वच घरांमध्ये LPG गॅस वापरला जातो. अशातच आता एचपी, इंडेन आणि भारत गॅसच्या ग्राहकांसाठी एक मोठी बातमी आहे. 30 जूनपर्यंत काही आवश्यक प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक आहे. अन्यथा, त्यांचे LPG कनेक्शन बंद होऊ शकते. 1 जुलैपासून LPG संदर्भातील अनेक नियमांमध्ये बदल होणार असून, त्याचा थेट परिणाम लाखो ग्राहकांवर होणार आहे. 30 जूनपूर्वी कोणती कामे करणे गरजेचे आहे ते जाणून घेऊयात.

तुमच्याकडे PNG आणि LPG दोन्ही कनेक्शन आहेत का?

केंद्र सरकारने अलीकडेच LPG अमेंडमेंट ऑर्डर जारी केली आहे. या नव्या नियमांनुसार, ज्या ग्राहकांकडे PNG आणि LPG दोन्ही कनेक्शन आहेत, त्यांनी एका महिन्याच्या आत आपले एचपी, इंडेन आणि भारत गॅसचे LPG कनेक्शन सरेंडर करणे आवश्यक आहे. तसे न केल्यास संबंधित LPG कनेक्शन बंद करण्यात येऊ शकते. जो ग्राहक निर्धारित कालावधीत LPG कनेक्शन सरेंडर करेल, त्याला एक विशेष कूपन दिले जाईल. भविष्यात गरज भासल्यास या कूपनच्या आधारे तो पुन्हा LPG कनेक्शन घेऊ शकतो.

सरकारचा आणखी एक महत्त्वाचा निर्देश

मार्च महिन्यात सरकारने ज्या भागांमध्ये PNG सुविधा उपलब्ध आहे, त्या भागातील नागरिकांना LPG ऐवजी PNG कनेक्शन स्वीकारण्याचे निर्देश दिले होते. यासाठी ग्राहकांना तीन महिन्यांची मुदत देण्यात आली होती. जर ग्राहकांनी या कालावधीत PNG कनेक्शन घेतले नाही, तर त्यांचे LPG कनेक्शन बंद होऊ शकते. सरकारने दिलेली ही मुदत जून महिन्यात संपत असल्याने संबंधित ग्राहकांनी तातडीने आवश्यक प्रक्रिया पूर्ण करावी, अन्यथा अडचणींचा सामना करावा लागू शकतो.

30 जूनपूर्वी e-KYC करणेही आवश्यक

LPG ग्राहकांनी 30 जूनपर्यंत e-KYC प्रक्रिया पूर्ण करणे देखील अनिवार्य करण्यात आले आहे. तुमचे LPG कनेक्शन सक्रिय असल्यास, 30 जूनपर्यंत e-KYC करून घ्या. अन्यथा, 1 जुलैपासून गॅस सिलेंडर बुक करताना अडचणी येऊ शकतात. ग्राहक संबंधित गॅस कंपनीच्या मोबाईल अॅपद्वारेही e-KYC प्रक्रिया सहज पूर्ण करू शकतात.

LPG सिलेंडरचे दर कमी होणार?

गेल्या काही महिन्यांपासून जागतिक पातळीवर तणावाचे वातावरण आहे, मात्र आता हा तणाव काहीसा कमी झाला असल्याने हॉर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा खुली झाली आहे. त्यामुळे LPG च्या किमती कमी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे 1 जुलै रोजी केंद्र सरकार घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात कपात करण्याचा निर्णय घेते का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

Follow Us